Pakistan Team : पाकिस्तानचा भेदक गोलंदाज पुन्हा रुग्णालयात, ऑपरेशन झाल्याचं चाहत्यांना सांगितलं
विश्चचषक स्पर्धेत दुखापत झालेल्या पाकिस्तानचा गोलंदाज रुग्णालयात दाखल, ऑपरेशन झाल्याची सोशल मीडियावर पोस्ट

मुंबई : पाकिस्तान टीमचा (Pakistan Team) जलदगती गोलंदाज रुग्णालयात दाखल झाला असून त्याचं ऑपरेशन (Opration) झाल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं आहे. विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) त्याने चांगली गोलंदाजी केली आहे, विशेष म्हणजे अंतिम सामन्यात ज्यावेळी पाकिस्तान टीम गरज होती. त्यावेळी तो जखमी झाल्यामुळे पाकिस्तान टीमचा पराभव झाल्याचं बाबर आझम (Babar Azam) म्हणाला होता.
पाकिस्तानचा भेदक गोलंदाज शाहीन आफ्रीदी रुग्णालयात दाखल झाला असून, त्याचं ऑपरेशन झाल्याचं त्याने ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे. तो सद्या रुग्णालयात उपचार घेत आहे. आफ्रिदीचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून अनेकांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.



Had an appendectomy today but Alhumdulillah feeling better. Remember me in your prayers. ? pic.twitter.com/M70HWwl9Cn
— Shaheen Shah Afridi (@iShaheenAfridi) November 20, 2022
विश्वचषक स्पर्धेत गुडघ्याचं दुखणं पाकिस्तान टीमला चांगलं भोवलं आहे. कारण आफ्रीदीने तीन ओव्हर केल्या. त्याची आणखी एक ओव्हर झाली असती तर त्यावेळी सामन्यात बदल झाला अशी पतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दिली होती. गुडघ्याचं दुखणं सामन्यात अचानक वाढल्यामुळे आफ्रीदीने मैदान सोडलं होतं. त्याचा परिणाम पुढच्या मॅचवर झाला होता.