Pro Kabaddi 2023-24: पुण्याचं हरयाणाला हुतुतू..! प्रो कबड्डीच्या दहाव्या पर्वात पलटणने मारली बाजी
प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या पर्वात एकूण 132 साखळी फेरीचे सामने झाल्यानंतर एलिमिनेटर सामने पार पडले. त्यातून चार संघांची वर्णी उपांत्य फेरीत लागली आणि अंतिम पुणेरी पलटण आणि हरयाणा स्टिलर्स हे संघ आले होते. अंतिम फेरीत संघाने पुणेरी पलटणने हरयाणा स्टीलर्सला मात दिली.
मुंबई : पुणेरी पलटण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कोर्टवर राहणं पसंत केलं. हरयाणाकडून पहिली रेड विनयने टाकली पण विना प्वॉइंट परत जावं लागलं. त्यानंतर हा खेळ उत्तरोउत्तर रंगत गेला. कधी प्वॉइंटचं गणित या संघाच्या पारड्यात, तर कधी त्या संघाच्या पारड्यात होत होतं. पहिल्या ब्रेकपर्यंत पुणेरी पलटणने हरयाणा स्टीलर्सवर 10-13 ने आघाडी घेतली होती. दोन्ही संघांमध्ये अवघ्या तीन गुणांचा फरक होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही पुणेरी पलटणचा जलवा दिसला. सुरुवातीलाच बॅकफूटवर गेलेल्या हरयाणावर गुण मिळवत आघाडी मिळवली. पण हे अंतरही जेव्हा कमी होत होतं तेव्हा मात्र चाहत्यांची धाकधूक वाढत होती. शेवटी पुणेरी पलटणने 28-25 ने मात दिली. प्रो कबड्डीच्या इतिहासात पुणेरी पलटण सातवा विजेता ठरला आहे. पंकज मोहितेच्या रेडमुळे पुणेरी पलटला 4 गुणांची कमाई झाली. त्यामुळे विजयी अवघ्या तीन गुणाने शक्य झाला. विजयात खरा हिरो पंकज मोहिते ठरला.
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत एकूण १२ संघांनी भाग घेतला होता. प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वात जयपूर पिंक पँथर्स, दुसऱ्या पर्वात यू मुंबा, तिसऱ्या पर्वात पटणा पायरेट्स, चौथ्या पर्वात पटणा पायरेट्स, पाचव्या पर्वात पटणा पायरेट्स, सहाव्या पर्वात बंगळुरु बुल्स, सातव्या पर्वात बंगाल वॉरियर्स, आठव्या पर्वात दंबग दिल्ली आणि नवव्या पर्वात जयपूर पिंक पँथर्सने जेतेपद मिळवलं होतं.
दोन्ही संघांचे खेळाडू
पुणेरी पलटण टीम: अभिनेश नादराजन, गौरव खत्री, संकेत सावंत, पंकज मोहिते, असलम इनामदार, मोहित गोयत, आकाश शिंदे, बादल सिंह, आदित्य शिंदे, मोहम्मदरेजा शादलूई चियान्नेह, वाहिद रेजाइमर, अहमद मुस्तफा इनामदार, ईश्वर, हरदीप
हरयाणा स्टीलर्स टीम: चंद्रन रंजीत, के प्रपंजन, सिद्दार्थ देसाई, विनय, तेजस पाटिल, शिवम पटारे, विशाल टेट, घनश्याम मगर, हसन बलबूल, हरदीप, जयदीप दहिया, राहुल सेठपाल, रवींद्र चौहान, मोहित नंदल, मोनू हुडा, नवीन कुंडू, हर्ष, सनी सहरावत, मोहित, हिमांशु चौधरी, आशीष