ऑलिम्पिकमध्ये वजन तर इथे वय आड, विनेशला राज्यसभेत जाण्याची किती संधी? शेवटचा मार्ग काय?

Vinesh Phogat Rajya Sabha Criteria: विनेश फोगाटला वाढीव वजनामुळे हक्काच्या रौप्य पदकाला मुकावं लागलं. तिला पॅरिसहून रिकाम्या हाती परतावं लागलं. मात्र तिचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी तिला राज्यसभेवर पाठवण्याची विनंती आहे. मात्र त्यासाठी विनेशचं वय कमी आहे.

ऑलिम्पिकमध्ये वजन तर इथे वय आड, विनेशला राज्यसभेत जाण्याची किती संधी? शेवटचा मार्ग काय?
Vinesh Phogat Rajya Sabha Criteria
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 8:09 PM

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीला वाढीव वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे भारताला हक्काचं रौप्य पदक गमवावं लागलं. विनेशने या अपात्रतेच्या निर्णयाला क्रीडा लवादात आव्हान दिलं. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे विनेशला भारतात रिकाम्या हाती परतावं लागलं. मात्र त्यानंतरही विनेशचा योग्य सन्मान करत तिला राज्यसभेवर पाठवण्यात यावं, अशी मागणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र विनेशला इथेही तिचं दुर्देव आडवं आलं. विनेशला तिथे वाढीव वजनामुळे पदक गमवावं लागलंय. तर इथे विनेशला कमी वयामुळे इच्छा असूनही राज्यसभेवर जाता येणार नाही. विनेशची राज्यसभेची वाट वयामुळे नक्की कशी अडतेय? तसेच तिला राज्यसभेत पाठवण्याचा दुसरा पर्याय नाही का? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. मात्र त्याआधी विनेशसोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय झालं? हे समजून घेऊयात.

विनेशची पॅरिस ऑलिम्पिकमधील ‘लढाई’

विनेश फोगाट हीचं 17 ऑगस्ट रोजी मायभूमी भारतात दणक्यात स्वागत करण्यात आलं. विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाढीव 100 ग्राम वजनामुळे अपात्र करण्यात आलं. त्यामुळे विनेशला हक्काच्या रौप्य पदकाला मुकावं लागलं. तसेच गोल्ड मेडलचा सामनाही खेळता आला नाही. विनेशने अपात्रतेच्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादात धाव घेतली. मात्र क्रीडा लवादाने विनेशची संयुक्तरित्या रौप्य पदकाची मागणी नाकारत याचिका फेटाळली. त्यामुळे विनेशला पर्यायाने भारताला पदक मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं. विनेशने 6 ऑगस्ट रोजी सलग 3 सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

विजयाच्या हॅटट्रिकनंतर ‘सुवर्ण’संधी

विनेशने 6 ऑगस्ट रोजी प्री क्वार्टर फायनलमध्ये यूई सुसाकी हीचा 3-2 अशा फरकाने धुव्वा उडवत उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश मिळवला. विनेशने त्यानंतर युक्रेनच्या ओक्साना लिवाच हीला 7-5 अशा फरकाने अस्मान दाखवलं आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. विनेश आता पदकापासून एक पाऊल दूर होती. विनेशसमोर सेमी फायनलमध्ये क्यूबाच्या गुजमॅनचं आव्हान होतं. मात्र विनेशने गुजमॅनवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला. विनेशने 5-0 अशा फरकाने विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री घेतली. विनेश अशाप्रकारे ऑलिम्पिकच्या इतिहासात कुस्ती प्रकारात अंतिम फेरीत पोहचणारी पहिली भारतीय ठरली. तसेच विनेशने रौप्य पदक निश्चित केलं. त्यामुळे विनेशला सुवर्ण पदकाची संधी होती. विनेशसमोर फायनलमध्ये यूएसएच्या एन सारा हिल्डेब्रांट हीचं आव्हान होतं.

विनेशचा अंतिम फेरीतील सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार होता. मात्र त्याआधीच विनेशचं वजन प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट झालं आणि तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. विनेशने अंतिम सामन्याआधी वजन कमी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रात्रभर तिने मेहनत केली. मात्र 100 ग्राम वजनामुळे भारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंग झालं. इतकंच काय तर विनेशचा पराभव झाला असता तरीही तिला रौप्य पदक निश्चित मिळणार होतं, मात्र तसं झालं नाही.

विनेशला अपात्र ठरवल्यानंतर राजकीय वर्तुळातही त्याची चर्चा पाहायला मिळाली. काहींनी तिचं समर्थन केलं. तर काहींनी याबाबत व्यक्त होणं टाळलं. मात्र नेटकऱ्यांनी विनेशची बाजू लावून धरली. पदक मिळालं नसलं तरी विनेश वाघिणीसारखी लढली. ती देशाची मुलगी आहे. त्यामुळे तिचा पदक विजेत्यांप्रमाणेच सन्मान करण्यात यावा, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली. अशात विनेश फोगाट हीला संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेवर पाठवण्यात यावं, अशी मागणी हरियाणाचे माजी मु्ख्यमंत्री भूपिंदर हुड्डा आणि टीएमसीचे खासदार अभिषेक बनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी केली.

माजी मुख्यमंत्री आणि खासदार काय म्हणाले?

जर राज्यात काँग्रेस सत्तेत असती, तर आम्ही विनेश फोगाटला राज्यसभेवर पाठवलं असतं, असं काही दिवसांपूर्वी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा म्हणाले होते.”आता हरियाणात राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. जर आमच्याकडे बहुमत असतं,तर आम्ही विनेशला राज्यसभेवर पाठवलं असतं”, असं भूपिंदर हुड्डा म्हणाले होते. सध्या हरियाणात भाजपची सत्ता आहे. तर टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी विनेशला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करा किंवा राज्यसभेवर पाठवा, असं म्हटलं होतं.

विनेशला राज्यसभेवर जाण्याची किती संधी?

भूपिंदर हुड्डा यांनी सांगितल्याप्रमाणे हरियाणात राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. नुक्त्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत दीपेंद्र सिंह हुड्डा विजयी झाले. त्यामुळे राज्यसभेची 1 जागा रिकामी झाली. दीपेंद्र सिंह हुड्डा यांचा राज्यसभेतील कार्यकाळ हा 9 एप्रिल 2026 पर्यंतचा होता. मात्र त्यांनी लोकसभेत निवड झाली आणि आता ती जागा रिक्त आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 7 ऑगस्ट रोजी राज्यसभेच्या 12 जागांसाठी कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 14 ऑगस्टला अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर 14 ते 21 ऑगस्ट दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे. तर 26 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील तर 3 सप्टेंबरलाच मतदान आणि मतमोजणी होणार आहे.

तिथे वजन जास्त, इथे वय कमी

विनेशचा राज्यसभेचा मार्ग हा वयामुळे अडला आहे. नियमांनुसार राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट ही 30 वर्ष इतकी आहे. तर सध्या विनेशचं वय हे 29 वर्ष आहे. विनेशला येत्या 25 ऑगस्टला 30 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट आहे. त्यामुळे विनेशला इच्छा असूनही अर्ज करता येणार नाही. त्यामुळे विनेशला राज्यसभेवर कोणत्याही पक्षाने पाठवायचं ठरवलं, तरी ते शक्य नाही. विनेशची राज्यसभेची वारी अशाप्रकारे 4 दिवसांनी हुकलीय.

शेवटचा पर्याय काय?

राज्यसभेची सदस्यसंख्या ही एकूण 250 इतकी आहे, मात्र सध्या या वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या ही 245 इतकी आहे. त्यापैकी देशातील एकूण राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशातून 233 उमेदवार हे खासदार म्हणून निवडून जातात. तर 12 जणांना खासदार म्हणून नियुक्त करण्याचे विशेषाधिकार हे राष्ट्रपतींकडे असतात.

राज्यसभेला अर्थात त्या सभागृहाला विविध क्षेत्रातील 12 जणांच्या अनुभवाचा फायदा व्हावा, या हेतूने त्यांची नेमणूक केली जाते. त्यानुसार राष्ट्रपतींना संविधानाच्या अनुच्छेद 80(3)नुसार 12 खासदारांची नियुक्ती करण्याचा अधिकार असतो. राष्ट्रपती नियुक्त 12 पैकी 4 खासदारांचा कार्यकाळ हा 13 जुलैला संपला आहे. या 4 खासदारांमध्ये राम शकल, राकेश सिन्हा, सोनल मानसिंह आणि महेश जेठमलानी यांचा समावेश आहे. तर 8 खासदारांचा कार्यकाळ संपण्यासाठी आता बराच अवधी शेष आहे. त्यामुळे राष्ट्रपती रिक्त जागांसाठी चौघांची खासदार म्हणून नियुक्ती करु शकतात. त्यामुळे विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ठरवलं, तर विनेश खासदार होऊ शकते.

Rajya Sabha

Rajya Sabha

राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी अट काय?

राज्यसभा खासदार होण्यासाठी सर्वात आधी इच्छूक व्यक्ती ही भारतीय असावी. ती व्यक्ती 30 वर्षांची असावी. तसेच राज्यसभेत जाण्यसाठी इच्छूक असलेली व्यक्ती ही त्याच राज्यातून निवडून यावी,असं काही गरजेचं नाही. उदाहरण, गुलाम नबी आझाद यांचा जन्म जम्मू-काश्मीरचा आहे. मात्र ते 1990-1996 दरम्यान महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले होते.

वरिष्ठ सभागृह

दरम्यान राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. मात्र दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. त्यामुळे दर 2 वर्षांनी निवडणुका होतात.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...