गरोदर असूनही या चार स्पर्धकांनी मिळवलं ऑलिम्पिक पदक, जाणून घ्या त्यांच्याबाबत
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील तलवारबाजी प्रकारात इजिप्तची नादा हाफेजला शेवटच्या 16व्या फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवानंतर तिने ऑलिम्पिकमध्ये सात महिन्यांची गरोदर असल्याचा खुलासा केला. त्यामुळे पराभूत होऊनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. असं असताना यापूर्वी काही स्पर्धकांना गरोदर असताना स्पर्धेत भाग घेतला होता. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जगभरातील देशांमध्ये पदकासाठी चढाओढ सुरु झाली आहे. काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून पदक मिळवलं आहे. पण काही खेळाडूंच्या पदरी पदक पडलं नसलं तरी आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं. इजिप्तच्या तलवारबाज नादा हाफेझने असं आपल्या लक्ष वेधून घेतलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नादाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तिचा पराभव झाला असला तरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण ती सामन्यांची गरोदर असूनही स्पर्धेत उतरली होती. नाडाच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पोटात बाळाला घेऊन ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत भाग घेणं काही छोटी गोष्ट नाही. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि स्पर्धेत भाग घेणं हे पदकापेक्षा कमी नाही. गरोदर असूनही स्पर्धेत भाग घेणारी नादा ही काय पहिलीच स्पर्धक नाही. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यापैकी चौघींनी पदकं जिंकली आहेत
अँकी वॅन ग्रुनस्वेन : ही नेदरलँडची घोडेस्वारीतील दिग्गज खेळाडू आहे. तसेच एकमात्र स्पर्धक असून इक्वेस्ट्रियनमध्ये सलग तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. यात 2000 सिडनी, 2004 एथेंस आणि 2008 बीजिंग ऑलिम्पिकचा समावेश आहे. यात एथेंस स्पर्धेत गोल्ड जिंकलं तेव्हा अँकी पाच महिन्यांची गरोदर होती. ऑलिम्पिक गोल्ड पदकाच्या चार महिन्यानंतर तिने बाळाला जन्म दिला.
कॉर्नेलिया फोल : ही जर्मनीची दिग्गज तीरंदाज असून सलग चार ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. तिने 1996 ऑलिम्पिकमध्ये सांघिक रजत, 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये सांघिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. सिडनी ऑलिम्पिकमध्ये गरोदर असताना कास्य पदकाची कमाई केली. 2004 या ऑलिम्पिक स्पर्धेतही ती गरोदर होती.
जुनो स्टोव्हर इर्विन : अमेरिकेच्या जुनोने डायव्हिंगमध्ये दोनवेळ पदक जिंकलं आहे. गरोदर असताना तिने पदक मिळवलं. ऑलिम्पिक इतिहासात गरोदर असताना पदक जिंकणारी पहिली महिला ठरली. 1952 च्या हेलसिंग ऑलिम्पिकमध्ये डायव्हिंग प्लॅटफॉर्ममध्ये तिने कास्य पदक पटकावलं होतं. तेव्हा ती साडे तीन महिन्यांची गरोदर होती. 1956 मेलबर्न ऑलिम्पिकमध्येही रजत पदक पटकावलं.
कर्स्टिन शिमकोविक : हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत जर्मनीच्या कर्स्टिनने गरोदर असताना पदक मिळवलं होतं. 2010 व्हँकुव्हर हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रजत पदक मिळवलं. कर्स्टिन तेव्हा दोन महिन्यांची गर्भवती होती.