डोपिंग चाचणी म्हणजे नेमकं काय? त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, जाणून घ्या सर्वकाही

What is a Doping Test : डोपिंगचे जाळे आता जगभर पसरले आहे. डोपिंग म्हणजे प्रत्येक खेळाला एक प्रकारची कीडच लागत चालली आहे. आताचा पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येही काही खेळाडू डोप चाचणीमध्ये सापडले. बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये तब्बल 23 पदक विजेते खेळाडू डोप चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले होते.  डोपिंग चाचणी घेतली जाते याची माहिती असतानाही खेळाडू का घेत असतील? खेळाडूंच्या सावलीसारखे सोबत असलेले त्यांचे कोचेस त्यांना रोखत नाहीत का? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खेळाडू आणि कोचेस शॉर्टकट वापरतात. मात्र हा शॉर्टकट शरीरासाठी किती हानिकाकर ठरू शकतो याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. या लेखात डोपिंग चाचणी म्हणजे काय? डोपिंग चाचणी कशी केली जाते, त्याचे परिणाम काय याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

डोपिंग चाचणी म्हणजे नेमकं काय? त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 2:07 PM

आता डोपिंगच्या जाळ्यात लहानांपासून दिग्गज खेळाडू अडकले आहेत. कोणताही खेळ घ्या, आपल रांगडा तांबड्या मातीतील कुस्तीमध्येही हे विष पसरलं आहे. कुस्ती खेळण्याआधी सोडाच पण सिक्स पॅकवाल्या बॉडीसाठी तरूण मुलं स्वत: इंजेक्शन मारून घेऊ लागली आहेत. हा विषय झाला कुस्तीचा पण सर्वच खेळांमध्ये आता डोपिंग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस भरती, आर्मी भरती अशा अनेक भरत्यांमध्ये उमेदवार धावण्याआधी डोपिंग करत आहेत. या डोपिंग चाचणीबाबतची माहिती समजून घ्या.

डोपिंग चाचणी म्हणजे काय?

सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये डोप चाचणी घेतली जाते. ही चाचणी करण्यासाठी, लघवी आणि रक्ताचे नमुने घेतले जातात. या चाचणीचा उद्देश एखाद्या खेळाडूने कोणतेही औषध, ताकद वाढवणारी टॅब्लेट किंवा इतर मादक पदार्थाचे सेवन केले आहे का? अशा पदार्थांचा वापर करून त्याने खेळामध्ये चांगली कामगिरी केली का हे पाहिलं जातं. क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होताना खेळाडूने कोणत्याही मादक द्रव्ये किंवा उत्तजेक पदार्थाचे सेवन केले आहे हे पाहण्यासाठी चाचणी केली जाते. डोपिंग हे स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा पाच श्रेणींमध्ये विभागले आहे.

आपल्या शरीरामध्ये आधीपासूनच टेस्टोस्टेरॉन असते. पुरुष खेळाडू आपल्या मसल्स वाढवण्यासाठी या स्टेरॉईड्‌स इंजेक्शनचा उपयोग करतात. तात्पुरती ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये येत असली तरी त्याचे आरोग्यावर खूप भयंकर परिणाम होतात. स्टेरॉईडमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर जास्तीचा ताण येतो. काही डॉक्टर रूग्णांना उपचारामध्ये स्टेरॉईड्‌स वापरतात. पण आपल्या मनानेच जर तुम्ही घेतले तर त्याच्या ओव्हरडोसमुळे बेशुद्धही होऊ शकता.

स्टेरॉईडसारखे आपल्या शरीरामध्ये पेप्टाईड हार्मोन्स असतात. मधुमेह असणाऱ्या रूग्णांना इन्सुलिन जीवनरक्षक हार्मोन आहे. हे इन्सुलिन एखाद्याा निरोगी व्यक्तिला दिल्याने त्याच्या शरीरातील चरबी कमी होते.

ब्लड डोपिंगमध्ये खेळाडू कमी वयाच्या खेळाडूंचे रक्त घेतात याला ब्लड डोपिंग म्हटलं जातं. कमी वयाच्या लोकांच्या रक्तामध्ये (रेड ब्लड सेल्स) मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ज्या ऑक्सिजन जास्त घेतात त्यामुळे शरीरातील जास्त ऊर्जा अधिक वाढते.

नार्कोटिक्स म्हणजे अंमली पदार्थांमधील नार्कोटिक किंवा मॉर्फिन सारख्या वेदनाशामक औषधांचा खेळाडू वापर करतात. खेळ सुरू असताना जर दुखापत झाल्यावर खेळाडू याचा वापर करतात.

डाइयूरेटिक्स म्हणजे शरीरामधील पाण्याचे प्रमाण कमी करतो. लघवीचे प्रमाण यामुळे वाढते, याचा वापर खेळाडू वजन कमी करण्यासाठी वापर करतात. कुस्ती किंवा बॉक्सिंगमध्ये याचा जास्तीत जास्त वापर केला जातो.

डोप टेस्ट कशी केली जाते?

कोणत्याही खेळाडूची डोप चाचणी केव्हाही घेतली जाऊ शकते. हे NADA किंवा WADA किंवा दोन्ही द्वारे केले जाऊ शकते. यासाठी खेळाडूंचे लघवीचे नमुने घेतले जात असले तरी ते एकदाच घेतले जातात. पहिल्या टप्प्याला A आणि दुसऱ्या टप्प्याला B म्हणतात. एखादा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर बंदी घालण्यात येते. खेळाडूची इच्छा असल्यास, तो बी-टेस्ट नमुन्यासाठी डोपिंग विरोधी पॅनेलकडे अपील करू शकतो. जर खेळाडूचा बी-टेस्ट नमुन्यातही पॉझिटिव्ह आला तर त्या खेळाडूवर बंदी घातली जाते.

भारतामधील पहिले डोप प्रकरण

भारतामध्ये 1968 च्या मेक्सिको ऑलिम्पिकसाठीच्या चाचण्या दिल्लीमधील रेल्वे स्टेडियममध्ये सुरू होत्या. या चाचणीदरम्यान 10,000 मीटर शर्यतीमध्ये धावत असताना एक खेळाडू धावता-धावता ट्रॅक सोडून बाजूला पायऱ्या चढू लागला. त्यावेळी त्या खेळाडूच्या तोंडामधून फेस येऊ लागला आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला. काही वेळाने त्याला तपासल्यालवर खेळाडूने अंमली पदार्थाचं सेवन केल्याचे समोर आले होते. कृपाल सिंग असं त्या खेळाडूचे नाव होते. या घटनेनंतर भारतामध्ये डोपिंगची अनेक प्रकरणे समोर येऊ लागलीत.

डोपिंग चाचणी करण्याची जबाबदारी WADA (World Anti-Doping Agency) आणि NADA (National Anti-Doping Ahgency)वर दिली आहे.

WADA चे मुख्यालय कॅनडातील मॉन्ट्रियल येथे आहे. खेळांमधील डोपिंगचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आंतरशासकीय संस्था, सरकारे, सार्वजनिक प्राधिकरणे आणि इतर सार्वजनिक आणि खाजगी संस्थांच्या पाठिंब्याने WADA ची स्थापना IOCच्या तत्वाखाली एक पाया म्हणून करण्यात आली. WADA ची निर्मिती लॉसने घोषणेच्या अटींनुसार करण्यात आली होती, ज्याने स्वतंत्र आंतरराष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी तयार करण्याचे आवाहन केले होते. WADA जागतिक उत्तेजकविरोधी संहितेसाठी जबाबदार आहे, जे आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ, राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटना, IOC आणि आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीसह 650 हून अधिक क्रीडा संघटनांनी स्वीकारले आहे.

NADA म्हणजे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. ही 24 नोव्हेंबर 2005 रोजी सरकारने स्थापन केलेली एक स्वतंत्र डोपिंग विरोधी संघटना आहे. 1890 च्या सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत भारताचा. हे भारतातील खेळांशी संबंधित डोपिंग-नियंत्रण कार्यक्रमांना प्रोत्साहन देते, समन्वयित करते आणि त्यांचे परीक्षण करते. जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सी (WADA) च्या क्रियाकलापांमध्ये डोपिंग विरोधी नियम आणि नियमांचा अवलंब करणे आणि अंमलबजावणी करणे देखील समाविष्ट आहे.

खेळाडूंवर काय कारवाई होते?

डोप चाचणीमध्ये खेळाडू सापडल्यास त्या खेळाडूचे तात्पुरते निलंबन केले जाते. खेळाडूला त्याचे म्हणणे सादर करण्यास परवानगी, स्पर्धेतून कायमचे बाद केले जाते. दोन ते पाच वर्षे किंवा आजीवन बंदी किंवा मिळालेली पदके काढून घेतली जातात. अशा प्रकारची कारवाई केली जाते. हे डोपिंग करणे किती भयानक आहे याबाबत कुस्ती अभ्यासक मतीन शेख यांनी थोडक्यात माहिती दिलीये.

आहार व व्यायामाकडे दुर्लक्ष करत खेळाडू डोपिंगला जवळ करत आहेत. स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्‍स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे डोपिंग खेळाडूंकडून केले जाते. इंजेक्‍शन, कॅप्सुल, टॅबलेट्‌स, पावडरच्या माध्यमातून याचे सेवन होते. सततच्या वापरामुळे खेळाडूंना याची सवय लागते. डोपिंगच्या साईड इफेक्‍टसमुळे विविध व्याधींनी ग्रासले आहे. खेळाडूंना प्रोटिन्स सप्लिमेंट गरजेनुसार घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. परंतु सध्या अनेक ठिकाणी सप्लिमेंटची दुकानेच उघडली आहेत. खेळाडूंच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचं मतीन शेख यांनी म्हटलं आहे.

क्रिकेटमध्येही डोप चाचणीमध्ये खेळाडू सापडले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू युसूफ पठाण याचा समावेश आहे. टर्ब्युटालाईन हे प्रतिबंधित पदार्थ घेतल्याने तो पॉझिटिव्ह आढळला होता. त्यावेळी पठाणवर पाच महिन्याच्या निलंबनाची कारवाई केली गेली होती. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरही याचा शिकार ठरला होता. 06 मध्ये आपल्या करियरमध्ये टॉप क्लास प्रदर्शन करत असताना शोएब डोपिंगमध्ये अडकला होता. त्यावेळी त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न 2003 च्या विश्वचषकादरम्यान डोप चाचणीत दोषी सापडला होता. त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे देखील डोप चाचणीचे बळी ठरले आहेत. 1993-94 या वर्षात फ्लेमिंगवर डोपिंगमध्ये अडकल्याने काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.