Paris Olympics 2024: नीरज चोप्रा याचं विनेश फोगाट प्रकरणावरुन चाहत्यांना आवाहन, म्हणाला…
Neeraj Chopra On Vinesh Phogat Disqualfication Case: भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सलग 2 पदकं जिंकणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याने विनेश फोगाट प्रकरणावर सर्वांनाच एक आवाहन केलंय.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताने आतापर्यंत 6 पदकं जिंकली आहेत. भारताला नेमबाजी, हॉकी, भालाफेक आणि कुस्तीतून पदकं मिळाली आहेत. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिकमधील एकूण पाचवं आणि पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं. नीरजने भालाफेकीत रौप्य पदकाची कमाई केली. तर दुसऱ्या बाजूला वाढीव वजनामुळे महिला पैलवान विनेश फोगाट हीला वाढीव वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं. विनेशला रौप्य मिळणार की नाही, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. विनेशला पदक मिळाल्यास ते भारताचं एकूण सातव पदक ठरेल. मात्र त्याआधी नीरज चोप्रा याने विनेश फोगाट अपात्रता प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. नीरजने सर्वांना एक आवाहन केलं आहे.
विनेशचं प्रकरण हे सध्या न्यायप्रविष्ठ आहे. विनेशने तिला अपात्र ठरवल्यानंतर क्रीडा लवादात धाव घेतली. हरीष साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांनी विनेशची बाजू मांडली. तब्बल 3 तास युक्तीवाद चालला. त्यानंतर आता 10 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी या प्रकरणाव निकाल येणार आहे. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने भारताच्या बाजूने निकाल दिल्यास विनेशला रौप्य पदक मिळणार आहे. या निकालाकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे.
नीरज काय म्हणाला?
नीरजने रौप्य पदक मिळवल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. नीरजला या दरम्यान विनेशबाबत प्रश्न विचारण्यात आला. विनेशने या प्रकरणावर मनं जिंकणारं उत्तर दिलं. ” नक्कीच, आपल्या सर्वांना माहित आहे. मेडल मिळालं तर चांगलंच राहिल. मेडल मिळालं नाही तर…, आपल्या साऱ्यांना माहित आहे की परिस्थिती तशी नसती तर आपलं पदक हे निश्चित होतं. पदक मिळालं तर फारच चांगलं आहे. पण जोवर मेडल आपल्याला मिळत नाही, तोवर ती एक धाकधूक असतेच. लोकं काही दिवस लक्षात ठेवतात. तुम्ही आमच्यासाठी चॅम्पियन आहात, असं म्हणतात. पण जोवर तुम्ही मेडल मिळवत नाही तर ते लवकर विसरुनही जातात. मला हीच भीत आहे बास्स”, असं नीरजने म्हटलं.
नीरजचं सर्वांना आवाहन
#WATCH | Paris: On Sports Court CAS’s hearing of Indian wrestler Vinesh Phogat, Olympic Silver medallist, Javelin thrower Neeraj Chopra says “All of us know that if she gets the medal it will be really good. She would have got the medal if such a situation did not arise. If we… pic.twitter.com/TtKWF11Yzk
— ANI (@ANI) August 10, 2024
“जर लोकं विसरली नाहीत, तर मेडल आहे काय नाही काय, फरक पडत नाही. त्यामुळे माझं सर्वांना आवाहन आहे की विनेशने जे देशासाठी केलंय. ते विसरु नका”, असं आवाहन नीरजने देशवासियांना केलं आहे.