पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंवर 470 कोटी खर्च, सर्वात जास्त ‘या’ खेळाडूवर, विनेश फोगाटवर किती जाणून घ्या
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताला फक्त 6 पदके जिंकता आलीत, या पदकांसाठी खर्चे किती झाला? एका खेळाडूवर किती पैसे खर्च झाले जाणून घ्या.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 आता संपण्यासाठी काही तास बाकी आहेत. भारताचा प्रवास आता संपला असून 117 खेळाडूंनी 16 खेळांमध्ये सहभाग घेतला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्ण पदक जिंकता आलेलं नाही. भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकलीत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून जास्त पदांची अपेक्षा होती. ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या सहा पदकांसाठी किती खर्च झाला जाणून घ्या.
पॅरिस ऑलिम्पिकनमध्येम 16 खेळांसाठी 117 खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी तब्बल 470 कोटी रुपयांचा खर्च झाला. इतका मोठी खर्च होऊन फक्त सहा पदके आपल्याला जिंकता आलीत. जर सहा पदकांचा विचार केला तर भारताला 78.33 कोटी रूपये एका पदकासाठी खर्च करावे लागले. या खर्चामध्ये सर्वात जास्त खर्च हा ॲथलेटिक्समध्ये झाला. यामध्ये फक्त नीरज चोप्रा याने रौप्यपदक जिंकलं, इतर कोणालाही पदक मिळवता आले नाही. त्यानंतर बॅडमिंटनवर सर्वाधिक खर्च झाला.
पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी आणि एचएस प्रणॉय यांनी बॅडमिंटनमध्ये भाग घेतला. त्यांच्या प्रशिक्षणावर एकूण 72.03 कोटी रुपये खर्च झाले. मात्र, कोणालाही पदक जिंकता आले नाही. बॉक्सिंग या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये लोव्हलिना बोरगोहेन आणि निखत जरीनसह 6 बॉक्सर्सनी भाग घेतला. त्याच्या प्रशिक्षणासाठी 60.93 कोटी रुपये खर्च झाले. शूटिंग स्पोर्ट्सवर 60.42 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिळून 2 पदके जिंकली. हॉकी प्रशिक्षणासाठी 41.3 कोटी रुपये आणि कुस्ती प्रशिक्षणासाठी 37.8 कोटी रुपये खर्च आला. तिरंदाजीसाठी 39.18 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
भारताने एकून 6 पदके जिंकलीत यामध्ये 4 पदके वैयक्तिक आणि 2 पदके सांघिक खेळांमध्ये जिंकलीत. नीरज चोप्राच्या प्रशिक्षणासाठी सर्वाधिक 5.72 कोटी रुपये खर्च झाला. मबाजीत कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरवर1.68 कोटी रुपये आणि संघ स्पर्धेत तिला साथ देणाऱ्या सरबज्योत सिंगच्या प्रशिक्षणावर 1.46 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसाळेला 1.6 कोटी तर पदक विजेत्यांमध्ये सर्वात कमी खर्च कुस्तीपटून अमन सेहरावतवर झाला.
सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर राहणाऱ्या विनेश फोगाटवर सर्वात कमी म्हणजे 70.45 लाख रुपये खर्च झाला. सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या जोडीवर सर्वात जास्त 5.32 कोटी खर्च केले गेले. तर पीव्ही सिंधूवर 3.13 कोटी, मीराबाई चानू 2.74 कोटी, निश भानवालावर 2.41 कोटी रुपये, रोहन बोपन्नावर 1.56 कोटी रुपये, मनिका बत्रावर 1.3 कोटी रूपये खर्च झाले होते.