PBKS vs RCB IPL 2021 Match 26 Result | हरप्रीतच्या फिरकीची कमाल, केएलची शानदार खेळी, पंजाबची बंगळुरुवर 34 धावांनी मात

| Updated on: Apr 30, 2021 | 11:20 PM

PBKS vs RCB 2021 Live Score Marathi | पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 34 धावांनी पराभव केला.

PBKS vs RCB IPL 2021 Match 26  Result | हरप्रीतच्या फिरकीची कमाल, केएलची शानदार खेळी, पंजाबची बंगळुरुवर 34 धावांनी मात
PBKS vs RCB 2021 Live Score in Marathi | पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने

अहमदाबाद :  पंजाब किंग्सने (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royals Challengers Banglore) 34 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने बंगळुरुला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबच्या गोलंदाजांसमोर बंगळुरने लोटांगण घातलं. बंगळुरुला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 145 धावाच करता आल्या. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर रजत पाटीदारने 31 धावांची खेळी केली. हरप्रीत ब्रार पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. हरप्रीतने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिश्नोईने 2 विकेट्स घेत हरप्रीतला चांगली साथ दिली. या मॅचचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले होते. (pbks vs rcb live score ipl 2021 match punjab kings vs royal challengers bangalore scorecard online narendra modi stadium ahmedabad in marathi)

Key Events

कर्णधार केएलची शानदार खेळी

कर्णधार केएल राहुलने 91 धावांची शानदार खेळी केली. केएलने 159.65 च्या स्ट्राईक रेटने 57 चेंडूत 7 चौकार आणि 5 सिक्ससह नाबाद 91 धावा चोपल्या.

हरप्रीतची अष्टपैलू कामगिरी

पंजाब किंग्सच्या हरप्रीत ब्राररने अष्टपैलू कामगिरी केली. हरप्रीतने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 19 धावा देऊन विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डी व्हीलियर्स या स्फोटक फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे हरप्रीतने 1 मेडन ओव्हर टाकली. तसेच हरप्रीतने शाहबाद अहमदची कॅच घेतली. तसेच बॅटिंग करताना हरप्रीतने डेथ ओव्हरमध्ये 17 चेंडूत 1 फोर आणि 2 सिक्ससह 25 धावांची नाबाद खेळी केली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 30 Apr 2021 11:18 PM (IST)

    पंजाबचा बंगळुरुवर 34 धावांनी विजय

    पंजाबने बंगळुरुवर 34 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह पंजाबने या मोसमातील तिसरा विजय साकारला आहे. पंजाबने बंगळुरुला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. पण पंजाबच्या गोलंदाजांसमोर बंगळुरला20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 145 धावाच करता आल्या.

  • 30 Apr 2021 11:05 PM (IST)

    रवी बिश्नोईचा शानदार कॅच

    रवी बिश्नोईने हर्षल पटेलचा शानदार कॅच घेतला. 20 व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर फटका मारला. या चेंडूपासून रवी दूर होता. मात्र रवीने धावत हवेत झेपावत शानदार कॅच घेतला. हर्षलने 31 धावा केल्या.

  • 30 Apr 2021 11:00 PM (IST)

    बंगळुरुचा 19 ओव्हरनंतर स्कोअर

    बंगळरुने 19 ओव्हरनंतर 7 विकेट्स गमावून 133 धावा केल्या आहेत. हर्षल पटेल 27 तर कायले जेमिन्सन 8 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 30 Apr 2021 10:40 PM (IST)

    बंगळुरुला सहावा धक्का

    बंगळुरुला सहावा धक्का बसला आहे. शाहबाज अहमद आऊट झाला आहे. शाहबाजने 8 धावा केेल्या.

  • 30 Apr 2021 10:34 PM (IST)

    बंगळुरुला पाचवा धक्का

    बंगळुरुे पाचवी विकेट गमावली आहे. रजत पाटीदार कॅच आऊट झाला आहे. पाटीदारला ख्रिस जॉर्डनने निकोलस पूरनच्या हाती आऊट केलं. पाटीदारने 31 धावा केल्या.

  • 30 Apr 2021 10:25 PM (IST)

    बंगळुरुला चौथा झटका

    बंगळुरुला चौथा झटका बसला आहे. हरप्रीत ब्रारने  एबी डी व्हीलियर्सला राहुलच्या हाती कॅच आऊट केलं. एबीने 3 धावा केल्या.

  • 30 Apr 2021 10:21 PM (IST)

    बंगळुरुला सलग 2 धक्के

    फिरकीपटू हरप्रीत ब्रारने बंगळुरुला सलग 2 धक्के दिले आहेत. हरप्रीतने 11 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर कर्णधार विराट कोहलीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढील चेंंडूवर ग्लेन मॅक्सवेलला बोल्ड केलं. विशेष म्हणजे हरप्रीतने ही ओव्हर विकेट मेडन टाकली. विराटने 35 धावा केल्या. तर ग्लेन भोपळा न फोडता तंबूत परतला.

  • 30 Apr 2021 10:15 PM (IST)

    बंगळुरुला मोठा धक्का

    बंगळुरुला मोठा धक्का बसला आहे.  कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे. फिरकीपटू हरप्रीत ब्रारने विराटला क्लिन बोल्ड केलं आहे. विराटने 34 चेंडूत 35 धावांची खेळी केली.
     
     
  • 30 Apr 2021 09:59 PM (IST)

    हरप्रीतचं सिक्सने स्वागत

    विराट कोहलीने फिरकीपटू हरप्रीत ब्रारचं सिक्सने स्वागत केलं आहे. ब्रार सामन्यातील 7 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर विराटने जोरदार सिक्स लगावला. बंगळुरुने या 7 व्या ओव्हरमधून 10 धावा केल्या.

  • 30 Apr 2021 09:56 PM (IST)

    बंगळुरुचा पावर प्लेनंतर स्कोअर

    बंगळुरुने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 6 च्या स्ट्राईक रेटने 36 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली 16* आणि रजत पाटीदार 10* धावांवर नाबाद खेळत आहेत. बंगळुरुने देवदत्त पडीक्कलच्या रुपात एकमेव विकेट गमावली. देवदत्तने 7 धावा केल्या.

  • 30 Apr 2021 09:40 PM (IST)

    बंगळुरुला पहिला धक्का

    बंगळुरुने पहिली विकेट गमावली आहे.  रिले मेरिडिथने देवदत्त पडीक्कलला क्लीन बोल्ड केले. देवदत्तने 7 धावा केल्या.

  • 30 Apr 2021 09:33 PM (IST)

    दुसऱ्या ओव्हरची चौकाराने सुरुवात

    कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे  चौकाराने स्वागत केलं आहे. विराटने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बोलवर शमीच्या गोलंदाजीवर चौकार लगावला.

  • 30 Apr 2021 09:30 PM (IST)

    पहिला चौकार विराटच्या बॅटने

    बंगळुरुकडून पहिला चौकार कर्णधार विराट कोहलीने लगावला आहे.

  • 30 Apr 2021 09:26 PM (IST)

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामी जोडी मैदानात खेळत आहे. बंगळुरुला  विजयासाठी 180 धावांची आवश्यकता आहे.

  • 30 Apr 2021 09:25 PM (IST)

    CM Uddhav Thackeray on vaccination : लसीकरण केंद्रावर गर्दी करुन काही होणार नाही, तूर्त 3 लाख लसी आलेल्या आहेत

    उद्यापासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरणाची सरकारने तयारी केली आहे. तेवढी हिम्मत सरकारने ठेवली आहे. शिस्त लागेपर्यंत थोडा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोंधळ उडू नये म्हणून लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका. मी हात जोडून विनंती करतो की गर्दी करु नका. तूर्त 3 लाख लसी आलेल्या आहेत. त्यांचं वर्गीकरण लोकसंख्येनुसार केलं आहे. लग्नसमारंभ शिस्तीने पार पाडा. उत्साहाला थोडी मुरड घालावी. लग्नासाठी 25 जणांची मर्यादा घातलेली आहे. तसेच दोन तासांत लग्न समारंभ पार पाडावेत. धार्मिक, सामाजिक तसेच कोणत्याही राजकीय कार्यक्रमावर आपण बंधनं घातली  आहेत.

  • 30 Apr 2021 09:21 PM (IST)

    विराटसेनेला विजयासाठी 180 धावांचे आव्हान

    पंजाबने आरसीबीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 179 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने नाबाद 91 धावा केल्या. ख्रिस गेलने 46 धावांची खेळी केली. तर हरप्रीत ब्रारने 25 छोटेखानी पण महत्वाची खेळी केली.

  • 30 Apr 2021 09:18 PM (IST)

    20 व्या ओव्हरमध्ये 22 धावा

    पंजाबने शेवटच्या 20 व्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर 22 धावा चोपल्या. केएल राहुल आणि हरप्रीत ब्रारने जोरदार फटकेबाजी केली. या शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबच्या या फलंदाजांनी 2 सिक्स 2 फोर आणि 2 सिंगल्स घेतल्या.

  • 30 Apr 2021 09:08 PM (IST)

    CM Uddhav Thackeray on Industry : तिसऱ्या लाटेत अर्थचक्र थांबता कामा नये

    जी मदत जाहीर केली त्याची अंमलबजावणी करत आहोत. संपूर्ण जागात लाटांमधून लाटा येत आहेत. किती लाटा येणार हा प्रश्नच आहे. पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट आली. आता तज्ज्ञ म्हणत आहेत की तिसरी लाटसुद्धा येणार. तिसरी लाट आली तरी त्याचे एवढे घातक परिणाम होऊ द्यायचे नाही, यासाठी सरकारने कंबर कसली आहे. दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. तिसऱ्या लाटेत अर्थचक्र थांबता कामा नये. मी कामगार वर्गाच्या युनियन लिडरशी बोललो आहे. त्यांनी काय करायला पाहिजे याची मी त्यांना कल्पना दिली आहे. मला खात्री आहे. तिसरी लाट थोपवण्यात यश येणार याची खात्री आहे.

  • 30 Apr 2021 09:04 PM (IST)

    CM Uddhav Thackeray on Shivbhojan Thali : जवळपास चार कोटी लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ, 890 शिवभोजन केंद्र सुरु झाले

    रोजी मंदावेळ, पण रोटी थांबू देणार नाही.  या निर्बंधाच्या काळात सुमारे साडे पाज हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पॅकेज जाहीर केलं. पुढे काय झालं. आपल्याला कल्पना आहे शिवभोजन थाळी 10 रुपयांना होती. नंतर ती 5 रुपयांना केली होती. आता ती मोफत दिली जाते. आतापर्यंत जवळपास चार कोटी लोकांना  शिवभोजन थाळीचा लाभ भेटला आहे. सध्या 890 शिवभोजन केंद्र सुरु झाले आहेत. 7 कोटी लोकांना मोफत गहू आणि तांदूळ दिले जात आहे.

  • 30 Apr 2021 09:00 PM (IST)

    हरप्रीतचा जोरदार सिक्स

    हरप्रीतने 18 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सिक्सर लगावला आहे.

  • 30 Apr 2021 08:59 PM (IST)

    नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते- उद्धव ठाकरे

    काही ठिकाणी नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाला. विरारमध्येसुद्धा आग लागली. यामध्ये जीवाची  पर्वा न करता काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी हताश होतात. नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. परभणीमध्येसुद्धा एक अकल्पीत घटना झाली. पावसाळा सुरु होणार आहे. कुठे पूर येईल, पाणी घुसेल. विजा कडाडणार. त्यामुळे मी ऑडिट करण्याचे सांगितले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी जे जे करता येईल ते करतो आहोत.

  • 30 Apr 2021 08:59 PM (IST)

    हरप्रीत ब्रारचा चौकार

    हरप्रीत ब्रारने 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शानदार चौकार लगावला आहे.

  • 30 Apr 2021 08:57 PM (IST)

    275 ऑक्सिजन प्लांट आपण उभारत आहोत- उद्धव ठाकरे

    आपण कोणताही प्रयत्न सोडत नाहीयेत. वर्धात्या 1000 बेड्सची व्यवस्था करत आहेत. 275  ऑक्सिजन प्लांट आपण उभारत आहोत. येत्या काही दिवसांत हे प्लांट कार्यान्वित होतील. रोज पावणे तीन लाख चाचण्या करत आहोत. यामध्ये 60 ते 70 टक्के आरटीपीसीआर टेस्ट आहेत. उरलेल्या अँटिजन टेस्ट आहेत. मागील वर्ष ताणतणावात गेलं आहे. आपली सर्व आरोग्य यंत्रणा, तसेच डॉक्टर कसलीही उसंत न घेता काम करत आहे.

  • 30 Apr 2021 08:54 PM (IST)

    कोविडची तिसरी लाट आलीच तर ऑक्सिनज कमी पडणार नाही- उद्धव ठाकरे

    गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा, तालुक्यात रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची नर्मिती करण्याचे सांगितले आहे. मात्र, नव्याने प्लांट सुरु करायचा असेल तर त्याला काही वेळ लागतोच. 15 ते 20 दिवस लागतील.कोविडची तिसरी लाट आली तर ऑक्सिनज कमी पडणार नाही. तशी तयारी आपण केली आहे. मला खात्री आहे तशी वेळ येणार नाही. लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करणे सोपे असते. मात्र,गॅस ऑक्सिजनची वाहतूक करणे अवघड आहे. त्यामुळे गॅस ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी आपण कोविड सेंटर्स उभारत आहोत.

  • 30 Apr 2021 08:50 PM (IST)

    आपल्याला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज- उद्धव ठाकरे

    रुग्णांंमध्ये वाढ झाली तरमात्र परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. सध्या रेमडेसिव्हीरची मागणी वाढली आहे. आपल्याला 50 हजार इंजेक्शनची गरज आहे. केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या वाटपाचं नियोजन आपल्याकडे घेतलं आहे. सुरुवातीला केंद्राने 26 हजारच्या आसपास इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती. नंतर मी मागणी केल्यानंतर आता केंद्राने 43 हजार इंजेक्शन देण्याचे मान्य केलं. सध्या 35 हजाराच्या आसपास आपल्याला रोज इंजेक्शन मिळत आहेत. गरज नसताना रेमडेसिव्हीर वापरु नका. गरज नसताना हे इंजेक्शन वापरले तर त्याचे दुष्परिणाम होण्याचे शक्यता टाळता येउ शकत नाही. त्यामुळे गरज असेल तर रेमडेसिव्हीरचा वापर करावा.

  • 30 Apr 2021 08:46 PM (IST)

    पंजाबला पाचवा झटका

    पंजाबला पाचवा झटका बसला आहे युजवेंद्र चहलने शाहरुख खानला बोल्ड केलं आहे. शाहरुख भोपळा फोडण्यात ही अपयशी ठरला.

  • 30 Apr 2021 08:46 PM (IST)

    गरज नसताना दिलं तर रेमडिसिव्हरचे दुष्परिणाम- उद्धव ठाकरे

    राज्यात बेड्स वाढवले आहेत. जूनमध्ये तीन लाख 36 हजार बेड्स होते. आता ते 4 लाख 31  हजार आहेत. राज्यात आयसीयू बेड्स 11882  होते आता 28900 बेड्स आहेत. जूनला 3744 व्हेंटीलेटर्स होते. सध्या 11 हजार व्हेंटीलेटर्स आहेत. आपण बेड वाढवू शकतो. पण डॉक्टर,नर्सेस वाढवणे कठीण आहे. विचार केल्यावर एसीमध्ये बसूनसुद्धा घाम फुटतो.

  • 30 Apr 2021 08:43 PM (IST)

    पंजाबला चौथा धक्का

    पंजाबने चौथा विकेट गमावली आहे. दीपक हुड्डा मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. दीपकने 5 धावा केल्या.

  • 30 Apr 2021 08:42 PM (IST)

    रुग्णसंख्या स्थिरावली आहे- उद्धव ठाकरे

    आजच आपण ज्या पद्धतीने संयम दाखवत आहोत, तो जर दाखवला नसता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. अजूनही आपल्याला बंधनं पाळणं गरजेचं आहे. मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात फक्त दोन लॅब होत्या. आज 29 एप्रिल 2021 ला सध्या राज्याता 609 प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत. आपण चाचणीची क्षमता वाढवत आहोत. आपण चाचण्या तीन लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण काही जंबो कोविड सेंटर उभारले आहेत.

  • 30 Apr 2021 08:38 PM (IST)

    कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही- उद्धव ठाकरे

    कालच आपल्या उच्च न्यायालयाने सरकारला विचारलं आहे की यापेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का. मात्र मला वाटतं तशी गरज येणार नाही.  ज्या वेगाने रुग्णवाढ होत होती त्याच वेगाने आज 10 लाख सक्रिय रुग्णसंख्या असती. मी जे बोललो ते आपण ऐकलं, निर्बंध घालणं अवघड होतं. पण जी शक्यता होती ती रुग्णसंख्या आपण सहा ते साडेसहा लाखांपर्यंत स्थिरावून ठेवली आहे.

  • 30 Apr 2021 08:36 PM (IST)

    निकोलस पूरन शून्यावर बाद

    पंजाबला तिसरा धक्का बसला आहे. आक्रमक फलंदाज निकोलस पूरन पुन्हा शून्यावर बाद झाला आहे. निकोलसची या मोसमात शून्यावर बाद होण्याची चौथी वेळ ठरली.

  • 30 Apr 2021 08:32 PM (IST)

    कर्णधार केएल राहुलचे शानदार अर्धशतक

    पंजाबचा कर्णधार केएल राहुलने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. केएलने अवघ्या 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. केएलच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 25 तर या मोसमाती चौथं अर्धशतक ठरलं.

  • 30 Apr 2021 08:26 PM (IST)

    पंजाब किंग्सला मोठा झटका

    पंजाब किंग्सने दुसरी विकेट गमावली आहे. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आऊट झाला आहे. गेलने 24 चेंडूत 6 फोर आणि 2 सिक्ससह झंझावाती 46 धावांची खेळी केली. 

     
  • 30 Apr 2021 08:20 PM (IST)

    पंजाबचा 10 ओव्हरनंतर स्कोअर

    पंजाबने 10 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 91 धावा केल्या आहेत. ख्रिस गेल 45 तर केएल राहुल 36 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 30 Apr 2021 08:18 PM (IST)

    पंजाबची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    केएल राहुल-ख्रिस गेल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शानदार अर्धशतकी भागीदारी केली आहे. या भागीदारीदरम्यान ख्रिस गेलने जोरदार फटकेबाजी केली. तसेच केएल राहुलनेही संयमीपणे फटके लगावले. 

     
     
  • 30 Apr 2021 08:08 PM (IST)

    7 व्या ओव्हरमधून 15 धावा

    पंजाबने 7 व्या ओव्हरमध्ये 15 धावा फटकावल्या. ओव्हरच्या सुरुवातीला केएलने सिंगल रन घेतल ख्रिसला स्ट्राईक दिली. त्यानंतर गेलने 2 सिक्स आणि एक दुहेरी धाव घेतली.

  • 30 Apr 2021 08:05 PM (IST)

    गेलचा तडाखा, 6 व्या ओव्हरमध्ये चौकारांचा ‘पंच’

    ख्रिस गेलने सामन्यातील 6 व्या आणि पावर प्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 5 चौकार लगावले. गेलने कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर हे चौकार लगावले. पहिल्या 4 चेंडूत 4 चौकार लगावले. त्यानंतर 5 वा बोल डॉट केला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर फोर लगावत पावर प्लेचा शेवट केला.

  • 30 Apr 2021 07:49 PM (IST)

    पंजाब किंग्सला पहिला झटका

    पंजाब किंग्सने पहिली विकेट गमावली आहे. प्रभासिमरन सिंह कॅच आऊट झाला आहे. सिंहने 7 धावा केल्या. 
  • 30 Apr 2021 07:38 PM (IST)

    केएल राहुलचा क्लासिक सिक्स

    कर्णधार केएल राहुलने दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर 79 मीटर लांबीचा सिक्स लगावला आहे.

  • 30 Apr 2021 07:32 PM (IST)

    पंजाब किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात

    पंजाब किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार केएल राहुल आणि प्रभासिमरन सिंह सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 30 Apr 2021 07:28 PM (IST)

    दोन्ही संघात बदल

    या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. बंगळुरुने आपल्या संघात एकमेव बदल केला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे.

    तर पंजाबने 3 बदल केले आहेत. मयंक अग्रवाल, मोजेस हेनरिक्स आणि अर्शदीप सिंहला डच्चू देण्यात आला आहे. त्याजागी प्रभसिमरन सिंह, मंदीप सिंह आणि राइली मेरेडीथता समावेश करण्यात आला आहे.

  • 30 Apr 2021 07:15 PM (IST)

    विराटसेना

    विराट कोहली ((कर्णधार), देवदत्‍त पडीक्‍कल, रजत पाटीदार, ग्‍लेन मॅक्‍सवेल, एबी डीव्हीलियर्स, डेनियल सॅम्स, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, मोहम्‍मद सिराज, कायले जेमीन्सन आणि हर्षल पटेल.

  • 30 Apr 2021 07:13 PM (IST)

    पंजाब किंग्‍सचे शिलेदार

    केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत, दीपक हुड्डा, ख्रिस गेल, निकोलस पूरन, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, प्रभसिमरन सिंह, मोहम्‍मद शमी, रवि बिश्‍नोई आणि राइली मेरेडिथ.

  • 30 Apr 2021 07:04 PM (IST)

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंजाब प्रथम फलंदाजी करणार आहे. 

     
     
  • 30 Apr 2021 06:36 PM (IST)

    पंजाब विरुद्ध बंगळुरु आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 26 वा सामना पंजाब विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला अवघ्या काही मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

Published On - Apr 30,2021 11:18 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.