Manu Bhaker : मानलं पोरी तुला! मागीलवेळी पिस्तुल तुटल्याने हुकलेली संधी, अखेर विजय मिळवलाच, कोण आहे मनु भाकर?

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट भेटल्याशिवाय राहत नाही. हे भारताच्या 22 वर्षीय मनु भाकर हिने सिद्ध करून दाखवलं आहे. मागील ऑलिम्पिकमध्ये पिस्तुलमध्ये बिघाड झाला होता मात्र यंदा पूर्ण तयारीने तिने भारताला पदकांचं खातं उघडून दिलं आहे. मनु भाकरचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घ्या.

Manu Bhaker : मानलं पोरी तुला! मागीलवेळी पिस्तुल तुटल्याने हुकलेली संधी, अखेर विजय मिळवलाच, कोण आहे मनु भाकर?
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 5:45 PM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पहिलं पदक जिंकलं आहे. भारतीय महिला नेमबाज मनु भाकर हिने भारताला कांस्यपदक जिंकवून दिलं आहे. हे पदक आपल्या नावावर करत मनु भाकर हिने इतिहास रचला असून नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी पहिला भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. थोडक्यासाठी मनु भाकर हिचे रौप्यपदक हुकल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. भारतासाठी पदकांचं खातं उघडणारी मनू भाकर कोण आहे? मागीलवेळी तिच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाल्याने पदक जिंकता आलं नव्हतं, मात्र तिने हार न मानता यंदा ऑलिम्पिक पदक आपल्या नावावर केलं आहे.

मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केलं होतं. 10 मीटर एअर पिस्तुल फेरीत तिचे पिस्तुल तुटले होते. त्यामुळे मागीलवेळी पदकापासून वंचित राहिली होती. पण म्हणतात न जिद्द आणि चिकाटी असली की तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यं पोहोचताच. भारताच्या 21 नेमबाज सदस्यांमध्ये मनू भाकर ही एकमेव अशी अॅथलीट आहे जी अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे.

मनू भाकर कोण आहे?

हरियाणामधी झज्जर येथे मनू भाकर हिचा जन्म झालाय. शाळेत असल्यापासूनच तिला खेळाची आवड होती. शाळेमध्ये मनू टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. यामध्ये तिने ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली होतीत. मात्र बॉक्सिंगमध्ये तिच्या डोळ्याला दुखापत झाली आणि तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला होता. पण खेळापासून ती स्वत:ला जास्त दूर ठेवू शकत नव्हती. वयाच्या 14 व्या वर्षी मनू हिन नेमबाजीमध्ये आपले करियर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांना पिस्तुल खरेदी करण्यास सांगितले. त्यानंतर मुलीच्य स्वप्नांना पाठिंबा देणाऱ्या तिच्या वडिलांनी पिस्तुल विकत घेऊन दिली होती, आज त्याच मनू भाकरने भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे.

गोल्ड कोस्ट 2018 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनु भाकर कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन आहे. ब्युनोस आयर्स 2018 मधील युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर सांघिक पिस्तूलचे विजेतेपद पटकावले होते. ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी मनु भाकर सर्वात तरूण भारतीय खेळाडू आहे. 2023 च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनु पाचव्या स्थानावर होती. त्यामुळे भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये कोठा मिळवला होता.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.