काल पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Shrilanka) यांच्यात आशिया चषकातील (Asian Cup 2022) अंतिम सामना झाला. सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावावर करण्यात श्रीलंका टीमला यश आले आहे. कालचा सामन्यात दोन्हीकडून रंगत येईल असं वाटतं होतं. परंतु पाकिस्तानी गोलंदाजांना फलंदाजी न जमल्यामुळे श्रीलंकेकडून त्यांचा सहज पराभव झाला.
श्रीलंकेच्या सुरुवात सुद्धा अतिशय वाईट झाली होती. त्यावेळी पाकिस्तान सामना एक हाती जिंकेल असं वाटतं होतं. परंतु पाचव्या विकेटनंतर एक भागीदारी झाली. त्यामुळे श्रीलंका टीमचा स्कोर 171 पर्यंत पोहोचला. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने फक्त 55 धावा काढल्या.
कालचा दुबईतील सामना पाहण्यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळी तिथं अनेक सोशल मीडिया स्टार सुद्धा आले होते. कारण कालचा सामना दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. चाहत्यांनी भरलेल्या मैदानात काल अनेकांनी आपले अनोखे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
6th title ✅? https://t.co/5Mvot46Omm pic.twitter.com/uks6F2YTgw
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) September 11, 2022
‘मारो मुझे मारो वाले’ या वाक्यामुळे अधिक प्रसिद्ध असलेला मोमिन साकिब सुद्धा सामना पाहण्यााठी काल गेला होता. तिथून त्याने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल केले आहेत. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये श्रीलंका संघाला त्याचा चषकाची अधिक गरज होती असं म्हणतं आहे. त्याचवेळी तो रडत ते देखील आहे,
तिथं त्याच्यासोबत पाकिस्तानचे अनेक चाहते देखील आहेत. ते मोमिन साकिब याची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहे.