Paris Olympics 2024: भारताच्या या राज्यातून स्पर्धेसाठी सर्वाधिक खेळाडूंची निवड, जाणून घ्या 117 चमूबाबत

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेपेक्षा चांगली कामगिरी करतील असा विश्वास आहे. भारताचे 117 खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यामुळे यावेळी पदकांचा दुहेरी आकडा गाठणार असा विश्वास आहे. भारतातून हरयाणातून सर्वाधिक खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राज्यातून कोण ते

Paris Olympics 2024: भारताच्या या राज्यातून स्पर्धेसाठी सर्वाधिक खेळाडूंची निवड, जाणून घ्या 117 चमूबाबत
Image Credit source: Paris Olympics 2024
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 5:48 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे. भारतीय चमूत एकूण 117 खेळाडूंचा समावेश आहे. यात 70 पुरुष आणि 47 महिला खेळाडू सहभागी आहेत. भारताने मागच्या पर्वात अर्थात टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एका सुवर्ण पदकासह सात पदकं मिळवली होती. आता त्यापेक्षा जास्त पदकांची अपेक्षा आहे. भारताचे 117 खेळाडू 69 क्रीडा स्पर्धांसमध्ये सहभागी होणार आहेत. यात भारतातील हरयाणा आणि पंजाबमधून सर्वाधिक खेळाडूंची निवड झाली आहे. या दोन राज्यातून एकूण 42 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 117 खेळाडूंच्या चमूत एकूण 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूंचा समावेश आहे. हरयाणातून 24, तर पंजाबमधून 18 खेळाडू निवडले गेले आहेत.पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय दलातील शटलर तनिषा क्रास्टो ही एकमेव खेळाडू अशी आहे की तिचा जन्म देशाबाहेर झाला आहे. क्रॅस्टोचा जन्म दुबईत झाला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रत्येक राज्यातील खेळाडूंची नावं

हरयाणा : भजन कौर – तिरंदाजी (महिला वैयक्तिक, संघ), किरण पहल – ऍथलेटिक्स (महिला 400 मी, 4×400 मी रिले), नीरज चोप्रा – ऍथलेटिक्स (पुरुष भालाफेक), अमित पंघल – बॉक्सिंग (पुरुष 51 किलो), जास्मिन लॅम्बोरिया – बॉक्सिंग (महिला 57 किलो), निशांत देव – बॉक्सिंग (पुरुष 71  किलो), प्रीती पवार – बॉक्सिंग (महिला 54 किलो), दीक्षा डागर – गोल्फ (महिला वैयक्तिक), संजय – पुरुष हॉकी संघ, सुमित – पुरुष हॉकी संघ, बलराज पनवार – रोईंग (पुरुष एकल स्कल्स),अनिश भानवाला – नेमबाजी (पुरुषांची 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल), मनू भाकर – नेमबाजी (महिला 10 मीटर एअर पिस्तूल)महिला 25 मीटर पिस्तूल), रमिता जिंदाल – नेमबाजी (महिला 10 मीटर एअर रायफल), राइझा ढिल्लन – नेमबाजी (महिला स्कीट), रिदम सांगवान – नेमबाजी (महिला 10 मीटर एअर पिस्तूल), सरबज्योत सिंग – नेमबाजी (पुरुषांची 10 मीटर एअर पिस्तूल), सुमित नागल – टेनिस (पुरुष एकेरी), अमन सेहरावत – कुस्ती (पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो), अंशू मलिक – कुस्ती (महिला 57 किलो), अंतीम पंघल – कुस्ती (महिला 53 किलो), निशा दहिया – कुस्ती (महिला 68 किलो), रितिका हुड्डा – कुस्ती (महिला 76 किलो), विनेश फोगट – कुस्ती (महिला 50 किलो)

पंजाब : अक्षदीप सिंग – ऍथलेटिक्स (पुरुषांची 20 किमी शर्यत चालणे), तजिंदरपाल सिंग तूर – ऍथलेटिक्स (पुरुषांचे शॉटपुट), विकास सिंग – ऍथलेटिक्स (पुरुषांची 20 किमी शर्यत चालणे), गगनजीत भुल्लर – गोल्फ (पुरुष वैयक्तिक), गुरजंत सिंग – पुरुष हॉकी संघ, हार्दिक सिंग – पुरुष हॉकी संघ, हरमनप्रीत सिंग – पुरुष हॉकी संघ, जर्मनप्रीत सिंग – पुरुष हॉकी संघ, जुगराज सिंग – पुरुष हॉकी संघ (राखीव), कृष्ण बहादूर पाठक – पुरुष हॉकी संघ (राखीव), मनदीप सिंग – पुरुष हॉकी संघ, मनप्रीत सिंग – पुरुष हॉकी संघ, समशेर सिंग – पुरुष हॉकी संघ, सुखजीत सिंग – पुरुष हॉकी संघ, अंजुम मौदगिल – नेमबाजी (महिला 50  मीटर रायफल 3 पोझिशन), अर्जुन चीमा – नेमबाजी (पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल), सिफ्ट कौर समरा – नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स), संदीप सिंग – नेमबाजी (पुरुषांची 10 मीटर एअर रायफल), प्राची चौधरी कालियार- ऍथलेटिक्स (राखीव)

तामिळनाडू : जेस्विन आल्ड्रिन – ऍथलेटिक्स (पुरुषांची लांब उडी), प्रवील चित्रवेल – ऍथलेटिक्स (पुरुष तिहेरी उडी), राजेश रमेश – ऍथलेटिक्स (पुरुष 4×400 मीटर रिले), संतोष तमिलरासन – ऍथलेटिक्स (पुरुष 4×400 मीटर रिले), सुभा व्यंकटेशन – ऍथलेटिक्स (महिला 4×400 मीटर रिले), विथ्या रामराज – ऍथलेटिक्स (महिला 4×400 मीटर रिले), नेत्रा कुमनन – नौकानयन, विष्णु सरवणन – नौकानयन, इलावेनिल वालारिवन – नेमबाजी (महिलांची 10 मीटर एअर रायफल, 10 मीटर एअर रायफल मिश्र संघ), पृथ्वीराज तोंडैमन – नेमबाजी (पुरुषांचा सापळा), साथियान ज्ञानसेकरन – टेबल टेनिस (राखीव), शरथ कमल – टेबल टेनिस (पुरुष एकेरी, संघ), एन श्रीराम बालाजी – टेनिस (पुरुष दुहेरी)

कर्नाटक : पूवम्मा एमआर – ऍथलेटिक्स (महिला 4×400 मीटर रिले), अश्विनी पोनप्पा – बॅडमिंटन (महिला दुहेरी), अदिती अशोक – गोल्फ (महिला वैयक्तिक), श्रीहरी नटराज – जलतरण (पुरुषांची 100 मीटर बॅकस्ट्रोक), धिनिधी देसिंघू – जलतरण (महिला 200 मीटर फ्रीस्टाइल), अर्चना कामथ – टेबल टेनिस (महिला संघ)रोहन बोपण्णा – टेनिस (पुरुष दुहेरी)

उत्तर प्रदेश :अन्नू राणी – ऍथलेटिक्स (महिला भालाफेक), पारुल चौधरी – ऍथलेटिक्स (महिला 3000 मीटर स्टीपलचेस, महिला 5000 मीटर), प्रियांका गोस्वामी – ऍथलेटिक्स (महिलांची 20 किमी रेस वॉक), राम बाबू – ऍथलेटिक्स (पुरुषांची 20 किमी शर्यत चालणे), शुभंकर शर्मा – गोल्फ (पुरुष वैयक्तिक), ललित कुमार उपाध्याय – पुरुष हॉकी संघ, राजकुमार पाल – पुरुष हॉकी संघ

केरळ : अब्दुल्ला अबोबकर – ऍथलेटिक्स (पुरुषांची तिहेरी उडी), मोहम्मद अजमल – ऍथलेटिक्स (पुरुष 4×400 मीटर रिले), मोहम्मद अनस – ऍथलेटिक्स (पुरुषांची 4×400 मीटर रिले), मिजो चाको कुरियन – ऍथलेटिक्स (राखीव), पीआर श्रीजेश – पुरुष हॉकी संघ, एचएस प्रणॉय – बॅडमिंटन (पुरुष एकेरी)

महाराष्ट्र : प्रवीण जाधव – तिरंदाजी (पुरुष वैयक्तिक, पुरुष संघ), अविनाश साबळे – ऍथलेटिक्स (पुरुष 3000 मीटर स्टीपलचेस), सर्वेश कुशारे – ऍथलेटिक्स (पुरुष उंच उडी), चिराग शेट्टी – बॅडमिंटन (पुरुष दुहेरी), स्वप्नील कुसाळे – नेमबाजी (पुरुषांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन)

उत्तराखंड : अंकिता ध्यानी – ऍथलेटिक्स (महिला ५००० मी), परमजीत बिष्ट – ऍथलेटिक्स (पुरुषांची 20 किमी शर्यत चालणे), सूरज पनवार – ऍथलेटिक्स (मॅरेथॉन शर्यतीत वॉक मिश्र रिले), लक्ष्य सेन – बॅडमिंटन (पुरुष एकेरी)

आंध्र प्रदेश : ज्योती याराजी – ऍथलेटिक्स (महिला १०० मीटर अडथळा), धीरज बोम्मदेवरा – धनुर्विद्या, ज्योतिका श्री दांडी – ऍथलेटिक्स (महिला 4×400 मीटर रिले), सात्विकसाईराज रँकीरेड्डी – बॅडमिंटन (पुरुष दुहेरी)

तेलंगणा : पीव्ही सिंधू – बॅडमिंटन (महिला एकेरी), निखत जरीन – बॉक्सिंग (महिला 50 किलो), ईशा सिंग – नेमबाजी (महिला 25 मीटर पिस्तूल), श्रीजा अकुला – टेबल टेनिस (महिला एकेरी, संघ)

दिल्ली : अमोज जेकब – ऍथलेटिक्स (पुरुष 4×400 मीटर रिले), तुलिका मान – ज्युडो (महिला +78 किलो), राजेश्वरी कुमारी – नेमबाजी (महिला सापळा), मनिका बत्रा – टेबल टेनिस (महिला एकेरी)

पश्चिम बंगाल : अंकिता भकत – तिरंदाजी (महिला वैयक्तिक, महिला संघ), अनुष अग्रवाला – घोडेस्वार (ड्रेसेज इव्हेंट), अहिका मुखर्जी – टेबल टेनिस (राखीव)

चंदीगड : अर्जुन बबुता – नेमबाजी (पुरुषांची 10 मीटर एअर रायफल, 10 मीटर एअर रायफल मिश्र संघ), विजयवीर सिद्धू – नेमबाजी (पुरुषांची 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल)

गुजरात : हरमीत देसाई – टेबल टेनिस (पुरुष एकेरी, संघ), मानव ठक्कर – टेबल टेनिस (पुरुष संघ)

आसाम : लोव्हलिना बोर्गोहेन – बॉक्सिंग (महिला 70 किलो)

बिहार : श्रेयसी सिंग – नेमबाजी (महिला सापळा)

गोवा : तनिषा क्रास्टो – बॅडमिंटन (महिला दुहेरी)

झारखंड : दीपिका कुमारी – तिरंदाजी (महिला वैयक्तिक, महिला संघ)

मध्य प्रदेश : विवेक सागर प्रसाद – पुरुष हॉकी संघ, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर – नेमबाजी (पुरुषांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन)

मणिपूर : मीराबाई चानू – वेटलिफ्टिंग (महिला49  किलो), नीलकांत शर्मा – पुरुष हॉकी संघ (राखीव)

ओडिशा : अमित रोहिदास – पुरुष हॉकी संघ, किशोर जेना – ऍथलेटिक्स (पुरुष भालाफेक)

राजस्थान : अनंतजीत सिंग नारुका – नेमबाजी (पुरुष स्कीट, स्कीट मिश्र संघ), महेश्वरी चौहान – नेमबाजी (महिला स्कीट आणि स्कीट मिश्रित संघ)

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.