PBKS vs MI, IPL 2021 Match 17 Result | केएल राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी, पंजाबचा मुंबईवर 9 विकेट्ने शानदार विजय
PBKS vs MI Live Score, IPL 2021 | पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स विरुद्ध आमनेसामने
चेन्नई : पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान पंजाबने 1 विकेट गमावून 17.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद 60 धावा केल्या. तर ख्रिस गेलने नाबाद 43 धावांची खेळी केली. मुंबईकडून राहुल चहरने एकमेव विकेट घेतली. या सामन्याचे आयोजन चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये (Ma Chidambaram Stadium Chennai) करण्यात आले होते. (pbks vs mi live score ipl 2021 match punjab kings vs mumbai indians scorecard online ma chidambaram stadium chennai in marathi)
Key Events
पंजाबचा कर्णधार केएल राहुलने विजयी खेळी साकारली. केएलने 52 चेंडूत 3 फोर आणि 3 सिक्ससह 115.38 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 60 धावांची खेळी केली.
कर्णधार केएल राहुल आणि ख्रिस गेल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची नाबाद भागीदारी केली. या जोडीने पंजाबला विजय मिळवून दिला. राहुलने सर्वाधिक नाबाद 60 धावा केल्या. तर ख्रिस गेलने नाबाद 43 धावांची खेळी केली.
LIVE Cricket Score & Updates
-
पंजाबचा दणदणीत विजय
पंजाबने मुंबईवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान पंजाबने 1 विकेट गमावून 17.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद 60 धावा केल्या. तर ख्रिस गेलने नाबाद 43 धावांची खेळी केली.
Match 17. It's all over! Punjab Kings won by 9 wickets https://t.co/oSv9pZngPE #PBKSvMI #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
कर्णधार केएल राहुलचं अर्धशतक
कर्णधार केएल राहुलचं अर्धशतक पूर्ण झालं आहे. केएलने 50 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलंय.
FIFTY!
A hard-fought half-century for @klrahul11 off as many deliveries.
His 24th in #VIVOIPL
Live – https://t.co/oSv9pZERHc #PBKSvMI #VIVOIPL pic.twitter.com/A8wLPnZhBl
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
-
गेलचा जोरदार सिक्स
ख्रिस गेलने 15 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जयंत यादवच्या बोलिंगवर 93 मीटरचा जोरदार सिक्स लगावला आहे.
-
पंजाबचा 14 ओव्हरनंतर स्कोअर
पंजाबने 14 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 93 धावा केल्या आहेत. बंगळुरुला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. ख्रिस गेल आणि कर्णधार केएल राहुल नाबाद खेळत आहेत.
-
गेलचे सलग 2 चौकार
ख्रिस गेलने जयंत यादवच्या गोलंदाजीवर 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग 2 चौकार लगावले आहेत.
-
-
पंजाबच्या 10 ओव्हनंतर धावा
पंजाबने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 62 धावा केल्या आहेत. केएल राहुल 33 आणि ख्रिस गेल 3 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
पंजाबला पहिला धक्का
पंजाबला पहिला धक्का बसला आहे. मयंक अग्रवाल आऊट झाला आहे. मयंकने 25 धावांची खेळी केली.
-
पंजाबच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या पंजाबच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.
Match 17. 6.2: K Pandya to M Agarwal, 4 runs, 50/0 https://t.co/oSv9pZngPE #PBKSvMI #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
पंजाबचा पावर प्लेनंतरचा स्कोअर
पंजाबाने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 45 धावा केल्या आहेत. केएल राहुल 24 तर मयंक अग्रवाल 20 धावांवर नाबाद खेळत आहेत.
#PBKS have got off to a good start with 45/0 at the end of the powerplay!
Live – https://t.co/NMS54FiJ5o #PBKSvMI #VIVOIPL pic.twitter.com/IrWvo8JSmw
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
पंजाबची शानदार सुरुवात
पंजाबची शानदार सुरुवात झाली आहे. पंजाबच्या केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या सलामी जोडीने पहिल्या 4 ओव्हरमध्ये बिनबाद 37 धावा केल्या आहेत. केएल 21 तर मयंक 15 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
केएल राहुलचा सिक्स
केएल राहुलने तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला आहे.
-
मयंकचा शानदार सिक्स
मयंक अग्रवालने दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिक्स लगावला आहे.
-
केएल राहुलचे सलग 2 चौकार
कर्णधार केएल राहुलने दुसऱ्या ओव्हरमध्ये कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर सलग 2 चौकार लगावले आहेत.
-
पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात
पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सलामी जोडी मैदानात खेळत आहे. पंजाबला विजयासाठी 132 धावांची आवश्यकता आहे.
-
पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान
पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान मिळाले आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 131 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने 63 तर सूयकुमार यादवने 33 धावांची खेळी केली.
1️⃣3️⃣1️⃣ on the board. Big performance from our bowling unit required to defend this total. Believe! ?#OneFamily #MumbaiIndians #MI #PBKSvMI #IPL2021 pic.twitter.com/StAjQnzGff
— Mumbai Indians (@mipaltan) April 23, 2021
-
मुंबईला सहावा दणका
मुंबईने सहावी विकेट गमावली आहे. कृणाल पंड्या 3 धावा करुन माघारी परतला आहे.
-
मुंबईला पाचवा दणका
मुंबईने पाचवी विकेट गमावली आहे. हार्दिक पंड्या 1 रन करुन आऊट झाला आहे.
-
पोलार्डचा सिक्सर
कायरन पोलार्डने 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अर्शदीप सिंहच्या बोलिंगवर सिक्स खेचला आहे.
-
मुंबईला मोठा धक्का
मुंबईला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला आहे. रोहितने 52 चेंडूत 5 फोर आणि 2 सिक्ससह 63 धावांची झुंजार खेळी केली.
-
मुंबईला तिसरा झटका
मुंबईने तिसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव 33 धावा करुन बाद झाला आहे.
-
मुंबईचा 16 ओव्हरनंतर स्कोअर
मुंबईने 16 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 105 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा 62 आणि सूर्यकुमार यादव 33 धावांवर खेळत आहेत.
-
सूर्यकुमार यादवचा चौकार, मुंबई 100 पार
सूर्यकुमार यादवने सामन्यातील 16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर फोर लगावला. यासह मुंबईच्या 15.2 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.
-
हिटमॅन रोहित शर्माचे झुंजार अर्धशतक
कर्णधार रोहित शर्माने चौकार ठोकत 40 चेंडूत झुंजार अर्धशतक पूर्ण केलं आहे. रोहितच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील हे 40 वं अर्धशतक ठरलं.
FIFTY!??
First 5️⃣0️⃣ of the season for Hitman @ImRo45 and he gets it 40 in balls with 4×4, 2×6.https://t.co/NMS54FiJ5o #VIVOIPL #PBKSvMI pic.twitter.com/nGUOMRo82a
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
मुंबईची तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या मुंबईकर जोडीने 37 चेंडूत या 50 धावांची भागीदारी केली.
-
सूर्यकुमार यादवचा क्लासिक सिक्स
सूर्यकुमार यादवने 13 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर 85 मीटर लांब सिक्स लगावला आहे.
-
हिटमॅनचा जोरदार सिक्स
हिटमॅन रोहितने सामन्यातील 12 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सिक्स लगावला आहे.
-
मुंबईचा 10 ओव्हरनंतर स्कोअर
मुंबईने 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 49 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव खेळत आहेत.
First maximum of the match and it comes from the blade of Hitman.
After 10 overs, #MI are 49-2https://t.co/NMS54FiJ5o #VIVOIPL #PBKSvMI pic.twitter.com/Wvw7UvQ72F
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
रोहितचा शानदार सिक्स
रोहितने 10 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर जोरदार सिक्स लगावला आहे.
-
रोहितचे सलग 2 चौकार
कर्णधार रोहित शर्माने 8 व्या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूवर फॅबियन एलनच्या बोलिंगवर सलग 2 चौकार लगावले आहेत.
-
मुंबईला दुसरा झटका
मुंबईला दुसरा झटका बसला आहे. इशान किशन आऊट झाला आहे. इशानने 17 चेंडूत 6 धावा केल्या.
-
मुंबईच्या पावर प्लेमधील धावा
मुंबईने पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 21 धावा केल्या. मुंबईला या पावर प्लेचा हवा तसा लाभ घेता आला नाही.
-
रोहितचा चौकार
रोहितने सामन्यातील पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला आहे.
-
मुंबईची संथ सुरुवात
मुंबईची संथ सुरुवात झाली आहे. पलटणने पहिल्या 4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 12 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि इशान किशन खेळत आहेत.
-
मुंबईला पहिला झटका
मुंबईला पहिला झटका बसला आहे. क्विंटन डी कॉक आऊट झाला आहे. क्विंटनने 3 धावा केल्या.
-
मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात
मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा-क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.
-
पंजाबमध्ये एकमेव बदल
मुंबई विरुद्धच्या सामन्यासाठी पंजाबमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. लेग स्पीनर एम आश्विनच्या जागी लेग स्पीनर रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. तर मुंबईच्या पलटणमध्ये कोणताही केलेला नाही.
-
पंजाब किंग्सची टीम
केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, दीपक हुड्डा, ख्रिस गेल, निकोलस पूरन, शाहरुख खान, फॅबियन एलन, मोइजेस हेनरिक्स, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह.
Match 17. Punjab Kings XI: KL Rahul, M Agarwal, C Gayle, N Pooran, D Hooda, M Henriques, S Khan, F Allen, R Bishnoi, M Shami, A Singh https://t.co/oSv9pZngPE #PBKSvMI #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, ट्रेन्ट बोल्ट आणि जयंत यादव.
Match 17. Mumbai Indians XI: R Sharma, Q de Kock, S Yadav, I Kishan, K Pollard, H Pandya, K Pandya, J Yadav, R Chahar, J Bumrah, T Boult https://t.co/oSv9pZngPE #PBKSvMI #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
पंजाब किंग्सने टॉस जिंकला
पंजाब किंग्सने टॉस जिंकला आहे. केएल राहुलने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करणार आहे.
Match 17. Punjab Kings win the toss and elect to field https://t.co/oSv9pZngPE #PBKSvMI #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
-
पंजाब विरुद्ध मुंबई आमनेसामने
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 17 वा सामना पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
Hello & good evening from Chennai for Match 17 of the #VIVOIPL ??
The @klrahul11-led @PunjabKingsIPL will take on @ImRo45's @mipaltan. ?? #PBKSvMI
Which team are you rooting for tonight❓ pic.twitter.com/dTWUh1gR1i
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
Published On - Apr 23,2021 11:03 PM