Olympics 2024 Highlights And Update: विनेशला पदक निश्चित-नीरज फायनलमध्ये, हॉकी टीम इंडिया अपयशी, 7 ऑगस्टचं असं आहे वेळापत्रक

| Updated on: Aug 07, 2024 | 2:15 AM

Paris Olympics 2024 6 August Updates Highlights In Marathi: पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील 11 व्या दिवशी भारतासाठी चौथं पदक निश्चित झालं. महिला पैलवान विनेश फोगटने फायनलमध्ये धडक मारत इतिहास रचला. नीरज चोप्रानेही अंतिम फेरीत धडक दिली. मात्र हॉकी टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला.

Olympics 2024 Highlights And Update: विनेशला पदक निश्चित-नीरज फायनलमध्ये, हॉकी टीम इंडिया अपयशी, 7 ऑगस्टचं असं आहे वेळापत्रक
vinesh phogat and neeraj chopra

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील 11 व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर शानदार कामगिरी केली. सांघिक प्रकारात हॉकी टीमला विजय मिळवून दिवसाचा शेवट गोड करण्याची संधी होती. मात्र हॉकी इंडिया अपयशी ठरली. हॉकी टीम इंडियाला जर्मनीकडून 2-3 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता हॉकी टीम इंडियाला स्पेन विरुद्ध 8 ऑगस्ट रोजी कांस्य पदकासाठी लढावं लागणार आहे. त्याआधी महिला पैलवाने विनेश फोगट हीने विनेशने क्युबाच्या पैलवानाचा पराभव करत भारताचं एकूण चौथं आणि पहिलं रौप्य पदक निश्चित केलं. त्याआधी भालाफेकीत नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Aug 2024 01:51 AM (IST)

    भारताचं 7 ऑगस्टचं वेळापत्रक, विनेश फोगटला रौप्य पदक निश्चित

    पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील 12 व्या दिवशी भारताचे विविध क्रीडा प्रकारातील सामने होणार आहेत. भारताच्या पहिल्या सामन्याला सकाळी 11 पासून सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारे (उंच उडी) पात्रता फेरीच्या सामन्याला 1 वाजून 35 मिनिटांनी सुरुवात होईल. महिला भालाफेकपटू अन्नू राणी हीचा सामना दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी असणार आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू हीचा सामना रात्री 11 वाजता होणार आहे. तसेच महिला पैलवान विनेश फोगाटचाही सामना होणार आहे. विनेशला रौप्यवर समाधान मानावं लागणार की सुवर्ण मिळवत इतिहास रचणार? याकडे साऱ्या भारताचं लक्ष असणार आहे.

    भारताचं 7 ऑगस्टचं वेळापत्रक

  • 07 Aug 2024 12:31 AM (IST)

    हॉकी टीम इंडिया 2-3 ने अपयशी, आता कांस्य पदकाचं लक्ष्य

    हॉकी टीम इंडिया ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली आहे. टीम इंडियाचा जर्मनी विरुद्ध 2-3 फरकाने पराभव झाला आहे. जर्मनी विजयासह फायनलमध्ये पोहचली आहे. जर्मनीचा फेरीतील सामना हा नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर भारताचा कांस्य पदकासाठीचा सामना हा स्पेन विरुद्ध होणार आहे. हा सामना 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.

  • 07 Aug 2024 12:01 AM (IST)

    जर्मनीकडून निर्णायक क्षणी गोल

    जर्मनीने शेवटच्या सत्रात निर्णायक क्षणी गोल करत आघाडी घेतली आहे. टीम इंडिया यासह 2-3 ने पिछाडीवर पडली आहे.

  • 06 Aug 2024 11:47 PM (IST)

    तिसऱ्या सत्रात टीम इंडियाकडून बरोबरी

    तिसऱ्या सत्रात टीम इंडियाने दुसरा गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर टीम इंडियाने सत्र संपेपर्यंत जर्मनीला आघाडी घेण्यापासून रोखलं. आता चौथं आणि अखेरचं सत्र निर्णायक ठरणार आहे.

  • 06 Aug 2024 11:36 PM (IST)

    टीम इंडियाची जर्मनी विरुद्ध 2-2 ने बरोबरी

    हॉकी टीम इंडियाने उपांत्य फेरीत दुसरा गोल करत जर्मनी विरुद्ध 2-2 ने बरोबरी केली आहे. टीम इंडियासाठी दुसरा गोलही कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने केला. टीम इंडियाने तिसऱ्या सत्रात गोलद्वारे बरोबरी साधली.

  • 06 Aug 2024 11:14 PM (IST)

    दुसरं सत्र जर्मनीच्या नावावर, टीम इंडिया पिछाडीवर

    पहिल्या सत्रात 0-1 ने पिछाडीवर असलेल्या जर्मनीने दुसऱ्या सत्रात दणक्यात कमबॅक केलं. जर्मनीने दुसरं सत्र आपल्या नावावर केलं आहे. जर्मनीने दुसऱ्या सत्रानंतर 2-1 ने आघाडीवर आहे.

  • 06 Aug 2024 11:03 PM (IST)

    जर्मनीकडून पहिला गोल, 1-1 ने बरोबरी

    जर्मनीने दुसऱ्या सत्रात जोरदार सुरुवात केली आहे. जर्मनीने पहिला गोल केला आहे. जर्मनीने यासह 1-1 ने बरोबरी केली आहे.

  • 06 Aug 2024 10:57 PM (IST)

    पहिलं सत्र टीम इंडियाच्या नावावर

    हॉकी टीम इंडियाने जर्मनी विरुद्धच्या सामन्यातील पहिलं सत्र आपल्या नावावर केलं आहे. पहिल्या सत्रानंतर टीम इंडियाने 1-0 आघाडी कायम ठेवली. भारतासाठी पहिला गोल कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने केला.

  • 06 Aug 2024 10:48 PM (IST)

    विनेश फोगाट फायनलमध्ये, महिला पैलवानला आता ‘सुवर्ण’ संधी

    भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट हीने इतिहास रचला आहे. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी पैलवान ठरली आहे.  विनेशने फायनलमध्ये धडक मारली आहे. विनेशने क्युबाच्या पैलवानाचा पराभव करत पदक निश्चित केलं आहे. त्यामुळे भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. मात्र भारताला विनेशकडून सुवर्ण पदकाची आशा असणार आहे. भारतासाठी साक्षी मलिक हीने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.

  • 06 Aug 2024 10:32 PM (IST)

    हॉकी टीम इंडिया-जर्मनी सामन्याला सुरुवात

    हॉकी टीम इंडिया-जर्मनी सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध जर्मनी यांच्यात हा उपांत्य फेरीतील सामना होत आहे. जर्मनी या स्पर्धेत अजिंक्य आहे. जर्मनीने 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे. आता हा सामना जिंकणाऱ्या संघाचं रौप्य पदक निश्चित होईल. मात्र पराभूत होणाऱ्या संघाला कांस्य पदकासाठी खेळावं लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.

  • 06 Aug 2024 09:36 PM (IST)

    थोड्याच वेळात विनेश फोगाटच्या उपांत्य फेरीतील सामन्याला सुरुवात, हॉकी टीमही तयार

    अवघ्या काही मिनिटात भारताच्या उपांत्य फेरीतील 2 सामन्यांना सुरुवात होणार आहे. महिला पैलवान विनेश फोगाटच्या सामन्याला 10 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. विनेशसमोर क्युबाच्या पैलवानाचं आव्हान असणार आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी हॉकी इंडियाच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. टीम इंडियासमोर जर्मनीचं आव्हान असणार आहे.

  • 06 Aug 2024 07:40 PM (IST)

    नेदरलँड्स हॉकी फायलनमध्ये, टीम इंडिया विरुद्ध फायनल?

    नेदरलँड्सने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील हॉकी फायनलमध्ये धडक मारली आहे. नेदरलँड्सने उपांत्य फेरीत स्पेनवर 4-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. आता अंतिम फेरीत नेदरलँड्ससमोर टीम इंडिया-जर्मनी पैकी एका संघांचं आव्हान असणार आहे.

  • 06 Aug 2024 04:52 PM (IST)

    सेमीफायनलमध्ये विनेश फोगाटसमोर क्युबाच्या पैलवानाचं आव्हान

    विनेश फोगटचा उपांत्य फेरीत क्युबाच्या गुजमान लोपेझ विरुद्ध होणार आहे. लोपेझने तिच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात लिथुआनियनाच्या पैलवानचा 10-0 अशा फरकाने पराभव केला.

  • 06 Aug 2024 04:31 PM (IST)

    विनेश फोगाट पदकापासून एक पाऊल दूर

    विनेश फोगाट भारताला पदक मिळवून देण्यापासून एक पाऊल दूर आहे. विनेश फोगाटने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विनेशचा सेमी फायनलमधील सामना आज रात्रीच होणार आहे. हा सामना जिंकताच विनेशचं मेडल निश्चित होईल.

  • 06 Aug 2024 04:28 PM (IST)

    भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट सेमी फायनलमध्ये

    पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतासाठी आणखी एक चांगली बातमी आली आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने 50 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विनेशने युक्रेनच्या लिवाचचा 7-5 अशा फरकाने धुव्वा उडवत सेमी फायलनचं तिकीट मिळवलं आहे.

  • 06 Aug 2024 04:21 PM (IST)

    टेबल टेनिसमध्ये टीम इंडियाचा पराभव

    टीम इंडियाचा मेन्स टेबल टेनिसमध्ये पराभव झाला आहे. या पराभवासह भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताला चीनने 3-0 अशा फरकाने पराभूत केलं.

  • 06 Aug 2024 04:15 PM (IST)

    पाकिस्तानचा अर्शद नदीमही फायनलमध्ये

    नीरज चोप्रा याच्या पाठोपाठ पाकिस्तानच्या अर्शद नदीम यानेही फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अर्शद यानेही पहिल्याच थ्रो सह अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. अर्शदने 86.59 मीटर लांब भाला फेकला.

  • 06 Aug 2024 03:39 PM (IST)

    नीरज चोप्राची पहिल्याच थ्रोसह फायनलमध्ये धडक

    भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच थ्रोसह फायनलमध्ये धडक मारली आहे. नीरजने 89.34 मीटर लांब भाला फेकला. तर फायनलमध्ये पोहचण्यसाठी किमान 84 मीटर भाला फेकणं बंधनकारक होतं.

  • 06 Aug 2024 03:09 PM (IST)

    भारतासाठी 11 वा दिवस महत्त्वाचा

    पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताला काही खेळांमध्ये पदकाची आशा आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत फक्त 3 आणि कांस्य पदकंच आहेत. त्यामुळे खेळाडूंकडून पदकाचं रंग बदलला जावा, अशी आशा प्रत्येक भारतीय चाहत्यांची आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा त्याची क्वालिफिकेशन मॅच खेळणार आहे. तसेच हॉकी टीम इंडिया जर्मनी विरुद्ध उपांत्य फेरीतील सामना खेळणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील 11 वा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

Published On - Aug 06,2024 3:06 PM

Follow us
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.