PBKS vs CSK IPL 2021, Match 8 Result | चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय

| Updated on: Apr 16, 2021 | 11:19 PM

PBKS vs CSK 2021 Live Score Marathi | पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने

PBKS vs CSK IPL 2021, Match 8 Result | चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय
PBKS vs CSK 2021 Live Score Marathi | पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super King) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईकडून मोईने अलीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर फॅफ डु प्लेसिसने नाबाद 36 धावांची खेळी केली. (pbks vs csk live score ipl 2021 match punjab kings vs chennai super kings scorecard online wankhede stadium mumbai in marathi)

PBKS vs CSK लाईव्ह स्कोअरकार्डसाठी क्लिक करा 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Apr 2021 11:17 PM (IST)

    चेन्नईचा 14 व्या मोसमातील पहिला विजय

    चेन्नईने पंजाबला 6 विकेट्सने नमवत यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 107 धावांचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट चेन्नईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईकडून मोईन अलीने 46 धावांची खेळी केली. तर शेवटपर्यंत फॅफ डु प्लेसिसने नाबाद 36 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.

  • 16 Apr 2021 10:33 PM (IST)

    चेन्नईला सलग 2 चेंडूत 2 धक्के

    मोहम्मद शमीने चेन्नईला 2 चेंडूत 2 धक्के दिले आहे. शमीने सुरेश रैना आणि त्यानंतर अंबाती रायुडूला आऊट केलं.

  • 16 Apr 2021 10:30 PM (IST)

    चेन्नईला तिसरा धक्का

    चेन्नईला तिसरी विकेट गमावली आहे. सुरेश रैना आऊट झाला आहे.

  • 16 Apr 2021 10:19 PM (IST)

    चेन्नईला दुसरा धक्का

    चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे.  मोईन अली आऊट झाला आहे. मोईनने 46 धावा केल्या.

  • 16 Apr 2021 10:15 PM (IST)

    दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    चेन्नईच्या फॅफ डु प्लेसिस आणि मोईन अली या जोडीने दुसऱ्या अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 16 Apr 2021 10:07 PM (IST)

    चेन्नईच्या 10 ओव्हरमध्ये 64 धावा

    चेन्नईने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 64 धावा केल्या आहेत. फॅफ डु प्लेसिस आणि मोईन अली ही सेट जोडी मैदानात खेळत आहेत. चेन्नईला विजयासाठी उर्वरित  10 ओव्हरमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे.

  • 16 Apr 2021 09:47 PM (IST)

    चेन्नईच्या पावर प्लेमध्ये 32 धावा

    चेन्नईने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 32 धावा केल्या आहेत. चेन्नईने ऋतुराज गायकवाडची एकमेव विकेट गमावली.

  • 16 Apr 2021 09:42 PM (IST)

    चेन्नईला पहिला धक्का

    चेन्नईने पहिली विकेट गमावली आहे. ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का बसला आहे. गायकवाडने 5 धावा केल्या.

  • 16 Apr 2021 09:34 PM (IST)

    चेन्नईची सावध सुरुवात

    विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईने सावध सुरुवात केली आहे. चेन्नईने पहिल्या 4 ओव्हरमध्ये 22 धावा केल्या आहेत. फॅफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 16 Apr 2021 09:18 PM (IST)

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस ही सलामी जोडी खेळत आहे. चेन्नईला विजयासाठी 107 धावांची आवश्यकता आहे.

  • 16 Apr 2021 09:00 PM (IST)

    चेन्नईला विजयासाठी 107 धावांचे आव्हान

    पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super King) विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 106 धावा केल्या. पंजाबकडून शाहरुख खानने 47 धावांची खेळी केली. तर चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

  • 16 Apr 2021 08:55 PM (IST)

    पंजाबला आठवा धक्का

    पंजाबला आठवा धक्का बसला आहे. शाहरुख खानची झुंजार खेळी समाप्त झाली आहे. शाहरुखने 47 धावांची खेळी केली.

  • 16 Apr 2021 08:44 PM (IST)

    पंजाबला सातवा धक्का

    ड्वेन ब्राव्होने पंजाबला सातवा धक्का दिला आहे.ब्राव्होने मुर्गन आश्विनला आऊट केलं आहे.

  • 16 Apr 2021 08:07 PM (IST)

    पंजाबला पाचवा धक्का

    दीपक चाहरने पंजाबला पाचवा धक्का दिला आहे. चाहरने दीपक हुड्डाला 10 धावांवर आऊट केलं.

  • 16 Apr 2021 08:06 PM (IST)

    पंजाबच्या पावर प्लेमध्ये 26 धावा

    पंजाबने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 26 धावा केल्या आहेत. या दरम्यान पंजाबने महत्वपूर्ण 4 विकेट्स गमावल्या.

  • 16 Apr 2021 07:56 PM (IST)

    रवींद्र जाडेजाचा शानदार कॅच, ख्रिस गेल आऊट

    रवींद्र जाडेजाने हवेत झेपावत ख्रिस गेलचा शानदार कॅच घेतला आहे. ख्रिस गेलच्या रुपात पंजाबने तिसरी विकेट गमावली आहे. दरम्यान याआधी जाडेजाने केएल राहुलला रन आऊट केलं.

  • 16 Apr 2021 07:52 PM (IST)

    रवींद्र जाडेजाचा डायरेक्ट थ्रो, के एल रन आऊट

    रवींद्र जाडेजाच्या रॉकेट थ्रोवर केएल राहुल रन आऊट झाला आहे. स्ट्राईक एंडवर असलेल्या ख्रिस गेलने फटका मारुन नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या केएलला धावेसाठी कॉल दिला. मात्र हो नाहीच्या नादात डेंजर एंडवर केएल रन आऊट झाला.

  • 16 Apr 2021 07:45 PM (IST)

    ख्रिस गेलला जीवनदान

    दीपक चाहरने चेन्नईकडून पहिली ओव्हर टाकली. या पहिल्या ओव्हरमध्ये दीपक चाहरने 1 विकेट मिळवून दिली. मात्र याच ओव्हरमध्ये पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला जीवनदान मिळालं. मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर गेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर गेलने पॉइंटवरुन खेळण्याचा प्रयत्न केला. गेलने मारलेला फटका ऋतुराज गायकवाडच्या दिशेने गेला. मात्र ऋतुराजने गेलचा सोप्पा कॅच सोडला. त्यामुळे गेलला जीवनदान मिळालं.

  • 16 Apr 2021 07:36 PM (IST)

    पंजाबला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका

    चेन्नईला वेगवान गोलंदाज दीपक चाहरने पंजाबला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का दिला आहे. दीपकने  मयंक अग्रवालला बोल्ड केलं.  मयंक भोपळा न फोडता माघारी गेला. 
     
     
  • 16 Apr 2021 07:33 PM (IST)

    पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात

    पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात झालाी आहे. कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 16 Apr 2021 07:12 PM (IST)

    पंजाब किंग्‍सचे अंतिम 11 खेळाडू

    केएल राहुल (विकेटकीपर आणि कर्णधार), मयंक अग्रवाल, दीपक हुड्डा, क्रिस गेल, निकोलस पूरन, शाहरुख खान, झाय रिचर्डसन, मुरुगन अश्विन, मोहम्‍मद शमी, राइली मेरेडिथ, अर्शदीप सिंह.

  • 16 Apr 2021 07:11 PM (IST)

    चेन्‍नई सुपर किंग्‍सची प्लेइंग इलेव्हन

    एमएस धोनी (विकेटकीपर आणि कर्णधार), ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्‍लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.

  • 16 Apr 2021 07:04 PM (IST)

    चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

    चेन्नईने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पंजाबला फलंदाजीसाठी भाग पाडले आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.

  • 16 Apr 2021 06:34 PM (IST)

    उभयसंघातील आकडेवारी काय सांगते?

    आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नई पंजाबवर वरचढ राहिली आहे. चेन्नईने 14 मॅचमध्ये पंजाबचा पराभव केला आहे. तर पंजाबनेही 9 सामन्यांमध्ये चेन्नईवर मात केली आहे.

  • 16 Apr 2021 06:33 PM (IST)

    पंजाब विरुद्ध चेन्नई आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

Published On - Apr 16,2021 11:17 PM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.