Icc Odi Player Ranking | बाबर आझमची गरुड भरारी, विराट कोहलीला पछाडत पटकावलं पहिलं स्थान
आयसीसीच्या ताज्या वनडे रॅंकिंगनुसार (odi ranking) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (babar azam) विराट कोहलीला (virat kohli) पछाडत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
दुबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (Indian Premier League) 6 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली (Virat Kohli) आमनेसामने असणार आहेत. या सामन्याआधी विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विराटला पछाडत आयसीसी वनडे रॅंकिंगमधील (ICC Oneday Ranking) पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे विराटसाठी हा जबरदस्त धक्का समजला जात आहे. (pakistan captain babar azam has overtaken virat kohli to become No 1 batsman in the icc odi ranking)
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 14, 2021
बाबर आझम अव्वलस्थानी
आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे रॅंकिगमध्ये बाबरने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. त्यामुळे विराटची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. विराट गेल्या काही महिन्यांपासून अग्रस्थानी कायम होता. मात्र बाबरने विराटला पछाडत पहिलं स्थान पटकावलं. बाबरच्या नावावर एकूण 865 रेटिंग्स पॉइंट्सची नोंद आहे. तर विराटच्या नावावर 857 गुण आहेत. म्हणजेच या दोघांमध्ये अवघ्या 8 पॉइंट्सचा फरक आहे.
A good update for ??
Fakhar Zaman, following a brilliant series against South Africa, has surged five places to joint No.7 in the latest @MRFWorldwide ICC men’s ODI rankings for batsmen ? pic.twitter.com/WzSNehzdY3
— ICC (@ICC) April 14, 2021
तिसऱ्या क्रमांकावर ‘हिटमॅन’
फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहित 825 पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर 801 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच 791 पॉइंट्ससह पाचव्या स्थानावर विराजमान आहे. टॉप 10 मध्ये विराट आणि रोहित व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही.
गोलंदाजांमध्ये ट्रेन्ट बोल्ट नंबर 1
आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर दुसऱ्या स्थानी अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान 708 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेनपी तिसऱ्या पायदानावर आहे.
यॉर्कर किंग बुमराह चौथ्या स्थानी
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. बुमराह या रॅंकिंगमध्ये 690 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर बांगलादेशचा मेहंदी हसन आहे.
अष्टपैलूंच्या यादीत शाकिब पहिल्या क्रमांकावर
ऑलराऊंडर्स खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे. शाकिबच्या नावे 408 पॉइंट्स आहेत. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स 295 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा रवींद्र जाडेजा या यादीत 245 गुणांसह 9 व्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2021 SRH vs RCB Head to Head Records : विराट की वॉर्नर, आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड?
IPL 2021 | गेलचा झेल घेताना झाला ‘झोल’, बेन स्टोक्सवर आयपीएल 2021 सोडण्याची वेळ
(pakistan captain babar azam has overtaken virat kohli to become No 1 batsman in the icc odi ranking)