ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत कांस्य पदकाच्या लढतीपूर्वी नेमकं काय झालं? गोलकीपर पीआर श्रीजेशने केला मोठा खुलासा
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली. ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत गोलकीपर पीआर श्रीजेश याची भूमिका महत्त्वाची ठरली. या स्पर्धेपूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केली होती. भारतीय संघाने त्याला विजयी निरोप दिला. पीआर श्रीजेशने या स्पर्धेतील काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आणल्या आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. कांस्य पदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा धुव्वा उडवला. टोक्यो ऑलिम्पिक 2020 नंतर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकलं. या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धेत गोलकीपर पीआर श्रीजेश याने चमकदार कामगिरी केली. गोलकीपर श्रीजेशने कांस्य पदकाच्या लढतीपूर्वी संघात कसं वातावरण होतं याचा खुलासा केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत श्रीजेशने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभवाचं तोंड पाहावं लागल्यानंतर संघात कसं वातवरण होतं हा प्रश्न त्याला विचारला गेला. तेव्हा श्रीजेशने सांगितलं की, ‘संघाची मनस्थिती एकदम ठीक होती. संघातील सर्व 11 खेळाडू यापूर्वी या स्थितीतून गेले होते. त्यामुळे ही दुसरी संधी होती. पॅरिसला जाण्यापूर्वी संघात एक आत्मविश्वास होता. आम्ही रौप्य किंवा सुवर्ण पदकासाठी लढाई करू शकतो, असं आधीच वाटत होतं. आम्ही संपूर्ण स्पर्धेत आत्मविश्वासाने खेळलो.’
कांस्य पदकाच्या सामन्यापूर्वी संघात सर्वकाही ठीक होतं का? तेव्हा श्रीजेशने सांगितलं की, ‘सर्व खेळाडूंसमोर सर्वकाही स्पष्ट होतं की येथून पदक जिंकून जायचं की रिकाम्या हाती जायचं. संघावर कोणताच दबाव नव्हता. सर्वांनी सामन्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.’पीआर श्रीजेशने 18 वर्षांच्या हॉकी कारकिर्दिचा शेवट गोड झाला. श्रीजेशने 2006 मध्ये भारताच्या वरिष्ठ हॉकी संघातून पदार्पण केलं होतं. 2011 नंतर संघातून एकदाही बाहेर बसला नाही. दुसरीकडे, हॉकी इंडियाने श्रीजेशसमोर ज्युनिअर हॉकी संघाचा प्रशिक्षक होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान श्रीजेशने या प्रस्तावावर काहीही सांगितलेलं नाही.
VIDEO | @ 𝟒 𝐏𝐚𝐫𝐥𝐢𝐚𝐦𝐞𝐧𝐭 𝐒𝐭𝐫𝐞𝐞𝐭: “I think in the team… all the 11 members have played in the same scenario before and this was like a second opportunity. But definitely, before leaving for Paris, the team had that kind of confidence of being capable of winning… pic.twitter.com/O9iPjkVSrX
— Press Trust of India (@PTI_News) August 13, 2024
श्रीजेश 336 सामन्यात खेळला. तसेच चार ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला. दोन वेळा पदक मिळवण्यात यश आलं. श्रीजेशकडून गोल करणं प्रतिस्पर्धी संघांना चांगलंच अडचणीचं गेलं. मोक्याच्या क्षणी श्रीजेशने चांगली कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत पॅनल्टी शूटआऊटमध्ये चांगली कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला.