पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्ण पदक, मेडलची संख्या 9 वर
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा पाचवा दिवशी भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. नितेश कुमारने भारताला दुसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या डेनियल बेथलचा पराभव केला आणि पदकावर नाव कोरलं.
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दुसरं सुवर्ण पदक मिळवलं आहे. नेमबाज अवनी लेखरानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल3 स्पर्धेत नितेश कुमारने सुवर्ण पदक मिळवलं आहे. या पदकामुळे भारताच्या पारड्यात नऊ पदक पडली आहेत. दो सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश झाला आहे. या पदक संख्येसह भारत 2 सप्टेंबर संध्या 5 वाजून 10 मिनिटांपर्यंत 22 व्या स्थानावर पोहोचला आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या नितेश कुमारचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बेथेल याच्याशी झाला. नितेश कुमारने त्याला 21-14, 18-21 आणि 23-21 ने पराभूत केलं. तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगतने गोल्ड जिंकलं होतं. यावेळी ही कामगिरी नितेश कुमारने केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नितेशने डेनियल बेथेलला कधीच पराभूत केलं नव्हतं.
नितेश आणि बेथेल यांच्यातील दुसऱ्या सेटपर्यंत अतितटीची लढत झाली. पहिला सेट नितेशने 21-14 ने सहज जिंकला. पण बेथेलने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केलं आणि 18-21 ने सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार लढत झाली. दोघांचा 16-16 गुण होते. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता ताणली केली. एका प्वॉइंटने वरचढ होण्यासाठी दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत लढले. काही वेळी ग्रेट ब्रिटेनचा डेनियल बेथेल पुढेही निघून गेला. पण नितेशने संयम सोडला नाही आणि शेवटपर्यंत सुवर्णपदकसाठी झुंज दिली. पॅरालिम्पिक स्पर्धेत नितेशचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
Another historic moment for India!
Nitesh Kumar clinches Gold🏅 in men’s singles SL3 para-badminton at the Paris Paralympics!
Proud of his determination and skill! #Paralympics2024 #NiteshKumar #Paris2024 #Cheer4Bharat @mansukhmandviya @IndiaSports @MIB_India @PIB_India… pic.twitter.com/OcoqP0qgrV
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 2, 2024
29 वर्षीय नितेश कुमारने आशियाई पॅरा खेळात चार पदकं जिंकली आहेत. त्यात 2018 जकार्ता आशियाई पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्य आणि 2022 हाँगझोई आशियाई पॅरा खेळात तीन पदक जिंकली आहे. यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे. आता त्याने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याच्या पदकासह पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदकांची संख्या नऊ झाली आहे. अवनी लेखरा, मोना अग्रवाल, प्रीति पाल, मनिष नरवाल, रुबीना फ्रान्सिस, निषाद कुमार, योगेश कथुनिया यांनी पदकं जिंकली आहेत. यात प्रीति पालने दोन पदकं जिंकली आहेत.