Olympics 2024 Highlights And Update: भारताच्या खात्यात 6 पदकं, सातवं मिळणार की नाही? रविवारी ठरणार
Paris Olympics 2024 10 August Updates Highlights In Marathi: पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारताच्या मोहिमेची सांगता झाली आहे. भारताने यंदा एकूण 6 पदकं मिळवली. त्यात 5 कांस्य आणि 1 रौप्य पदकांचा समावेश राहिला. भारताला सातव्या पदकाची आशा आहे. क्रीडा लवादाने विनेश फोगाटच्या बाजूने निर्णय दिल्यास भारताला या स्पर्धेतील दुसरं रौप्य पदक मिळेल.
भारताच्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील मोहिमेची सांगता झाली आहे. भारताने पॅरिस ऑलिम्पिकमधील 15 दिवसांमध्ये एकूण 6 पदकं मिळवली. त्यातील 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक आहे. भारताला पहिली 3 पदकं ही नेमबाजीत मिळाली. त्यानंतर चौथं पदक (कांस्य) हे हॉकी टीमने मिळवून दिलं. पाचवं पदक हे भालाफेकीत मिळालं. नीरज चोप्राने भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. तर 21 वर्षीय अमन सेहरावत याने पदार्पणात भारताला कुस्तीत ब्रॉन्ज मेडल मिळवून देत गेल्या 16 वर्षांची परंपरा कायम ठेवली. तर भारताला 15 व्या दिवशी महिला पैलवान रितीका हुड्डाकडून पदकाची आशा होती. मात्र तीच्या प्रयत्नांना यश आलं नाही. भारताने अशाप्रकारे 6 पदकं मिळवली. तर सातवं पदक मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. महिला पैलवान विनेश फोगाट हीच्या रौप्य पदकाचं प्रकरण क्रीडा लवादाकडे आहे. क्रीडा लवाद याबाबतचा निर्णय रविवारी 11 ऑगस्ट रोजी देणार आहे. त्यामुळे आता साऱ्या भारतीयांचं लक्ष हे क्रीडा लवादाकडे असणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेची सांगता
भारताच्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील मोहिमेची सांगता झाली आहे. भारताला स्पर्धेतील आपल्या मोहिमेच्या शेवटच्या दिवशी कुस्तीत पदक मिळण्याची संधी होती. महिला पैलवान रितीका हुड्डाकडून पदकाची आशा होती. मात्र रितीकाचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. त्यामुळे भारताचं सातवं पदक हुकलं. त्यामुळे भारताला या स्पर्धेत केवळ 6 पदकांवरच समाधान मानावं लागलं आहे. आता भारताला सातवं पदक मिळणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीचं प्रकरण क्रीडा लवादाकडे आहे. या प्रकरणात रविवारी 11 ऑगस्ट रोजी निकाल येणार आहे. आता भारताच्या बाजूने निकाल लागल्यास भारताच्या खात्यात 7 पदकं होतील. आता हा निकाल बाजूने लागतो की विरोधात, हे येत्या काही तासात स्पष्ट होईल.
-
विनेशला रौप्य पदक मिळणार की नाही? आता 11 ऑगस्टला निकाल
विनेश फोगाट अपात्रताप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विनेशबाबतचा निर्णय हा 10 ऑगस्ट रोजी येणार नसल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता या प्रकरणातील अंतिम निर्णय हा रविवारी 11 ऑगस्ट रोजी येणार आहे.
-
-
ठाकरे गटाच्या मेळाव्यात दोन महिलांना मनसे कार्यकर्त्या समजून काढलं बाहेर
ठाण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्यात दोन महिलांना मनसे कार्यकर्त्या समजून बाहेर काढलं आहे. शहरप्रमुख कोण हे सांगता न आल्याने त्या मनसेच्या असल्याचा संशल आल्याने महिलांना बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
भारताला सातवं मेडल मिळणार? साडे नऊ वाजता समजणार
भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत आतापर्यंत पदकांचा षटकार ठोकला आहे. भारताला पहिले 3 पदकं हे नेमबाजीतून मिळाली. त्यानंतर हॉकी, भालाफेक आणि कुस्तीतून प्रत्येकी 1 पदक मिळालं. त्यानंतर आता रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी विनेश फोगाटच्या रौप्य पदकाबाबत निर्णय येणार आहे. हा निकाल भारताच्या बाजूने आल्यास खात्यात 7 पदकं होतील.
-
केशवराज भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
कोल्हापुरूमधील मुख्यमंत्र्यांकडून आग लागलेल्या केशवराज भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली जात आहे. सरकारने 10 कोटींची मदत या नाट्यागृहाच्या पुर्नबांधणीसाठी केली आहे.
-
-
विनेश फोगट प्रकरणाचा निकाल रात्री 9.30 वाजता
विनेश फोगट प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. ९ ऑगस्ट रोजी सीएएस लवाद डॉ. ॲनाबेल बेनेट यांनी विनेशला तिची बाजू मांडण्याची संधी दिली. एकूण 3 तास युक्तीवाद चालाल. त्यानंतर आता सीएएस आज रात्री 9.30 वाजता या प्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे.
-
रितीका हुड्डा क्वार्टर फायनलमध्ये पराभूत
महिला पैलवान रितीका हुड्डाचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला आहे. रितीकाला 76 किलो वजनी गटात जगातील नंबर 1 पैलवान एडपेरी मेडेट कायजीकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. रितीकाने हंगेरीच्या बर्नाडेट नेगी हीचा 12-2 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता.
-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील 15 वा दिवस, भारताकडे 6 पदकं
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचा आजचा (10 ऑगस्ट) 15 वा दिवस आहे. भारताने आतापर्यंत 14 दिवसांमध्ये 5 कांस्य आणि 1 रौप्य पदकासह भारताने एकूण 6 मेडल मिळवले आहेत. भारताला 15 व्या दिवशी सातवं आणि कुस्तीतलं दुसरं पदक मिळवण्याची संधी आहे. पुरुष पैलवान अमन सेहरावत याने भारताला सहावं पदक मिळवून दिलं. त्यानंतर आता रितिका हुड्डाला कुस्तीत पदक मिळवण्याची संधी आहे. तसेच महिला पैलवान विनेश फोगाट प्रकरणाच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
भारताचं 15 व्या दिवसाचं वेळापत्रक
#TeamIndia‘s Day 1⃣5⃣ schedule of #ParisOlympics2024👇
As the Indian contingent’s journey at #Paris2024 nears towards an end, check out the remaining events in line to take place tomorrow.
Make sure to extend your support and #Cheer4Bharat🇮🇳 in the comments section⬇️🥳… pic.twitter.com/qErcOQ7gwj
— SAI Media (@Media_SAI) August 9, 2024
Published On - Aug 10,2024 4:40 PM