Olympics 2024: पैलवान अमन सेहरावतला कांस्य पदक, 16 वर्षांची परंपरा कायम

Wrestler Aman Sehrawat Bronze Medal Paris Olympics 2024: भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील एकूण सहावं तर कुस्तीतील पहिलं पदक मिळालं आहे. अमन सेहरावतने पोर्तो रिकोच्या पैलवानावर एकतर्फी विजय मिळवला.

Olympics 2024: पैलवान अमन सेहरावतला कांस्य पदक, 16 वर्षांची परंपरा कायम
aman sehrawat bronze medal paris olympics
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 12:38 AM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताला या स्पर्धेतील एकूण सहावं तर कुस्तीतलं पहिलंवहिलं पदक मिळालं आहे. भारताचा 21 वर्षीय युवा पैलवान अमन सेहरावत याने 57 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे. अमनने पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझ याच्यावर एकतर्फी विजय मिळवला. अमनने डेरियन क्रूझवर 13-5 अशा फरकाने विजय मिळवला. अमन सेहरावत याने अशाप्रकारे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 9 ऑगस्टचा शानदार शेवट केला. अमनच्या या कामगिरीनंतर त्याचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.

सामन्यात काय घडलं?

या 5 मिनिटांच्या सामन्यात सुरुवातीला पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझ याने आघाडी घेतली. मात्र अमनने कमबॅक केलं. अमन पहिल्या राउंडमध्ये 4-3 ने आघाडीवर राहिला. त्यानंतर अमनने दुसऱ्या राउंडमध्ये क्रूझला एकतर्फी मात दिली. अमनने अखेरपर्यंत मोठ्या फरकाने आघाडी कायम राखली आणि दणदणीत विजय मिळवला. अमितच्या या विजयानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला.

अमन कुस्तीचा वारसा जपण्यात यशस्वी

अमन सेहरावत हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सहभागी झालेला एकमेव पुरुष पैलवान होता. त्यामुळे एकट्या अमनवर भारताला कुस्तीत पदक मिळवून देण्याची जबाबदारी होती. अमनने ही जबाबदारी सार्थपणे पार पाडली. अमन यासह ऑलिम्पिकच्या इतिहासातील 16 वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये 2008 पासून कुस्तीत सातत्याने पदक जिंकण्याची मालिका सुरु केली. ती आता 16 वर्षांनंतर 2024 मध्ये अमनने कायम ठेवली आहे.

भारतासाठी 2008 साली सुशील कुमार याने कांस्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर सुशीलने 2012 साली रौप्य पदकाची कमाई केली. रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये महिला पैलवान साक्षी मलिक हीने भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. साक्षी यासह कुस्तीत ऑलिम्पिक मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. तसेच 2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनिया या दोघांनी भारताला कुस्तीत पदक मिळवून दिलं. तर आता अमनने ही मालिका यशस्वीपणे कायम ठेवलीय.

अमनला कुस्तीत कांस्य, 16 वर्षांची परंपरा कायम

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे भारतीय कुस्तीपटू

  • खाशाबा जाधव-कांस्य, 1952 हेल्सिंकी
  • सुशील कुमार-कांस्य, 2008 बीजिंग
  • सुशील कुमार-रौप्य, 2012 लंडन
  • योगेश्वर दत्त-कांस्य, 2012 लंडन
  • साक्षी मलिक-कांस्य, 2016 रियो
  • रवी दहिया-रौप्य, 2020 टोक्यो
  • बजरंग पूनिया-कांस्य, 2020 टोक्यो
  • अमन सेहरावत-कांस्य, 2024 पॅरिस
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.