पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अजूनही भारताची हवी तशी कामगिरी झालेली नाही. काही पदकं थोडक्यासाठी हुकली. मात्र अजूनही पदकं मिळवण्याची संधी आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदकं मिळवली होती. आता त्यापेक्षा जास्त पदकांची अपेक्षा आहे. मात्र अजूनतरी तशी काही शक्यता दिसत नाही. बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि शूटिंगमध्ये आशा आहे.
नोव्हाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक पुरुष टेनिसच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझचा पराभव केला. पहिल्यांदाच ऑलिम्पिक चॅम्पियन बनला आहे आणि सुवर्णपदक जिंकले आहे. जोकोविच आणि अल्काराझ यांच्यात पहिल्या सेटपासूनच रोमांचक लढत पाहायला मिळाली. जोकोविचने हा सामना 7-6, 7-6 असा जिंकला.
पुरुषांच्या नेमबाजी 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा पडली. विजयवीर सिद्धू आणि अनिश भानवाला हे दोन्ही भारतीय नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याचा प्रवास संपला आहे. विजयवीरने नवव्या आणि अनिशने 13व्या क्रमांकावर खेळ पूर्ण केला. या स्पर्धेत फक्त टॉप-6 नेमबाजचांना अंतिम फेरीचं तिकीट मिळतं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी हॉकीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात स्पेनच्या संघाने बेल्जियमचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. आता उपांत्यपूर्व फेरीसाठी दोन सामने उरले असून, त्यावरून दोन्ही संघांचे प्रतिस्पर्धी कोणते हे कळेल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. यामध्ये स्पेनने उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा 3-2 असा धुव्वा उडवून मोठा उलटफेर केला आहे. स्पेनने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हॉकीमध्ये बेल्जियमचा संघ स्पेनपेक्षा बलाढ्य मानला जातो. टोक्यो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून बेल्जियमचा संघ चॅम्पियन बनला आणि सुवर्णपदक जिंकले.
महिलांच्या स्कीट नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज माहेश्वरी चौहान अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. यासह ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे. माहेश्वरी 14 व्या स्थानावर राहिली, तर अंतिम फेरीत जाण्यासाठी तिचे टॉप-6 मध्ये असणे आवश्यक होते.
पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीत, भारताचा शटलर लक्ष्य सेन आणि गत ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यात सामना झाला. या सामन्यात लक्ष्यला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्याचा प्रवास अजूनही संपलेला नाही. आता तो कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाचा शटलर ली जी जियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. म्हणजेच त्याला पदक जिंकण्याची अजून संधी आहे.
लक्ष्य सेनला दुसरा गेम गमवावा लागला आहे. डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने दुसऱ्या गेममध्ये त्याला 21-14 ने पराभूत केले. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचं त्याचं स्वप्न भंगलं आहे. आता कांस्य पदकासाठी लढत द्यावी लागणार आहे. कांस्य पदकासाठी लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या ली जी जिया याच्याशी होणार आहे.
पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेन आणि व्हिक्टर एक्सेलसन यांच्यात जबरदस्त लढत पाहायला मिळाली. लक्ष्य सेनने शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली, पण अखेरीस त्याला 20-22 ने पराभवाचा सामना करावा लागला.
भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभूत केलं. या सामन्यात श्रीजेशने जबरदस्त कामगिरी केली. दोन गोल अडवत ब्रिटनचे मनसूबे उधळून लावले.
गोलकीपर श्रीजेशची कमाल, दुसरा गोल अडवला..भारताची 3-2 ने आघाडी
भारताच्या ललितने केला तिसरा गोल, 3-2 अशी आघाडी
गोलकीपर श्रीजेशचा जबरदस्त बचाव, 2-2 अशी स्थिती
भारताने पुन्हा बरोबरी साधली, 2-2 अशी स्थिती
ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये आणखी गोल, 2-1 ने आघाडी
हरमनप्रीतचा गोल आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-1 ने बरोबरी
पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटेन 1-0 ने आघाडीवर
भारताने ग्रेट ब्रिटेनला जबरदस्त झुंज दिली. दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या मिनिटाला अमित रोहितदासला रेड कार्ड मिळालं. त्यामुळे संपूर्ण सामन्यात भारताला 10 खेळाडूंसह खेळावं लागलं. पण भारताने जबरदस्त बचाव केला. गोलकीपर श्रीजेश द वॉल म्हणून झुंजला. त्याने ब्रिटेनचे मारे परतावून लावले. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. आता पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागेल.
तिसऱ्या सत्रात भारत पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात दिसला. या सत्रात ग्रेट ब्रिटेनचं वर्चस्व दिसलं. पण गोल करण्यात त्यांना अपयश आलं. तर शेवटच्या मिनिटं शिल्लक असताना सुमितने शिटी वाजल्यानंतरही चेंडूवर स्टीक मारली म्हणून त्याला ग्रीन कार्ड मिळालं. त्यामुळे चौथ्या सत्रात सुमितला दोन मिनिटं बाहेर काढलं आहे. रेड कार्डमुळे अमित आधीच बाहेर आहे. त्यात हा दोन मिनिटाचा फटका बसला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या मेळाव्यातील भाषणात मराठा अथवा ओबीसी आरक्षणावर साधं एक वाक्य देखील बोलले नाहीत. केवळ राज्य आणि केंद्र सरकराच्या योजनांवरच ते बोलले.
भारताला दुसऱ्या सत्रात अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्याने धक्का बसला आहे. त्यानंतरही भारताने चांगली खेळी करत गोल मारत आघाडी घेतली. पण ग्रेट ब्रिटेनने दुसऱ्या सत्राच्या शेवटच्या तीन मिनिटात गोल केला आणि बरोबरी साधली.
भारतीय हॉकी संघाचा सरपंच हरमनप्रीत कौरने जबरदस्त खेळी केली. दुसऱ्या सत्रात एक खेळाडू कमी असूनही भारताने आक्रमक खेळी केली. तसेच हरमनप्रीत कौरने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल केला. भारताकडे 1-0 ने आघाडी आहे. हरमनप्रीत कौरचा हा या स्पर्धेतील सातवा गोल आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टीम इंडियाला धक्का बसला आहे. डिफेंडर अमित रोहिदासला रेड कार्ड मिळालं आहे. त्यामुळे आता उर्वरित सत्रात खेळणार नाही. जाणीवपूर्वक मारलं नसूनही तिसऱ्या पंचांनी रेड कार्ड दाखवलं. समालोचकांच्या म्हणण्यानुसार पिवळं दाखवणं गरजेचं होतं. त्यामुळे फक्त दहा मिनिटं बाहेर गेला असता.
महाराष्ट्रात संत महंतांनी जातीची विन घट्ट बांधली होती..पण आता त्या जातीची विन विस्कळीत करण्याचं काम सगळ्यांकडून सुरू आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रात भारतीय बचावात्मक पवित्र्यात दिसला. त्यानंतर शेवटच्या दोन मिनिटात भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण या संधीचं सोनं भारताला करता आलं नाही.
ग्रेट ब्रिटनने उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या 15 मिनिटांत गोल करण्याची संधी गमावली. त्याला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.
दुपारी 1:35- 3000 मीटर महिला स्टीपलचेस- पारुल चौधरी
दुपारी 2:30 PM- पुरुषांची लांब उडी पात्रता- जेसन ऑल्ड्रिन
पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी होणार आहे. सायना नेहवालचा पती आणि भारताचा दिग्गज बॅडमिंटनपटू पी. कश्यप याने या सामन्याबद्दल भाकीत वर्तवताना सांगितले की, लक्ष्य सेनच्या विजयाची शक्यता केवळ 30 टक्के आहे. मात्र निकाल भारताच्या बाजूने यावा, असे मला वाटते.
भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्या फेरीत ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत जागा मिळवली होती. आता पुन्हा एकदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा सामना ग्रेट ब्रिटेनशी होणार आहे. भारताला पुन्हा एकदा इतिहास रचण्याची संधी आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताला बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये पदक मिळू शकतं. पहिल्यांदाच पुरुष बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनने धडक मारली आहे. हा सामना भारताने जिंकला तर पदक निश्चित होणार आहे. दुसरीकडे, बॉक्सिंगमध्ये लवलीनाकडून पदकाची अपेक्षा आहे.