Wrestlers Protest :”अनुशासनहीन… “, पीटी उषा यांच्या वक्तव्याने कुस्तीपटू नाराज, बजरंग पुनियाने स्पष्टच सांगितलं
PT Usha on Wrestlers Protest: पीटी उषा यांच्या अध्यक्षतेखालील आयओएने तीन सदस्यीय एडहॉक कमिटीचं गठण केलं आहे. या समितीमार्फत WFI च्या कामकाजावर नजर ठेवली जाईल. तसेच 45 दिवसात WFI च्या निवडणुकाही पार पडणार आहे.
नवी दिल्ली : कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाईची मागणी भारतीय कुस्तीपटू गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पूनिया आणि साक्षी मलिक यांच्यासहीत काही कुस्तीपटू आंदोलन करत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि कुस्तीपटूंना धमकावण्या प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्या वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे.
काय बोलल्या पीटी उषा?
पीटी उषा यांनी गुरुवारी सांगितलं की, ” रस्त्यावर आंदोलन करणं अनुशासनहीन असून यामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेत लैंगिक छळासाठी समिती आहे. रस्त्यावर उरतण्याऐवजी आमच्याकडे येऊ शकले असते. पण ते इथे आले नाहीत. खेळाडूंमध्ये शिस्त असणं गरजेचं आहे. यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे.”
पीटी उषा यांच्या वक्तव्यानंतर कुस्तीपटू नाराज
आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी पीटी उषा यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. कारण पीटी उषा स्वत:एथलीट होत्या. त्यांच्या वक्तव्यानंतर ऑलिम्पिक मेडलिस्ट बजरंग पुनिया याने मत मांडलं आहे. “भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून पाठिंब्याची अपेक्षा होती आणि त्यांचं असं वक्तव्य आश्चर्यकारक आहे.”, असं बजरंग पुनिया याने सांगितलं.
मेरा निवेदन हैं हमारी खापों से की हमारा समर्थन करे। ????????#WrestlersProtest #wrestling pic.twitter.com/c0sT1R8Nm1
— Bajrang Punia ?? (@BajrangPunia) April 24, 2023
काय म्हणाले बृजभूषण सिंह
भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिज भूषण शरण सिंग यांनीही गुरुवारी एका व्हिडीओ संदेशात कवितेद्वारे आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिले. जोपर्यंत आपल्यात लढण्याची ताकद आहे तोपर्यंत आपण हार मानणार नाही, असं त्यांनी सांगितलं म्हणाले.
VIDEO | WFI President Brij Bhushan Sharan Singh reacts to the sexual harassment charges against him. pic.twitter.com/HOdwVCWCIa
— Press Trust of India (@PTI_News) April 27, 2023
एडहॉक कमिटीची स्थापना
क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानंतर आयओएने एक एड-हॉक कमिटीची स्थापना केली आहे. ही कमिटी डब्ल्यूएफआयच्या कामावर लक्ष ठेवेल. या कमिटीत माजी नेमबाज सुमा शिरुर आणि भारतीय वुशू संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग बाजवा यांचा समावेश आहे.
या दोघां व्यतिरिक्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही असतील. पण त्यांच्या नावावर निर्णय झालेला नाही. या समितीच्या दैनंदिन कामकाजा सोबतच फेडरेशनच्या निवडणुकाही येत्या 45 दिवसांत पूर्ण होणार आहेत.