Vinesh Phogat अपात्रेप्रकरणी प्रकरणी CAS कडून मोठी अपडेट, निर्णय काय?
Vinesh Phogat Case Result Update: महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपत्रातेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या क्रीडा लवादाकडून काय अपडेट आली आहे.
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सीएएस अर्थात कोर्ट ऑफ अबिट्रेशन ऑफ स्पोर्ट या क्रीडा न्यायलयाने विनेश फोगाट हीच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल हा राखीव ठेवला आहे. आता याबाबतचा निकाल हा 3 दिवसांनी देण्यात येणार आहे. विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही, याबाबतचा निकाल हा आता 16 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारतीयांना 16 ऑगस्टची प्रतिक्षा करावी लागणार आहे. विनेश फोगाट हीला पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेदरम्यान वाढीव वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर विनेशने या निर्णयाला आव्हान देत क्रीडा लवादात धाव घेतली होती. या प्रकरणात काय निर्णय येतो याकडे साऱ्या भारतीयांचं लक्ष लागून आहे.
तिसऱ्यांदा निर्णय लांबणीवर, नक्की प्रकरण काय?
विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सहभागी झाली. विनेशने मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी सलग 3 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. विनेशने उपांत्य फेरीतील सामना जिंकून रौप्य पदक निश्चित केलं. विनेश ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात कुस्ती फायनलमध्ये पोहचणारी पहिली भारतीय ठरली. त्यामुळे आता भारताला विनेश सुवर्ण पदकाची आशा होती. विनेशचा 7 ऑगस्टला अंतिम फेरीतील सामना होणार होता. मात्र समस्त भारतीयांसाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून सामन्याच्या काही तासांआधी झटका देणारी बातमी समोर आली आहे.
विनेशच्या निकालाबाबत तारीख पे तारीख
#WATCH | Delhi: On the Court of Arbitration for Sport (CAS) hearing verdict, Vidushpat Singhania, IOA advocate says, “The decision has not come yet, CAS has just informed that they have taken a time extension till 16th August, 6:30 PM (Paris Time). We are also unaware of the… pic.twitter.com/O4m2mWRUEd
— ANI (@ANI) August 13, 2024
विनेश फोगाट हीचं सुवर्ण पदकाच्या सामन्याआधी मर्यादेपेक्षा 100 ग्राम वजन जास्त आढळलं. त्यामुळे विनेशला तडकाफडकी अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर विनेशने 9 ऑगस्ट रोज क्रीडा लवादात धाव घेतली. हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या 2 ज्येष्ठ वकिलांनी क्रीडा न्यायलयात विनेशची बाजू मांडली. जोरदार युक्तीवाद करण्यात आला. एकूण 3 तास युक्तीवाद झाला. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी निकाल येणार होता. सर्वांचे डोळे या निर्णयाकडे लागले होते. मात्र 10 ऑगस्टला निर्णय लांबवण्यात आला. या प्रकरणात निर्णय 11 ऑगस्टला सुनावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर 11 ऑगस्टला पुन्हा तेच झालं. अपात्रतेप्रकरणाचा निकाल हा 13 ऑगस्टला येणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर 48 तासांनी म्हणजेच आज (13 ऑगस्ट) निकाल लांबवणीवर पडला आहे. आता शुक्रवारी तरी या प्रकरणाचा निकाल लागतो का? याकडे साऱ्याचं लक्ष असणार आहे.