Jenni Hermoso Controversy Video : भर मैदानात अध्यक्षाकडून महिला खेळाडूला किस, फिफाची मोठी कारवाई, पाहा Video
वर्ल्ड कप जिंकल्यावर स्पेनचे सर्व खेळाडू जल्लोष करत असताना स्पेन संघाची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला (Jenni Hermoso Kiss Video) या खेळाडूला भर मैदानात स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे (RFEF) अध्यक्ष लुईस रुबियालेस यांनी किस केलं होतं. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीये.
मुंबई : वुमन्स फिफा वर्ल्ड कपच्या (Womens FIFA World Cup) फायनल सामन्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडलेली. इंग्लंड आणि स्पेनमध्ये झालेल्या फायनलमध्ये स्पेन संघाने 1-0 ने विजय मिळवला होता. (Luis Rubiales) वर्ल्ड कप जिंकल्यावर स्पेनचे सर्व खेळाडू जल्लोष करत असताना स्पेन संघाची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला (Jenni Hermoso Kiss Video) या खेळाडूला भर मैदानात स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे (RFEF) अध्यक्ष लुईस रुबियालेस यांनी किस केलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. अखेर लुईस रुबियालेस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
20 ऑगस्टला झालेल्या फायनलमध्ये स्पेनने विजय मिळवल्यानंतर महिला खेळाडू जेनी हर्मोसोला हिला मिठी मारत किस केलं. त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगवेळी संबंधित महिला खेळाडूने तिला किस घेतलेलं आवडलं नसल्याचं जाहीरपणे सांगितलं.
अनेक फुटबॉलपटूंनी लुईस रुबियालेस यांच्यावर टीका केली. इतकंत नाहीतर स्पेनच्या पंतप्रधानांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं. FIFA ने Rubiales प्रकरणाची शिस्तभंगाची चौकशी सुरू केली होती. अखेर रुबियालेस यांनी केलेल्या कृत्याची माफी मागितली पण आपण राजीनामा देणार नसल्याचं सांगितलं.
रुबियालेस यांच्या या भूमिकेनंतर वुमन्स वर्ल्ड कपमधील सर्व महिला खेळाडूंनी रुबियालेस राजीनामा देत नाहीतर तोपर्यंत स्पॅनिश संघाकडून खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर FIFA च्या शिस्तपालन समितीने त्याच्या नियमांच्या कलम 51 नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करत रुबियालेस यांना पदावरूव निलंबित केलं आहे.
पाहा व्हिडीओ-:
स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे (RFEF) अध्यक्ष लुईस रुबियालेस यांना महिला खेळाडूला किस केल्या प्रकरणी 90 दिवस निलंबित केलं आहे.#LuisRubiales #JenniHermoso #kissing pic.twitter.com/8CennDml1d
— Harish Malusare (@harish_malusare) August 27, 2023
दरम्यान, लुईस रुबियालेस यांना 90 दिवसांसाठी निलंबित केलं आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्पेनमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र या प्रकारामुळे त्या आनंदाच्या क्षणाला तडा गेला. भर मैदानात असा प्रकार होणं ही लाजिरवाणी बाब आहे.