नवी दिल्ली : संपूर्ण भारत देश कोरोनाशी (India Covid 19) दोन हात करतोय. कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या कठीण प्रसंगी भारताचा शेजारी पाकिस्तानमधून भारतीय बांधवांसाठी दुवा- प्रार्थना सुरु आहे. पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) याने आपल्या भावना भारतीयांप्रती व्यक्त करत अल्लाहकडे दुवा मागितली आहे. हे अल्लाह भारतीयांना कोरोनाविरोधी लढ्यासाठी बळ दे, असं म्हणत लवकरच भारत कोरोनावर मात करेन, असा आशावादही त्याने व्यक्त केला आहे. (Pakistan Shoaib Malik Pray For India Over Indians Fight Against Covid 19)
“भारतीयांसाठी सध्या कठीण दिवस आहेत. प्रत्येक जण कोरोनाच्या या अवघड परिस्थितीतून जात आहे. संपूर्ण पाकिस्तानच्या भावना भारतीयांसोबत आहे. मी अल्लाहकडे दुवा मागतो की भारतीयांना लढण्यासाठी अल्लाहने शक्ती द्यावी. भारतीयांना कोरोनाला हरविण्यासाठी आता हिम्मत ठेवावी लागेल. मला आशा आहे की भारतीय बांधव लवकरच कोरोनावर मात करतील”, अशा भावना शोएब मलिकने व्यक्त केल्या आहेत.
भारतातल्या कठीण परिस्थितीवर तसंच भारतीयांना धीर देणारं ट्विट शोएब मलिकने केलं आहे. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, “या कठीण काळात भारतीय बांधवांसाठी माझी प्रार्थना, भारतात कोरोनाची आलेली दुसरी लाट परतावून लावण्यासाठी अल्लाह आपल्याला मदत करो, भारतीयांनी हिम्मत ठेवावी.”
– Thoughts and prayers with India in these difficult times, may the Almighty help us to tide over the unprecedented tragedies of Covid’s second wave. Stay strong India
— Shoaib Malik ?? (@realshoaibmalik) April 25, 2021
“भारतासाठी सध्याचा काळ हा मुश्कील काळ आहे. इथे दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे तर कित्येक जणांना औषधोपचार न मिळाल्याने जीवाला मुकत आहेत. मी अशा सर्व भारतीयांसाठी अल्लाहकडे दुवा मागतो. या सर्व परिस्थितीशी झुंजण्यास भारतीयांना बळ मिळो, अशी प्रार्थना करतो तसंच पाकिस्तान सरकारकडेही मी आवाहन करतो की भारताला ऑक्सिजनचा पुरवठा करुन मदत करावी”, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
“भारत सध्या एका कठीण काळातून जात आहे. कित्येकांना कोरोनाची लागण होतीय तर कित्येकांना जीव सोडावा लागतोय. अशा परिस्थितीत भारतासाठी ग्लोबर सपोर्टची गरज आहे. या महामारीच्या काळात आपण सगळे सोबत आहोत”, असं शोएब म्हणाला.
(Pakistan Shoaib Malik Pray For India Over Indians Fight Against Covid 19)
हे ही वाचा :
IPL 2021 : आर. अश्विनच्या आयपीएल सोडण्याच्या निर्णयावर कोच रिकी पाँटिंगचं ट्विट, म्हणाला…