Olympics 2024: Hockey Team Indiaचा पहिला सामना केव्हा? पाहा संपूर्ण वेळापत्रक
Hockey Team India Schedule Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत हॉकी टीम इंडिया बी ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियाला साखळी फेरीत एकूण 5 सामने खेळणार आहे.
भव्यदिव्य आणि ऐतिहासिक उद्घाटन समारंभानंतर अखेर बहुप्रतिक्षित पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चीनने पहिल्याच दिवशी ताज्या आकडेवारीनुसार आपल्या खात्यात 2 सुवर्ण पदकं जोडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या काही खेळाडूंचं आव्हान हे पहिल्याच दिवशी संपुष्टात आलं आहे. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. चाहत्यांना सांघिक पातळीवर भारतीयांना आपल्या हॉकी टीमकडून पदकाची अपेक्षा आहे. हॉकी टीम इंडिया या ऑलिम्पिकमध्ये एकूण 5 सामने खेळणार आहे. त्यानिमित्ताने आपण भारतीय हॉकी संघाच्या सामन्यांचं वेळापत्रक जाणून घेऊयात.
हॉकी टीम इंडियाचा ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी ही ऐतिहासिक अशी आहे. टीमने एकूण 8 वेळा सुवर्ण पदक पटकावलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक मध्ये हॉकी टीमने 41 वर्षांनंतर पदक मिळवलं. त्यामुळे यंदाही भारताला हॉकी टीमकडून पदकाची आशा आहे. यंदा ऑलिम्पिकमध्ये हॉकी टीम इंडियाचा सलामीचा सामना हा 27 जुलै रोजी आहे. टीम इंडिया यंदा बी ग्रुपमध्ये आहे.
हॉकी टीम इंडियासमोर पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरुवात होणार आहे. “आमची टीम चांगली आहे. आम्ही सराव केला आहे. आम्हाला आमच्या तयारीवर पूर्णपणे विश्वास आहे”, असा विश्वास कॅप्टन हरमनप्रीत सिंग याने व्यक्त केला आहे.
दरम्यान टीम इंडियाने ऑलिम्पिकमधील मुख्य सामन्याआधी मलेशिया, नेदरलँड्स, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटेन विरुद्ध सराव सामने खेळले आहेत. या सरावाचा फायदा भारताला मुख्य सामन्यांमध्ये होऊ शकतो. भारतासोबत बी ग्रुपमध्ये बेल्जियम, अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर ए ग्रुपमध्ये नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटेन, स्पेन, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका आहे.
हॉकी टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक
Mark your calendars!
Here’s when and where you can catch Team India in action at the Paris Olympics 2024. 🏑🔥
Watch it all go down live on @JioCinema and @Sports18 #HockeyIndia #IndiaKaGame #HockeyLayegaGold #Paris2024 #Hockey #IndiaAtParis #Cheer4Bharat #WinItForSreejesh .… pic.twitter.com/kcCuPdT9tF
— Hockey India (@TheHockeyIndia) July 26, 2024
हॉकी टीम इंडिया : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग (उपकर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), मनप्रीत सिंग (मिडफिल्डर), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित, संजय, राज कुमार पॉल, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद , अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग.
राखीव खेळाडू: गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक, मिडफिल्डर नीलकंठ शर्मा आणि बचावपटू जुगराज सिंग.