Olympics 2024 Highlights And Update: पैलवान अमन सेहरावतला पदार्पणात कांस्य, भारताचा पदकांचा षटकार, आता कोणत्याही क्षणी विनेशच्या याचिकेवर निकाल
Paris Olympics 2024 6 August Updates Highlights In Marathi: पॅरिस ऑलिम्पिकमधील 14 व्या दिवशी भारताला अमन सेहरावत याच्याकडून पदकाची आशा होती. ती त्याने पूर्ण केली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील आजचा (9 ऑगस्ट) 14 वा दिवसही अविस्मरणीय ठरला. भारतीय खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात यश आलं नाही. मात्र या दिवसाचा शेवट भारतीयांसाठी गोड झाला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकमेव पुरुष पैलवान अमन सेहरावत याने भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. भारताच्या खात्यातलं हे एकूण सहावं आणि पाचवं कांस्य पदक ठरलं. आता भारताच्या नजरा या विनेश फोगाटच्या रौप्य पदकाच्या निकालाकडे आहे. या प्रकरणी 3 तासांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या प्रकरणी निकाल येऊ शकतो.
LIVE NEWS & UPDATES
-
14 व्या दिवशी पदकांचं षटकार, विनेशच्या निकालाकडे लक्ष
पॅरिस ऑलिम्पिकमधील 14 व्या दिवशी भारताला एकूण सहावं आणि कुस्तीतील पहिलं पदकं मिळालं. पैलवान अमन सहरावत याने ऑलिम्पिक पदार्पणात 21 व्या वर्षी भारताला कुस्तीत कांस्य पदक मिळवून दिलं. अमन भारताला ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक मिळवून देणारा एकूण 8 वा भारतीय ठरला. तर आता दुसऱ्या बाजूला महिला पैलवान विनेश फोगाट हीच्या रौप्य पदकाबाबतचा काय निकाल येतो? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे. विनेशवर अंतिम सामन्याआधी 100 ग्राम वजन जास्त आल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर विनेशची सुवर्ण पदकासाठीची याचिका फेटाळल्यानंतर तिने संयुक्त सिलव्हर मेडल देण्याची विनंती केली. आता या याचिकेवर 3 तास युक्तीवाद झाला. त्यानंतर आता कोणत्याही क्षणी निर्णय येणार आहे.
-
विनेश फोगाटच्या याचिकेवर कधीही निर्णय
अपात्र महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. ही सुनावणी सुमारे 3 तास चालली. सुनावणीत विनेशच्या आणि आयओएच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. त्याचवेळी आयओसी आणि वर्ल्ड रेसलिंगच्या वकिलांनीही आपली बाजू मांडली. आता या प्रकरणी कधीही निर्णय येऊ शकतो. विनेशला फायनलआधी प्रमाणापेक्षा अधिक वजन आल्याने अपात्र ठरवण्यात आलं. या विरोधात तिने क्रीडा लवादात धाव घेतली. आता क्रीडा लवादाकडून काय निर्णय येतो, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
-
-
अमन सेहरावतचा धमाकेदार विजय
भारतीय पैलवान अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं आहे. अमनने 13-5 अशा फरकाने हा सामना जिंकला आहे. भारताच्या खात्यात यासह सहावं पदक आलं आहे.
-
पैलवान अमनच्या सामन्याला सुरुवात
भारतीय पैलवान अमन सेहरावत याच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. अमनसमोर 57 किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझ याचं आव्हान आहे. हा सामना जिंकणाऱ्या खेळाडूला कांस्य पदक मिळणार आहे.
-
पैलवान अमन सेहरावतचा सामना किती वाजता?
भारतीय पैलवान अमन सेहरावत याचा कांस्यपदकासाठी सामना होणार आहे. अमनसमोर पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझ याचं आव्हान असणार आहे. कुस्ती सामन्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 9.45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. अमन या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अमनच्या सामन्याला रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होईल.
-
-
पीआर श्रीजेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धव्जवाहक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीत कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा स्टार गोलकीपर पीआर श्रीजेशला खास जबाबदारी देण्यात आली आहे. रविवारी 11 ऑगस्ट रोजी ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप समारंभ होणार आहे. पीआर श्रीजेश या समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक असणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याला ही जबाबदारी देण्याची घोषणा केली आहे.
-
अपात्रता कायम की रौप्य पदक मिळणार? निर्णय केव्हा?
महिला पैलवान विनेश फोगाटच्या याचिकेवर काय निर्णय येतो? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटी विनेशच्या अपीलबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. विनेशचं अंतिम फेरीआधी 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्याने तिला अपात्र ठरवणयात आलं. त्यामुळे विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सकडे याचिका दाखल करत संयुक्तरित्या रौप्य पदक द्यावं, अशी विनंती केली आहे.
-
भारताची आतापर्यंतची कामगिरी
भारताने आतापर्यंत एकूण 5 पदकं जिंकली आहेत. त्यापैकी पहिली 4 कांस्य तर पाचवं रौप्य पदक आहे. भारताने पहिली 3 कांस्य पदकं ही नेमबाजीत मिळवली. मनु भाकर (वैयक्तिक) , सरबज्योत सिंग-मनु भाकर मिश्र दुहेरी आणि स्वपनिल कुसाळे (वैयक्तिक) अशी 3 पदकं मिळाली. त्यानंतर हॉकी इंडियाने कांस्य पदक मिळवलं. तर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने या स्पर्धेतील एकूण पाचवं तर पहिलंवहिलं रौप्य पदक मिळवून दिलं.
-
अंतिम फेरीची संधी अवघ्या 0.5 सेंकदांनी हुकली
महिलांनंतर भारतीय पुरुषही 4X400 मीटर रिले रेस प्रकारातील अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. भारतीय पुरुष संघ पाचव्या स्थानी राहिले. भारतीय संघाची अंतिम फेरीत पोहचण्याची संधी अवघ्या 0.5 सेंकदांनी हुकली.
-
भारताचं 14 व्या दिवसाचं वेळापत्रक, विनेशच्या अपात्रेबाबतच्या निकालाकडे लक्ष
भारताला शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी 2 पदकं मिळण्याची संधी आहे. पैलवान अमन सेहरावत याचा कांस्य पदकाचा सामना होणार आहे. तसेच महिला पैलवान विनेश फोगाट हीच्या अपात्रेबाबतचा अंतिम निर्णय येणार आहे. विनेशने अपत्रातेनंतर आपल्याला संयुक्त रौप्य पदक देण्यात यावा, अशा मागणीची याचिका क्रीडा लवादात दाखल केली आहे. यावर आता काय निकाल येतो? याकडे लक्ष असणार आहे. विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास भारताला एकूण सहावं तर दुसरं रौप्य पदक मिळेल.
भारताला पाचवं कांस्य मिळणार?
🚨 Today’s action 💪🏼#JeetKiAur | #Cheer4Bharat pic.twitter.com/FaN1NI6WZ4
— Team India (@WeAreTeamIndia) August 8, 2024
Published On - Aug 09,2024 3:54 PM