Neeraj Chopra याने गोल्ड मेडलसोबत जिंकली सर्वांची मने, पाकिस्तानच्या खेळाडूसोबतचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

Neeraj chopra Gold In world Championship 2023 | नीरज चोप्रा याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये  गोल्ड जिंकत त्याने इतिहास रचलाय. सर्व जगभरात त्याचं कौतुक होत असलेलं पाहायला मिळत आहे. अशातच नीरज याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Neeraj Chopra याने गोल्ड मेडलसोबत जिंकली सर्वांची मने, पाकिस्तानच्या खेळाडूसोबतचा 'हा' व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 8:23 AM

मुंबई : गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नीरज चोप्रा याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये  गोल्ड जिंकत त्याने इतिहास रचलाय. पठ्ठ्याने डोळे झाकून देशासाठी आणखी एक गोल्ड मेडल जिंकलं आहे. सर्व जगभरात त्याचं कौतुक होत असलेलं पाहायला मिळत आहे. अशातच नीरज याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरज याने पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीम याला फोटो काढण्यासाठी बोलावलं. नीरज याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहाला मिळत आहे. भारत-पाक एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने कोणत्याही खेळात दोन्ही देशांमध्ये अटीतटीची लढाई होताना दिसते. नीरज आणि अरशद यांच्यामध्येही झुंज पाहायला मिळाली यामध्ये नीरजने आपली सर्व ताकद लावत गोल्ड मेडलला गवसणी घातली.

पाहा व्हिडीओ-:

अशी कामगिरी करणारा नीरज पहिलाचा खेळाडू-

नीरज वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं. नीरज यासह एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला आहे.

दरम्यान, नीरज चोप्रा देशभरातील तरूणांसाठी आदर्श मानला जाईल. आताची तरूणाई व्यसनाच्या आधीन गेलेली दिसते. मात्र आपल्या नीरजला गोल्ड मेडल जिंकायची नशा आहे. देशाला नीरज चोप्राचा अभिमान आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.