Paris Olympics 2024: कोणत्या देशाने आतापर्यंत सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे? जाणून घ्या एका क्लिकवर
ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणं हे कोणत्याही देशासाठी अभिमानास्पद असतं. दर चार वर्षांनी येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू मेहनत घेतात. अनेकदा काही सेकंदासाठी पदक हुकतं. त्यामुळे पदरी निराशा देखील पडते. पुन्हा स्पर्धेत भाग घेण्यासाठी वय आणि चार वर्षांचा कालावधी सोकावतो. दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदकं मिळवण्याचा मान कोणत्या देशाला मिळाला ते जाणून घ्या.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अवघ्या काही तासांनी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विविध स्पर्धांमध्ये 200 हून अधिक देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे यावेळी सर्वाधिक पदकांची अपेक्षा बाळगून विविध देशांचे खेळाडू उतरले आहेत. भारताच्या 117 खेळाडूंच्या चमूकडून अशीच अपेक्षा आहे. भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एका सुवर्ण पदकासह 7 पदकं मिळवली होती. आता यापेक्षा जास्त पदकांची अपेक्षा आहे. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर अमेरिकेचा दबदबा दिसून आला आहे. अमेरिकेने ऑलिम्पिक स्पर्धेच्या 16 पर्वांमध्ये आपलं वर्चस्व राखलं आहे. अमेरिकेने आतापर्यंत एकूण 3105 पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वात यशस्वी देश म्हणून ख्याती आहे. अमेरिकेशिवाय इतर कोणत्याही देशाला दोन हजारांचा टप्पा गाठता आलेला नाही. अमेरिकेने सेंट लुईस, मिसूरी येथे 1904 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 239 पदकं जिंकली होती. यात 78 सुवर्ण, 82 रौप्य आमि 79 कांस्य पदकांचा समावेश होता.
अमेरिकेनंतर सोव्हिएत यूनियन 1204 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी असून 1211 पदकं नावावर आहे. फ्रान्स चौथ्या स्थानी असून 1040 पदकं आहेत. युनाईटेड किंगडम पाचव्या स्थानी असून 1035 पदकं आहेत. गेल्या काही वर्षात या स्पर्धेत चीनने उसळी घेतली आहे. चीन सहाव्या स्थानावर असून 900 पदकं नावावर आहेत. इटली सातव्या स्थानी असून 885 पदकं, रशिया आठव्या स्थानी असून 897 पदकं, स्वीडन नवव्या स्थानी असून 740 पदकं, जापान दहाव्या स्थानी असून 690 पदकं आहेत.
भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली?
ऑलिम्पिक इतिहासात भारताने आतापर्यंत 35 पदकांची कमाई केलेली आहे. यात 10 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारताने पहिलं ऑलिम्पिक पदक 1900 साली मिळवलं होतं. तेव्हा नॉर्मन प्रिचर्ड या ब्रिटीश भारतीय नागरिकांने पदकाची कमाई केली होती. एथलेटिक्समध्ये त्याने दोन रौप्य पदकं मिळवली होती. भारताने 1928 ते 1980 या कालावधीत 8 सुवर्ण पदकं जिंकली आहेत. तर 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने, तर 20220 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक मिळवलं आहे. वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवण्यात या दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
अमेरिकेच्या ऑलिम्पिक इतिहासातील जलतरणपटू मायकल फेल्प्स हा यशस्वी खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या कारकिर्दित एकूण 28 पदकं जिंकली आहेत. फेल्प्सने 2000 ते 2016 या कालावधी 23 सुवर्ण पदकांसह 28 पदकांवर नाव कोरलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक पदकं मिळवण्याचा विक्रमही फेल्प्सच्या नावावर आहे.