Olympics 2024 Highlights And Update: मनुला कांस्य, इतर खेळाडूंचाही धमाका, भारतासाठी असा राहिला दुसरा दिवस, जाणून घ्या 29 जुलैचं वेळापत्रक
Paris Olympics 28 July Updates Highlights In Marathi : भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत पहिलंवहिलं पदक मिळवलं. नेमबाज मनू भाकर हीने कांस्य पदक जिंकून भारताचं खात उघडलं. तर इतर खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे. जाणून घ्या भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी काय काय केलं?
भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिल्या दिवशी अर्थात 27 जुलैला पदक जिंकता आलं नाही. मात्र नेमबाज मनु भाकर हीने तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत धडक मारली. तर त्यानंतर मनूने 28 जुलै हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरवला. भारताने रविवारी ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाचं खातं उघडलं. नेमबाज मनु भाकर हीने भारतालं पहिलं आणि कांस्य पदक मिळवून दिलं. मनूने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ही कामगिरी केली. मनुने यासह इतिहास रचला. मनू भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी एकूण पाचवी तर पहिली महिला नेमबाज ठरली. तसेच इतर खेळाडूंनीही शानदार कामगिरी करत मेडल्सच्या दिशेने एक पाउल पुढे टाकंल आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
29 July 2024 Paris Olympic India Schedule: भारताचं तिसऱ्या दिवसाचं वेळापत्रक
मनु भाकर हीने जिंकलेलं कांस्य पदक आणि इतर भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांना स्पर्धेतील तिसऱ्या दिवशीही अनेक आशा आहे. भारताचे स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी 29 जुलै रोजी पदकासह इतर सामने होणार आहे. भारताच्या तिसऱ्या दिवसातील सामन्यांचं वेळापत्रक जाणून घ्या.
टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी 3 पदकाची संधी, असं आहे वेळापत्रक
🗓 𝗗𝗔𝗬 𝟯 𝗮𝗻𝗱 𝗮 𝗰𝗵𝗮𝗻𝗰𝗲 𝘁𝗼 𝗮𝗱𝗱 𝟯 𝗺𝗼𝗿𝗲 𝗺𝗲𝗱𝗮𝗹𝘀! As we move on to day 3 of #Paris2024, here are some key events lined up for tomorrow 👇
🔫 Ramita Jindal and Arjun Babuta will feature in the finals of the women’s and men’s 10m Air Rifle events… pic.twitter.com/q8wTmNSZdg
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 28, 2024
-
मनुला कांस्य, इतर खेळाडूंचाही धमाका, भारतासाठी असा राहिला दुसरा दिवस
भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधील 28 जुलै हा दिवस ऐतिहासिक ठरला. भारताने रविवारी ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाचं खातं उघडलं. नेमबाज मनु भाकर हीने भारतालं पहिलं आणि कांस्य पदक मिळवून दिलं. मनूने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ही कामगिरी केली. मनुने यासह इतिहास रचला. मनू भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी एकूण पाचवी तर पहिली महिला नेमबाज ठरली. तसेच इतर खेळाडूंनीही शानदार कामगिरी करत मेडल्सच्या दिशेने एक पाउल पुढे टाकंल आहे.
- रमिता जिंदल हीने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. रमिताने 631.5 गुणांसह पाचवं स्थान पटकावलं.
- अर्जुन बबूता याने 10 मीटर मेन्स एअर रायफल प्रकारातील पात्रता फेरीत आठवं स्थान पटकावलं आणि फायनलमध्ये धडक दिली. अर्जुन बबूताचा अंतिम फेरीतील सामना हा सोमवारी 29 जुलै रोजी होणार आहे.
- बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने मालदीवच्या फतिमथ नबाहा अब्दुल रज्जाक हीचा 21-09, 21-06 अशा फरकाने धुव्वा उडवला. टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हीने शानदार कामगिरी केली. सिंगल इवेंटमध्ये तिचा सामना स्वीडनच्या क्रिस्टीना कालबर्ग विरुद्ध झाला. श्रीजाने हा सामना 4-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकला. श्रीजाने यासह 32 व्या राउंडमध्ये धडक मारली आहे.
- बॉक्सर निखत जरीन हीने पहिल्या सान्यात मॅक्सी कॅरिना क्लोएत्जरवर 5-0 ने मात करत राउंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं आहे. आता निखतचा पुढील सामना हा 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. या सामन्यात निखतसमोर चीनच्या वू यू हीचं आव्हान असणार आहे.
-
-
ग्वाटेमालाच्या केविन कोरडनची दुखापतीमुळे माघार
ऑलिम्पिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. ग्वाटेमालाच्या केविन कोरडन याने दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. मात्र त्याच्या या निर्णयामुळे भारताला फटका बसला आहे. भारताच्या लक्ष्य सेन याने कोरडनचा पराभव केला होता. मात्र आता त्याने माघार घेतल्याने लक्ष्यचा तो विजय ग्राह्य धरला जाणार नाही. त्याचा फटका असा की, लक्ष्यने 3 सामने खेळल्यानंतरही फक्त 2 सामन्यांचे निकालच लक्षात घेतले जातील.
-
प्रणॉयचं जोरदार कमबॅक, पहिल्या सामन्यात विजय
बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने पुरुष एकेरीत शानदार सुरुवात करत विजय मिळवला आहे. प्रणॉय सामन्यात पिछाडीवर पडला होता. मात्र त्यानंतर प्रणॉयने जोरदार कमबॅक करत 21-18, 21-12 अशा फरकाने विजय मिळवला. प्रणॉयने जर्मनीच्या फॅबियनचा धुव्वा उडवला आणि विजयी सुरुवात केली.
-
भारतीय महिलांची तिरंदाजीत निराशाजनक कामगिरी
तिरंदाजीत भारतीय महिला संघांने निराशा केली आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्याने आता मेडल्सची आशा मावळली आहे. नेदरलँड्सने टीम इंडियाचा 6-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला. दीपिका, अंकिता आणि भजन या तिघींचा भारतीय संघात समावेश होता.
-
-
रमीता जिंदल पॅरिस ऑलिम्पिक्स फायनलमध्ये पोहचणारी दुसरी नेमबाज
रमीता जिंदल पॅरिस ऑलिम्पिक्स फायनलमध्ये पोहचणारी दुसरी नेमबाज ठरली आहे. रमीताने वूमन्स 10 मीटर एअर रायफल पात्रता फेरीत 631.5 गुणांसह पाचवं स्थान पटकावलं. रमिताच्या आधी सुमा शिरुर या ऑलिम्पिक रायफल फायनलमध्ये पोहचणारी पहिला महिला ठरली होती. सुमा शिरुर या रमिताच्या कोच आहेत.
-
भारतीय जलतरणपटूची निराशाजनक कामगिरी
श्रीहरी नटराज आणि धीनिधी देसिंघू या दोघांनी अनुक्रमे मेन्स 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि वूमन्स 200 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेत. सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी पहिल्या 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणं बंधनकारक होतं.
-
मनु भाकरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत महिला नेमबाज मनु भाकर हीने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. तिने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक मिळवून दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली. मी गीता वाचली आहे. निकालावर नाही, कर्मावर लक्ष केंद्रीत करा, अखेरच्या क्षणी माझ्या मनात हेच सुरु होतं’, असं मनु भाकर म्हणाली.
-
भारताने कांस्य पदकाने खातं उघडलं, नेमबाज मनु भाकरला कांस्य
भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी पदकाचं खातं उघडलं आहे. नेमबाज मनु भाकर हीने एअर पिस्तुलमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे.
मनू भाकरला कांस्य पदक
🇮🇳🥉 𝗕𝗥𝗢𝗡𝗭𝗘 𝗕𝗥𝗜𝗟𝗟𝗜𝗔𝗡𝗖𝗘! Manu Bhaker wins India’s first medal at #Paris2024 and what a way to do so! From heartbreak at Tokyo to winning a Bronze at Paris, Manu Bhaker’s redemption story has been wonderful to witness.
🔫 A superb effort from her and here’s hoping… pic.twitter.com/O7tqOuGFTa
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 28, 2024
-
नेमबाज मनु भाकरच्या सामन्याला सुरुवात, भारताला पदकाची आशा
नेमबाज मनु भाकरच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. मनु भारताला मेडल मिळवून देणार की नाही? हे या सामन्याच्या निकालातून स्पष्ट होईल. मनुचा विजय झाल्यास भारताचं ऑलिम्पिकमधील पदकाचं खातंही उघडेल.
मनु भाकरचा सामना सुरु
🇮🇳🔫 𝗟𝗜𝗩𝗘 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: #Shooting – Women’s 10m Air Pistol (Final): 14 shots completed
– Manu Bhaker currently stands at #03. Medal hopes look bright for now!
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀…
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 28, 2024
-
भारताचे आजचे सामने
टीम इंडियाचे खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, बॅडमिंटन, रोईंग, टेबल टेनिस, आर्चरी, स्वीमिंग, बॉक्सिंग आणि टेनिस या खेळात आज 28 जुलै रोजी आपला दावा आणखी मजबूत करणार आहे.
Published On - Jul 28,2024 3:44 PM