पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत भारताच्या पारड्यात आठवं पदक, योगेश कथुनियाने मिळवलं यश

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत भारताने आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताच्या पारड्यात आठवं पदक पडलं आहे. एथलीट योगेश कथुनियाने भारताला आठवं पदक मिळवून दिलं आहे.

पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत भारताच्या पारड्यात आठवं पदक, योगेश कथुनियाने मिळवलं यश
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 3:42 PM

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. या स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताच्या पारड्यात आणखी एक पदक पडलं आहे. भारताची पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक संख्या आता 8 झाली आहे. सोमवारी पॅरालिम्पिक एथलीट योगेश कथुनियाने भारताला आठवं पदक मिळवून दिलं. योगेशने डिस्कस थ्रो एफ 56 स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. तसेच दुसऱ्या स्थानावर राहात रौप्य पदक मिळवलं. योगेशने पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसऱ्यांदा भाग घेतला आहे. मागच्या पर्वात अर्थात टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतही यश मिळवलं होतं. तेव्हाही रौप्य आणि आताही रौप्य पदकावर मोहोर उमटवली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने डिस्कस थ्रोच्या अंतिम फेरीत 4.22 मीटर लांब थ्रो केला आणि दुसऱ्या स्थानी राहिला. या स्पर्धेत ब्राझीलच्या क्लाउडनी बतिस्ता राहिला. त्याने 46.86 मीट लांब थ्रो केला आणि सुवर्ण पदक पटकावलं. योगेशने पहिला थ्रो 42.22, दुसरा थ्रो 41.50, तिसरा थ्रो 41.55, चौथा थ्रो 40.33, पाचवा थ्रो 40.89 आणि सहावा थ्रो 39.68 मीटर लांब फेकला.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळवली आहेत. भारताची नेमबाज अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफल एसएच1 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं. दुसरं पदक या स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने मिळवलं होतं. तिने कांस्य पदकावर मोहोर उमटवली. तिसरं पदक प्रीति पालने जिंकलं. महिलांच्या 100 मीटर स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. तर 30 ऑगस्टला नेमबाज मनीष नरवालने चौथं पदक भारताला मिळवून दिलं. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक मिळवून दिलं.

पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला महिला नेमबाज रुबीना फ्रान्सिसने पाचवं पदक मिळवून दिलं. आणखी एक कांस्य पदक भारताच्या पारड्यात पडलं. प्रीति पालने या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरं आणि भारतासाठी सहावं पदक जिंकलं. 200 मीटर शर्यतीत तिने कांस्य पदकाची कमाई केली. तर पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने रौप्य पदक जिंकलं. हे भारताचं सातवं पदक होतं. आता योगेश कथुनियाने मेन्स डिस्कर थ्रोमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.