Wrestlers Protest | कुस्तीपटूंची माघार;बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलन मागे?
Sakshi Mailk are withdrawing from protest | कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांची आंदोलनातून माघार? जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली | भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटू्ंकडून लैगिंक अत्याचाराचे आरोप करण्यात आले. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करुन त्यांना अटक करावी, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि अन्य कुस्तीपटूंचा समावेश आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. कुस्तीपटूंचं म्हणनं काय आहे, त्यांची बाजू जाणून विषय निकाली काढावा, अशी मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे.
कुस्तीपटूंच्या या आंदोलनाने साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. विविध स्तरातून या कुस्तीपटूंना पाठिंबा मिळतोय. काही दिवसांपूर्वी 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या संघानेही आपला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे या विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. या सर्व दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. या कुस्तीपटूंनी रविवारी गृहमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे तिघे रेल्वे ड्युटीवर रुजु झाले आहेत. त्यामुळे यांनी आंदोलनातून माघार घेतल्याचं वृत्त सर्वत पसरलं आहे. मात्र हे पूर्णपणे खोटं आहे. आम्ही आंदोलनातून माघार घेतली नसल्याचं या कुस्तीपटूंनी स्पष्ट केलं आहे.
साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या तिघांनी रविवारी 4 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट जवळपास 2 तास चालली. या भेटीनंतर हे तिघे रेल्वेतील नोकरीवर रुजु झाले. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर या तिघांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील तलवार म्यान केली की काय, असा अंदाज बांधत आहेत.
तसेच या भेटीत साटलोटं झाल्याचा अंदाजही नेटकऱ्यांनी बांधलाय. सोशल मीडियावर अनेक मेसेज तुफान व्हायरल झाले. हिंदी वृत्तवाहिन्यांवर साक्षी मलिक हीने आंदोलनातून माघार घेतल्याचं वृत्त चालवण्यात आलं. यानंतर साक्षी मलिक हीने पुढे येत हा सर्व गैरसमज दूर करण्यासाठी ट्विट केलं.
साक्षी मलिक हीने ट्विटमध्ये काय म्हटलंय?
ये खबर बिलकुल ग़लत है। इंसाफ़ की लड़ाई में ना हम में से कोई पीछे हटा है, ना हटेगा। सत्याग्रह के साथ साथ रेलवे में अपनी ज़िम्मेदारी को साथ निभा रही हूँ। इंसाफ़ मिलने तक हमारी लड़ाई जारी है। कृपया कोई ग़लत खबर ना चलाई जाए। pic.twitter.com/FWYhnqlinC
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) June 5, 2023
“हे वृत्त एकदम चुकीचं आहे. न्याय हक्काच्या लढाईतून आम्ही ना माघार घेतली आहे, ना घेणार. सत्याग्रहासोबत मी रेल्वेत माझं कर्तव्य बजावत आहेत. न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा असाच सुरु राहिल. कृपया चुकीचं वृत्त प्रसारित करु नये”असं आवाहन साक्षी मलिक हीने ट्विटद्वारे केलं आहे.