Olympics 2024 Highlights And Update: भारताला चौथ्या दिवशी आणखी एक पदक, मनू भाकरचा डबल धमाका, सरबज्योतची कडक ‘ओपनिंग’
Paris Olympics 30 July Updates Highlights In Marathi: पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील चौथ्या दिवशी महिला नेमबाज मनु भाकर हीने डबल धमाका करत इतिहास रचला आहे. मनु एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. मनुने वैयक्तिक पदक मिळवल्यानंतर तिने मिश्र दुहेरीत सरबजोत सिंह याच्यासह भारताला एकूण दुसरं कांस्य पदक मिळवून दिलं.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी मनु भाकरने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. मात्र तिसऱ्या दिवशी भारताचे बहुतेक खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात एकही पदकाची भर पडू शकली नाही. त्यामुळे चौथ्या दिवशी भारताला पदकाची आशा होती. मनु भाकेर हीने मिश्र दुहेरीत सरबज्योत सिंह याच्यासह भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. त्यामुळे भारताच्या खात्यात दुसऱ्या पदकाची भर पडली. सरबज्योत सिंहने ऑलिम्पिक पदार्पणातच पदक मिळवून इतिहास रचला.
LIVE NEWS & UPDATES
-
भारताचं पाचव्या दिवसाचं वेळापत्रक, जाणून घ्या
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या पाचव्या दिवशी अर्थात 31 जुलै रोजी अनेक सामने होणार आहेत. शूटिंग, बॅडमिंटन (पुरुष आणि महिला एकेरी), रोईंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग, तिरंदाजी अशा अनेक क्रीडा प्रकारातील सामेन होणार आहेत. जाणून घ्या वेळापत्रक.
भारताचं 31 जुलैचं वेळापत्रक
🚨 Here’s our Schedule for tomorrow. Some exciting action lined up starting 12.30 pm IST.
Chalo #JeetKiAur #Cheer4Bharat | #IndiaAtParis24 pic.twitter.com/NGSn945z18
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2024
-
जस्मिन लांबोरिया बॉक्सिंगमध्ये पराभूत
जास्मिन लॅम्बोरिया हिला नेस्टी पेटेसिओविरुद्ध दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. सामना 0-5 असा गमावला.
-
-
अमित पंघाल पहिल्या फेरीतून बाहेर
अमित पंघालची ऑलिम्पिक मोहीम संपली आहे. तो पॅट्रिक चिनयेम्बाविरुद्ध 16 फेरीत पराभूत झाला. चिन्येम्बाने 4-1 ने पराभूत केलं.
-
तोंडाइमन 21 व्या स्थानावर राहिला, आव्हान संपुष्टात
भारतीय नेमबाज पृथ्वीराज तोंडाईमन ट्रॅप पुरुषांच्या पात्रता फेरीत 21 व्या स्थानावर राहिला. या प्रकारातील अव्वल सहा नेमबाजांनी अंतिम फेरी गाठली. तोंडाईमनने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केली. पण अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याची कामगिरी पुरेशी ठरली नाही.
-
अश्विनी पोनप्पा-तनिशा क्रेस्टो जोडीचा पराभव
बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा-तनिशा क्रेस्टो जोडीचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या म्पासा सेट्याना आणि यू एंजेला या जोडीने भारताचा 21-15, 21-10 अशा फरकाने पराभव केला आहे.
-
-
हॉकी टीम इंडियाचा विजय, आयर्लंडवर 2-0 ने मात
हॉकी टीम इंडियाने आयर्लंडवर 2-0 ने मात केली आहे. टीम इंडियाने या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियासाठी दोन्ही गोल हे कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने केले.
-
टीम इंडिया दुसऱ्या सत्रानंतर मजबूत स्थितीत, आयर्लंड विरुद्ध 2-0 ने आघाडी
हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात हॉकी टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध मजबूत आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून दोन्ही गोल हे कॅप्टन हरमनप्रीत याने केले.
-
टीम इंडियाचा दुसरा गोल, आयर्लंड विरुद्ध 2-0 ने आघाडी
हॉकी टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या क्वार्टमध्ये गोल केला आहे. टीम इंडियाने यासह आपली आघाडी आणखी मजबूत केली आहे. टीम इंडिया 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.
-
हॉकी टीम इंडियाने खातं उघडलं
हॉकी टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध गोल करत खातं उघडलं आहे. भारताने आयर्लंड विरुद्ध 1-0 ने आघाडी घेतली आहे.आता भारताचा आणखी एक गोल करुन आघाडी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.
-
हॉकी टीम इंडियाचा तिसरा सामना आयर्लंड विरुद्ध
हॉकी टीम इंडियाच्या तिसऱ्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा सामना दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी सुरु होणार आहे. भारतासमोर आयर्लंडचं आव्हान असणार आहे. भारताने याआधीच्या 2 सामन्यापैकी 1 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर दुसरा सामना हा बरोबरीत सोडवला. भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 3-2 ने विजय मिळवला. तर अर्जेंटिना विरुद्धचा सामना हा 1-1 ने बरोबरीत सोडवला.
-
मनु भाकर 3 ऑगस्टला मेडल्सची हॅटट्रिक करणार?
मनु भाकर हीने भारताला आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक आणि मिश्र अशा दोन्ही प्रकारात पदक मिळवली आहेत. त्यानंतर आता मनुला तिसरं पदक मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. मनुचा 25 मीटर एअर पिस्तुल प्रकारातील अंतिम सामना हा 3 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपासून होणार आहे. मनुने तिसरं पदक मिळवलं, तर ती एका स्पर्धेत 3 मेडल्स जिंकणारी पहिली भारतीय ठरेल.
-
मनिका बत्रा हीची ऐतिहासिक कामगिरी, मेडल्सच्या दिशेने एक पाउल पुढे
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मनिका राउंड 16 म्हणजेच प्री क्वार्टर फायनलमध्ये पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मनिकाने फ्रान्सच्या पृथिका पावडे हीचा 4-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला. त्यामुळे आता मनिकाकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत.
-
मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी, भारताला दुसरं पदक
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथ्या दिवशी भारताला मनू भाकरकडून दुसऱ्या पदकाची आशा होती. मनूने वैयक्तिक पदक मिळवल्यानंतर 10 मी एअर पिस्तुल मिश्र दुहेरीतही कांस्य पदकाची कमाई केली आहे. मनूने सरबज्योत सिंह याच्यासह मिश्र दुहेरीत ही कामगिरी केली. मनू यासह एका ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदकं जिंकणारी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.
Published On - Jul 30,2024 3:08 PM