Pat Cummins चा यू टर्न, 37 लाखांची मदत PM CARES नव्हे तर UNICEF Australia ला

आयपीएलमध्ये KKR कडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) पीएम केअर्स फंडामध्ये देणगी देण्याचा निर्णय बदलला आहे.

Pat Cummins चा यू टर्न, 37 लाखांची मदत PM CARES नव्हे तर UNICEF Australia ला
Pat Cummins
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 11:42 PM

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) पीएम केअर्स फंडामध्ये देणगी देण्याचा निर्णय बदलला आहे. त्याने आता 50,000 डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) रक्कम पीएम केअर्सऐवजी (PM CARES FUND) कोव्हिड-19 पीडितांसाठी काम करणाऱ्या युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या इंडिया कोव्हिड-19 क्रायसिस अपीलला (UNICEF Australia’s India COVID-19 Crisis Appeal) दिली आहे.

कमिन्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) भारतातील कोव्हिड-19 पीडितांना मदत करण्याच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे. सोबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, “ग्रेट जॉब सीए… मी युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या भारतातील कोव्हिड -19 क्रायसिस अपीलसाठी माझं योगदान दिलं आहे.” (Pat Cummins takes ‘U Turn’ of donation from PM CARES Funds to UNICEF Australia’s India COVID-19 Crisis Appeal)

कमिन्सचा यू टर्न

यापूर्वी 26 एप्रिल रोजी कमिन्सने पीएम केअर फंडाला 50,000 डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) मदत जाहीर केली होती. पण नंतर त्याने त्याचा विचार बदलला. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक नोटदेखील शेअर केली आहे. ज्यात कमिन्सने म्हटलंय की, “एक खेळाडू म्हणून आमच्याकडे एक गोष्ट आहे, ती म्हणजे आम्हाला लोक ओळखतात. याच गोष्टीचा आम्ही योग्य प्रकारे वापर करु शकतो. त्यामुळेच मी पीएम केअर्स फंडासाठी काही मदत एकत्र केली आहे. विशेषत: भारतातील रूग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा, यासाठी मी 50 हजार डॉलर्सची मदत दिली आहे.

कमिन्सने त्याच्या या मदतीबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तसेच त्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर खेळाडूंनादेखील अशीच मदत करण्याचे आवाहन केलं होतं. कमिन्सने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, ”एक खेळाडू म्हणून माझ्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि मी पीएम केअर फंडासाठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो,

कमिन्सने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी गेली अनेक वर्ष भारतात येतोय आणि मी या देशाच्या प्रेमात पडलो आहे. येथील लोक माझ्यावर भरभरुन प्रेम करतात. कोरोना संकटाच्या काळात अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएल खेळवणे योग्य की अयोग्य यावर सध्या चर्चा सुरू आहेत. मी भारत सरकारला सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळात आयपीएलमुळे किमान चार तास तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे.

दरम्यान आता कमिन्सने त्याचा निर्णय बदलला आहे. त्याने त्याची मदत ही पीएम केअर्स ऐवजी युनिसेफला देम्याचे ठरवले आहे.

इतर बातम्या

IPL 2021 : आधी कर्णधारपद काढून घेतलं, नंतर संघातून वगळलं, आता थेट ‘वॉटरबॉय’, वॉर्नरसोबत हैदराबादचं नेमकं चाललंय काय?

KL Rahul hospitalized: पंजाबचा कॅप्टन के. एल. राहुल रुग्णालयात, आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह

(Pat Cummins takes ‘U Turn’ of donation from PM CARES Funds to UNICEF Australia’s India COVID-19 Crisis Appeal)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....