WWE सुपरस्टारनं वयाच्या 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना बसला धक्का

डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारनं वयाच्या 36 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

WWE सुपरस्टारनं वयाच्या 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना बसला धक्का
WWE सुपरस्टारने घेतला जगाचा निरोप, वयाच्या 36 व्या वर्षी दु:खद निधनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 3:43 PM

मुंबई : डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये द फिन्ड आणि ब्रे वायट या नावाने प्रसिद्ध असलेला विंडहेम रोटुंगा रेसलर याने जगाचा निरोप घेतला आहे. जबरदस्त शरीरयष्टी असलेल्या रोटुंगाचं वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. भल्याभल्यांना रिंगमध्ये पाणी पाजणाऱ्या रोटुंगाची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रे वायट गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. पण नेमकं काय झालं होतं याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आजार बळावल्याने गेल्या काही महिन्यांपासून रिंगपासून दूर गेला होता. मात्र अचानक त्याच्या निधनाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना विश्वास बसणं कठीण झालं आहे. घरच्यांनी ब्रे वायट याचं निधन झाल्याच्या बातमीला दुजोरा दिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

विंडहेम रोटुंगा आणि डब्ल्यूडब्ल्यूईचं नातं

विंडहेम रोटुंगा याच्या तीन पिढ्यांनी डब्ल्यूडब्ल्यूई रिंग गाजवली आहे. विंडहेमचे आजोबा ब्लॅकजॅक आणि वडील माइक रोटुंगा यांनी डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये आपली ताकद दाखवली आहे.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विंडहेमनं याच क्षेत्रात करिअर करण्याची ठरवलं. ब्रे वायटने दोन वेळा डब्ल्यूडब्ल्यू युनिव्हर्सल चॅम्पियनशिप, तर एकदा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं आहे. 2019 मध्ये ब्रे वायटला डब्ल्यूडब्ल्यूई मेल रेसलर ऑफ द ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले होतं.

View this post on Instagram

A post shared by WWE (@wwe)

डब्ल्यूडब्ल्यूई कंपनीने सीईओ ट्रिपल एच याने ट्वीट करून दिली माहिती

डब्ल्यूडब्ल्यूई कंपनीचे सीईओ ट्रिपल एच यांनी सोशल मीडियावर ब्रे वायट याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्रिपल एचने ट्वीट करत लिहिलं की, “डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम आणि विंडहेमचे वडील यांनी फोन करून माईक रोटुंडा याच्या निधनाची बातमी दिली . आमच्या डब्ल्यूडब्ल्यूई कुटुंबातील एक सदस्य आम्ही गमावला आहे. आम्ही त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. ”

वायट रेसलमेनिया 39 मध्ये पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरेल अशी अपेक्षा होती. ऑगस्टच्या सुरुवातीला त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. पण अचानक त्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?.
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?.
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?.
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला....
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला.....
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?.
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?.
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?.
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान.
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका.
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन.