विराट कोहली शतकांचा दुष्काळ दूर करणार का?, पाकिस्तानी दिग्गज म्हणतो, ‘फक्त पुढच्या मॅचमध्ये बघाच…!’

आगामी इंग्लंड दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात कोहली शतक करु शकतो अशी भविष्यवाणी सलमान बट याने केली आहे. (Pakistan Player Salman Butt Statement on Virat kohli Century WTC 2021)

विराट कोहली शतकांचा दुष्काळ दूर करणार का?, पाकिस्तानी दिग्गज म्हणतो, 'फक्त पुढच्या मॅचमध्ये बघाच...!'
विराट कोहली
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 9:00 AM

मुंबई :  भारताचा आक्रमक फलंदाज ज्याने जागतिक क्रिकेटवर राज्य केलंय तो विराट कोहली (Virat Kohli) लवकरच शतकांचा दुष्काळ दूर करेल,  अशी भविष्यवाणी पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने केली आहे. पाकिस्तानचा माजी दिग्गज सलामीवीर सलमान बटने (Salman Butt) ही भविष्यवाणी केलीय. गेली दीड वर्ष विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाहीय. मात्र विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, लवकरच त्याच्या बॅटमधून नेहमीसारखी आतिषी खेळी पाहायला मिळेल ज्याद्वारे तो आपलं 71 वं शतक साजरं करेल, असं सलमान बट याने म्हटलं आहे. (Pakistan Player Salman Butt Statement on Virat kohli Century WTC 2021)

जवळपास गेली दीड वर्ष विराट कोहलीच्या बॅटमधून शतक निघालेलं नाहीय. मात्र सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लवकरच त्याच्या बॅटचा जलवा तो दाखवेल आणि शतकांचा दुष्काळ दूर करेल. विराट पुन्हा एकदा शतकांचा रतीब घालायला सुरुवात करेन, अशी भविष्यवाणी सलमान बटने केलीय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात कोहली शतक करु शकतो

आगामी इंग्लंड दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात कोहली शतक करु शकतो अशी भविष्यवाणी सलमान बट याने केली आहे. पुढे बोलताना तो म्हणतो की, “विराटने याआधीही अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत. असा कोणी विचार केला होता तो एवढ्याशा वयात तो 70 शतक झळकावेल? असा विचार कोणी केला होता की तो एवढा फिट होईल आणि त्याचा फॉर्म ही एवढा जोरदार राहील? धावांचा पाठलाग करताना त्याचा स्ट्राईक रेट 90 इतका आहे तिन्ही फॉरमॅट मध्ये त्याची सरासरी 50 हून अधिक आहे. ही अशक्यप्राय गोष्ट विराटने करुन दाखवलीय.

विराटकडे प्रतिभा आणि फॉर्म दोन्हीही आहे

पाठीमागच्या एक ते दीड वर्षापासून त्याच्या बॅटमधून शतक निघाले नाही परंतु तो जेव्हा शतक साजरं करत नाही त्यावेळी आपल्या मनात विचार येतो की त्याच्या बॅटमधून रन्स निघत नाही मात्र तसं नाहीये. तो धावा करतोय पण शतक करण्यात त्याला अपयश येतंय. मला विश्वास आहे इंग्लंड दौऱ्यात तो नक्की शतक ठोकेल. त्याच्याकडे प्रतिभा आणि फॉर्म दोन्ही आहे. ही केवळ एका वेळेची गोष्ट आहे.

विराटचं शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक कधी…?

विराट कोहलीने वेस्टइंडिजविरुद्ध 2019 साली शेवटचं शतक ठोकलं होतं. पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) येथे खेळताना 14 ऑगस्ट 2019 ला विराटने नाबाद 114 धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर विराटच्या बॅटमधून जवळपास दीड वर्षांहून अधिक काळापासून शतकं आलेलं नाहीय.

(Pakistan Player Salman Butt Statement on Virat kohli Century WTC 2021)

हे ही वाचा :

भारताचा तो क्रिकेटर ज्याच्या 3 मॅचमध्ये 30 विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक, नंतर सगळ्यांसमोर लाज आणली!

कसोटी क्रिकेटमध्ये मोजक्या संधी, माजी सिलेक्टर्सवर युवराज सिंह भडकला, ट्विट करुन म्हणाला….

‘विराट’ नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारा खास व्यक्ती काळाच्या पडद्याआड!

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.