Paris Olympics 2024 live stream: ऑलिम्पिक स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून घ्या सर्वकाही

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या काही तासातच या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी पॅरिसमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ओपनिंग सेरेमनीसाठी कोणतं अॅप डाऊनलोड करायचं ते भारतीय वेळेनुसार ही स्पर्धा कधी सुरु होणार? ते सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर

Paris Olympics 2024 live stream: ऑलिम्पिक स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून घ्या सर्वकाही
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 9:59 PM

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संपूर्ण जग सज्ज झालं आहे. चार वर्षांनी भरणाऱ्या क्रीडाकुंभात 200 हून अधिक देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. जवळपास 10,500 खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. भारताकडून 117 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होणार असून 11 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे 16 दिवसात क्रीडाप्रेमींना विविध खेळांची अनुभूती घेता येणार आहे. 26 जुलैला ओपनिंग सेरेमनी असणार आहे. त्यामुळे हा सोहळा याची देहि याची डोळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज आहेत. पण प्रत्येकाला पॅरिसमध्ये जाता येईल असं नाही. तुम्हालाही या स्पर्धेचा रंगारंग कार्यक्रम पाहण्याची इच्छा असेल तर नाराज होऊ नका. घरबसल्या तुम्ही हा सोहळा फ्रीमध्ये पाहू शकता. 26 जुलैला रात्री 11 वाजता हा सोहळा सुरु होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 जुलैपर्यंत रात्री 2 वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे. त्यामुळे हा सोहळा कुठे पाहायचा असा प्रश्न पडला असेल, तर पुढे तुम्हाला याची इंत्यभूत माहिती मिळेल.

भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता 26 जुलै2024 रोजी पॅरिस ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनी सुरु होईल. लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तुम्हाला मोबाईल फोनमध्ये रिलायन्स जिओ कंपनीचा जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करावं लागले. हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा एपल स्टोरवरून डाउनलोड करू शकता. फोनमध्ये ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यात मोबाईल नंबर टाकला की ॲप सुरु होईल. यानंतर तुम्ही पॅरिस ओपनिंग सोहळा लाईव्ह पाहू शकता. ही सुविधा फ्रीमध्ये असणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. जिओ सिनेमाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून लाईव्ह पाहू शकता. इतकंच काय तर टीव्ही 9 मराठीवर तुम्हाला या प्रत्येक घडामोडींचे अपडेट मिळतील.

पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा ऐतिहासिक आहे कारण उद्घाटन सोहळा स्टेडियमच्या बाहेर होणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. उद्घाटन समारंभाला सुमारे 6 लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. 222000 मोफत तिकिटे, तर 10400 सशुल्क तिकिटे उद्घाटन समारंभासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पॅरिसमध्ये 80 मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. जेणेकरून संपूर्ण शहरातील लोकांना ते पाहता येईल.

धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...