India-England : पाकिस्तानच्या चाहत्यांना वाटते टीम इंडियाची भीती, पाहा व्हिडीओ
आज सुरु असलेल्या मॅचमध्ये हार्दीक पांड्याने धुवाधार अर्धशतकी पारी खेळली
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या (Pakistan) टीमने न्यूझिलंड (NZ)टीमचा पराभव करुन फायनलमध्ये धडक मारली आहे. आज टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात जी टीम जिंकेल ती टीम पाकिस्तान विरुद्ध फायनलमध्ये खेळणार आहे. टीम इंडिया (India) फलंदाजी करीत आहे, इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठे फटके मारता आले नाहीत. पण हार्दीक पांड्या आणि विराट कोहलीच्या चांगल्या फलंदाजीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 168 झाली.
टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध फायनलला येऊ नये पाकिस्तानच्या चाहत्यांची इच्छा आहे. कारण टीम इंडियाने अनेकदा पाकिस्तान टीमचा पराभव केला आहे. त्यामुळे चाहत्यांना भीती वाटतं आहे.
“We want England in Finals, not India”
The fear of facing Kohli in the finals
A Pakistani Fan
Via @kohlifanAmeepic.twitter.com/aoSg2fQwBg
— Cricketopia (@CricketopiaCom) November 10, 2022
आज सुरु असलेल्या मॅचमध्ये हार्दीक पांड्याने धुवाधार अर्धशतकी पारी खेळली. पांड्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 168 झाली आहे. इंग्लंडच्य़ा फलंदाजीला सुरुवात झाली आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
इंग्लंड टीम
जोस बटलर अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.