VIDEO : पर्यावरणवादी तरुणीचा प्रताप, बळजबरीने फ्रेंच ओपनमध्ये घुसली, गळ्यातली साखळी जाळीला बांधली, व्हिडीओ व्हायरल

ती मुलगी डर्नियर रिनोव्हेशन नावाच्या चळवळीशी संबंधित असल्याची माहिती आहे.

VIDEO : पर्यावरणवादी तरुणीचा प्रताप, बळजबरीने फ्रेंच ओपनमध्ये घुसली, गळ्यातली साखळी जाळीला बांधली, व्हिडीओ व्हायरल
पर्यावरणवादी तरुणीचा प्रतापImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 10:21 PM

नवी दिल्ली : पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनं (Greta Thunberg) काही काळापूर्वी अवघ्या जगाचं लक्ष वेधलं होतं. हवामानबदलाविषयी तीनं लक्ष्य वेधळं होतं. आता दुसरीकडे आम्ही तुम्हाला पर्यावरणवादी कार्यकर्तीचीच बातमी सांगणार आहोत. फ्रेंच ओपनच्या (French open 2022) दुसऱ्या सेमीफायनलदरम्यान (semifinals) एका पर्यावरणवादी कार्यकर्तीनं असंच एक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते तीनं पूर्णपणे चुकीच्या पद्धीतीनं केलं. तीनं असं काही केलं की त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. एक मुलगी बळजबरीनं कोर्टात घुसली आणि तिनं गळ्यात घातलेली साखळी जाळीला बांधली आणि जमिनीवर पडली. हे पाहून खेळाडूंनी कोर्टातून पळ काढला आणि खेळ थांबवावा लागला. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. हा धक्कादायक प्रकार अचानक गडल्याने खेळाडू देखील घाबरले.

फ्रेंच ओपनमधील प्रकार पाहा

नेमकं काय घडलं?

मुलगी बेकायदेशीर घुसल्याचं दिसताच तातडीनं येऊन मुलीच्या गळ्यातील जाळ्यातून बांधलेली साखळी खेचली. काही वेळानं पुन्हा सामना सुरू झाला. यावेळी महिला आंदोलकांच्या टी-शर्टवर ‘आमच्याकडे 1028 दिवस शिल्लक आहेत’ असं लिहिले होतं. आंदोलकाचे नाव अलीजी असून त्याचे वय 22 वर्षे आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाआहे.

मुलगी का विरोध करत होती?

ती मुलगी डर्नियर रिनोव्हेशन नावाच्या चळवळीशी संबंधित असल्याच माहिती आहे. ती हवामान बदलाविषयी निदर्शनं करत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर फ्रान्सनं हवामान बदलावर काम केलं नाही. तर 1028 दिवसांनंतर काहीही शिल्लक राहणार नाही. आंदोलक अलीजी हे पर्यावरणवादी असल्याचंही बोललं जातं. या आंदोलनाची वेबसाइट https://derniererenovation.fr/ आहे. फ्रेंच भाषेत अनेक संदेश लिहिलेलंय हे विशेष. एका संदेशानुसार जागतिक नेते जगाला अशा भविष्याकडे नेत आहेत जिथे फ्रेंच ओपनचे आयोजन करणं देखील शक्य होणार नाही आणि सर्व काही संपेल, असं तिच्या संदेशात आहे.

काय घडलं मॅचमध्ये?

कॅस्पर रुडनं चागला खेळ खेळत 2 तास 55 मिनिटे रंगलेल्या सामन्यात मारिन सिलिकचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. जिथं त्याचा सामना राफेल नदालशी होणार आहे. 23 वर्षीय कॅस्पर रुडने अनुभवी मारिन सिलिककडून पहिला सेट 3-6 असा गमावला. यानंतरदुसऱ्या सेटमधून शानदार पुनरागमन करत सलग तीनही सेट 6-4, 6-2, 6-2 असं जिंकलं. त्याने उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या 19 वर्षीय होल्गर रूनचा 6-1, 4-6, 7-6, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.