Vinesh Phogat : विनेश फोगाट डिस्क्वॉलिफाय, संसदेत पडसाद, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; भाजपला मारला टोमणा

प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र घोषित करण्यात आलं आहे. अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर विनेशला अपात्र ठरवलं गेल्याने भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न धुळीला मिळालं आहे. त्यामुळे देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यावरून काँग्रेसने भाजपला टोमणा लगावला आहे. तर, संसदेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत.

Vinesh Phogat : विनेश फोगाट डिस्क्वॉलिफाय, संसदेत पडसाद, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; भाजपला मारला टोमणा
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 1:48 PM

पॅरिस ऑलिम्पिक विनेश फोगाटला अपात्र घोषित केलं आहे. त्यामुळे ती महिला कुस्तीतून बाद ठरली आहे. विनेश सुवर्ण पदक जिंकणार असल्याची शक्यता असतानाच अचानक ही धक्कादायक बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले आहेत. तर काँग्रेसने विनेशच्या मुद्द्यावरून भाजपला जोरदार टोमणा मारला आहे. विनेश फोगाटने दिल्लीपासून पॅरिसपर्यंत हिंमत दाखवल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

विनेश फोगाटने जगातील तीन अव्वल दर्जाच्या कुस्तीपटूंना नमवून फायनलमध्ये स्थान बळकट केलं होतं. त्यामुळे विनेश आज देशाला सुवर्णपदक मिळवून देणार असल्याची जोरदार चर्चा होती. विनेशच्या या कामगिरीकडे देशाचंच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाचं लक्ष लागलं होतं. पण विनेशच वजन 100 ग्रॅम जास्त आढळल्याने तिला ऑलिम्पिक नियमानुसार अपात्र घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे तिला रजत पदक तरी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हिंमतीची दाद द्यावीच लागेल

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी त्यावर प्रतिक्रिाय दिली आहे. भारताला गोल्ड मेडल भलेही मिळाले नसेल. पण तिने देशाचं मन जिंकलं आहे. तिला जो पुरस्कार मिळाला पाहिजे, तो मिळत नाहीये, याचं मला दु:ख वाटतंय, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

विनेशने आपलं मन जिंकलं आहे. दिल्लीच्या रस्त्यावर आणि पॅरिसच्या आखाड्यात तिने जे काही केलं, त्याचा देशाला अभिमान आहे. तिने ज्या पद्धतीने हिंमत, ताकद आणि आपली पात्रता सिद्ध केली आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. आम्ही तिच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. तिला आपण कधीच विसरू शकत नाही. टेक्निकली वजनबाबत काय झालं ते मला माहीत नाही. यात कोचचीही जबाबदारी आहे. एवढ्या प्रयत्नानंतरही तिला जो पुरस्कार मिळायला पाहिजे, तो मिळत नाही, याचं मला वाईट वाटतं. अंतिम फेरीपर्यंत पोहोचणं ही अभिमानाची गोष्ट आहे, असं थररू म्हणाले.

संसदेत पडसाद

दरम्यान, विनेश फोगाट स्पर्धेतून बाद ठरल्याने संसदेत त्याचे पडसाद उमटले. सर्वच खासदारांनी या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ केला. या प्रकणावर क्रीडा मंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी केली. त्यावर क्रीडा मंत्री आज दुपारी 3 वाजता निवेदन सादर करणार असल्याचं सांगण्यात आलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.