Asian Games : “ती मुलगी नाही तर.. “, स्वप्ना बर्मन हीचा ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या भारताच्या नंदिनीवर गंभीर आरोप

Asian Games 2023 : एशियन गेम्स स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. अनेक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे. पण हेप्टाथलॉनमध्ये पदकावरून भारताच्या स्वप्ना बर्मन हीने ब्राँझ मेडल विजेत्या नंदिनीवर गंभीर आरोप केला आहे.

Asian Games : ती मुलगी नाही तर.. , स्वप्ना बर्मन हीचा ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या भारताच्या नंदिनीवर गंभीर आरोप
Asian Games मधील पराभवानंर स्वप्ना बर्मन संतापली, म्हणाली, ब्राँझ मेडल जिंकणारी नंदिनी ही मुलगी नाही तर...
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 3:43 PM

मुंबई : एशियन गेम्स स्पर्धेत भारताची अनेक स्पर्धांमध्ये विजयी घोडदौड सुरु आहे. काही स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यामुळे पदरी निराशा देखील पडली आहे. असं असताना हेप्टाथलॉन स्पर्धेतील पदकावरून भारतीय खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. स्वप्ना बर्मन हीने ब्राँझ मेडल विजेत्या नंदिनीवर गंभीर आरोप केले आहेत. स्वप्ना बर्मन हीन मागच्या एशियन गेम्स स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं. मात्र यावेळी चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर नंदिनीने ब्राँझ मेडल पटकावलं आहे. त्यानंतर स्वप्ना बर्मन हीने नंदिनीवर निशाणा साधला आहे. स्वप्नाने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत गंभीर आरोप केला आहे. ‘नंदिनी ही मुलगी नाही, तर ट्रान्सजेंडर आहे. त्यामुळे हेप्टाथलॉनच्या ब्राँझ मेडलवर तिचा कोणताही हक्क नाही.’, असा आरोप स्वप्ना बर्मन हीने केला आहे.

स्वप्ना बर्मन हीने काय आरोप केले?

“मी एशियन गेम्समध्ये फक्त चार गुणांनी चौथ्या स्थानावर आली. स्पर्धेत विजय पराजय हा होत असतो. पण स्पर्धा योग्य रितीने व्हायला हवी. माझ्यासोबत भारतातून जी मुलगी आली होती. ती म्हणजे अगसारा नंदिनी ती एक ट्रांसजेंडर आहे. तिला पाहूनच असं वाटतं. तिने स्वत:ही हे मान्य केलं आहे. जर असं असेल तर तिला का स्पर्धेसाठी का पाठवलं गेलं. खरं तर तिला पाठवायला नको होतं.”, असा गंभीर आरोप स्वप्ना बर्मन हीने केला आहे.

“मी अनेक ठिकाणी तक्रार केली आहे. मी परत याबाबत तक्रार करणार आहे. ती ट्रान्सजेंडर आहे म्हणून हा राग व्यक्त करते असं अजिबात नाही. माझ्या स्पर्धेत असं का केलं गेलं?”, स्वप्ना बर्मन हीने असं सांगत प्रश्नही उपस्थित केला आहे. इतकंच काय तर मला माझं मेडल पुन्हा हवं असल्याचं ट्वीट देखील तिने केलं आहे.

Swapna_Barman (1)

“आमच्या कित्येक महिन्यांची ट्रेनिंग ट्रान्सजेंडरसाठी एका दिवसाच्या बरोबरीत आहे. कारण त्यांच्या शरीरात टेस्टारोनचा स्तर जास्त असतो. आम्हााला 6 तारखेला परत जायचं होतं. पण ती गेम्स विलेजमधून पळून गेली. तिचं तिकिट आजचं होतं. पण सर्वांचं तिकीट सहा तारखेचं होतं. तिला माहिती होतं की मी तक्रार केली आहे आणि तिची टेस्ट होईल त्यामुळेच ती पळून गेली.”, असंही स्वप्ना बर्मन हीने सांगितलं

“मी काय करू. माझ्या सोबत आणखी काही मुलांची संधी हातून गेली. जर मला माझं मेडल मिळालं नाही तर मी सर्वांबाबत बोलेन. सर्वांनी मला गप्प बसण्यास सांगितलं आहे. पण गप्प बसणार नाही. मला या सर्वाचा मानसिक त्रास झाला आहे.”, असंही स्वप्ना बर्मन हीने सांगितलं.

ब्राँझ मेडल विजेत्या भारताच्या नंदिनी अगसारा हीला एकूण 5712 गुण मिळाले. तर स्वप्ना बर्मन हीला 5708 गुण मिळाले. अवघ्या चार गुणांनी स्वप्नाचं ब्राँझ मेडल हुकलं. स्पर्धेतील पराभवानंतर स्वप्ना खूपच नाराज झाली होती. इतकंच काय डोळ्यातून अश्रू निघत असलेले व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.