PBKS vs SRH, IPL 2021 Match 14 Result | आधी टिच्चून गोलंदाजी, मग बेअरस्टोचं अर्धशतक, हैदराबादचा पंजाबवर शानदार विजय
PBKS vs SRH 2021 Live Score Marathi | पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने
चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पंजाबच्या फलंदाजांनी 18.4 षटकात 9 विकेट्स राखून पूर्ण केलं आहे. जॉनी बेअरस्टोने संयमी अर्धशतक (63) झळकावत संघाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवून दिला. बेअरस्टोला कर्णधार डेव्हिड वॉर्नरने चांगली साथ दिली. वॉर्नरने 37 तर केन विलियमसनने 16 धावांचं योगदान दिलं. पंजाबकडून Fabian Allen याला एकमेव विकेट मिळवता आली.
Key Events
हैदराबादने पंजाबला पराभूत करत या मोसमातील पहिला विजय साकारला आहे. या आधीच्या पहिल्या तिन्ही सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता.
हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने विजयी खेळी साकारली. बेयरस्टोने 56 चेंडूत 3 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नाबाद 63 धावांची शानदार खेळी केली.
LIVE Cricket Score & Updates
-
हैदराबादकडून पंजाबचा पराभव
18.4 षटकात हैदराबादने पंजाने दिलेलं 121 धावांचं आव्हान पूर्ण केलं आहे.
-
जॉनी बेअरस्टोचं अर्धशतक
18 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दीपक हुडाच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोने चौकार वसूल करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. (बेअरस्टो 58 चेंडूत 51)
-
-
17 व्या षटकात केवळ 4 धावा
17 व्या षटकात हैदराबादने केवळ 4 धावा जमवल्या. त्यामुळे आता अखेरच्या तीन षटकात संघाला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. (हैदराबाद 104/1)
-
16 षटकात हैदराबादचं शतक, चार षटकात 21 धावांची आवश्यकता
16 षटकात सनरयजर्स हैदराबादने 100 धावा फलकावर झळकावल्या आहेत. उर्वरित चार षटकात हैदराबादला 21 धावांची आवश्यकता आहे.
-
हैदराबादला पहिला धक्का
हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आऊट झाला आहे. वॉर्नरने 37 धावा केल्या.
-
-
हैदराबादचा 9 ओव्हरनंतर स्कोअर
हैदराबादने 9 ओव्हरनंतर बिनबाद 64 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर 29 आणि जॉनी बेयरस्टो 31 धावांवर खेळत आहेत. शानदार सुरुवातीमुळे हैदराबाद मजबूत स्थितीत आहे.
-
हैदराबादच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे. वॉर्नर 22 आणि बेयरस्टो 26 धावांवर नाबाद खेळत आहेत.
#SRH have got off to a flying start here in Chennai.
50-run partnership comes up between @davidwarner31 & Bairstow.
Live – https://t.co/pOqSTj2Kp4 #PBKSvSRH #VIVOIPL pic.twitter.com/Axykbyvdmu
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
-
हैदराबादची झोकात सुरुवात
विजयी आव्हानाचं पाठलाग करताना हैदराबादने झोकात सुरुवात केली आहे. हैदराबादने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 27 धावा केल्या आहेत.
-
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. हैदराबादला विजयासाठी 121 धावांची आवश्यकता आहे.
-
हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे आव्हान
सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांसमोर पंजाब किंग्सने लोटांगण घातलं आहे. पंजाबने हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे माफक आव्हान दिले आहे. पंजाबने 19. 4 ओव्हरमध्ये सर्वबाद 120 धावा केल्या आहेत. पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि शाहरुख खानने प्रत्येकी 22 धावा केल्या. तर हैदराबादकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
-
पंजाबला आठवा झटका
पंजाबला आठवा झटका बसला आहे. शाहरुख खान आऊट झाला आहे. शाहरुखने 22 धावांची खेळी केली.
-
पंजाबला सातवा धक्का
पंजाबला सातवा धक्का बसला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने शानदार कॅच घेत फॅबियन एलन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
-
शाहरुख खानचा शानदार सिक्स
शाहरुख खानने 15 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 84 मीटर लांब शानदार सिक्स लगावला आहे.
-
पंजाबला सहावा धक्का
पंजाबला सहावा धक्का बसला आहे. विकेटकीपर जॉनी बेयरस्टोने मोइसेस हेनरिकेसला स्टंपिंग आऊट केलं आहे.
-
पंजाबला पाचवा धक्का
पंजाबने पाचवी विकेट गमावली आहे. दीपक हुड्डा एलबीडब्ल्यू आऊट झाला आहे. दीपकने 13 धावा केल्या.
-
पंजाबच्या 10 ओव्हरनंतर धावा
पंजाबने 10 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 53 धावा केल्या आहेत. मोईसेस हेनरिकेस आणि दीपक हुड्डा मैदानात खेळत आहेत.
-
पंजाबला चौथा धक्का
पंजाबला मोठा धक्का बसला आहे. ख्रिस गेल आऊट झाला आहे. फिरकीपटू रशीद खानने गेलला 15 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. यामुळे पंजाबची 4 बाद 47 अशी स्थिती झाली आहे.
-
डेव्हिड वॉर्नरचा डायरेक्ट थ्रो, निकोलस पूरन रन आऊट
डेव्हिड वॉर्नरने केलेल्या डायरेक्ट थ्रोवर पंजाबचा निकोलस पूरन रन आऊट झाला आहे. ख्रिस गेलने वॉर्नरच्या दिशेने शॉट मारुन एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात निकोलस स्ट्राईक एंडवर धावबाद झाला. पूरन भोपळा फोडण्यात अपयशी ठरला.
-
पंजाबला दुसरा धक्का
पंजाबने दुसरी विकेट गमावली आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल 22 धावा करुन आऊट झाला आहे. राशिद खानने मयंकचा सुंदर कॅच घेतला.
-
पंजाबच्या पावर प्लेनंतरच्या धावा
पंजाबने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 32 धावा केल्या आहेत. ख्रिस गेल आणि मयंक अग्रवाल मैदानात खेळत आहेत.
At the end of the powerplay #PBKS are 32/1
Live – https://t.co/THdvFeWUo9 #PBKSvSRH #VIVOIPL pic.twitter.com/3l6YYaofeU
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
-
पंजाब किंग्सला पहिला झटका
पंजाब किंग्सला पहिला झटका बसला आहे. कर्णधार केएल राहुल आऊट झाला आहे. केएलने 4 धावा केल्या.
-
रशीद खानकडून मयंकला जीवनदान
रशीद खानने मयंक अग्रवालला पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जीवनदान दिलं आहे. रशीदने सोडलेला कॅच हैदराबादला किती महागात पडणार, हे काही वेळातच समजेल.
-
पंजाब किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात
पंजाब किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. -
कर्णधार केएल राहुलला 2 किर्तीमान करण्याची संधी
पंजाबचा कर्णधार केएल राहुलला या सामन्यात किर्तीमान करण्याची संधी आहे. केएल 1 धाव करताच त्याच्या टी 20 क्रिकेटमधील 5 हजार धावा पूर्ण होतील. तसेच 1 सिक्ससह तो षटकारांच द्विशतक झळकावेल. त्यामुळे केएल कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
-
पंजाब किंग्सचे शिलेदार
केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, दीपक हुड्डा, ख्रिस गेल, निकोलस पूरन, शाहरुख खान, फॅबियन एलन, मोइजेस हेनरिक्स, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन आणि अर्शदीप सिंह.
-
सनरायजर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यम्सन, विराट सिंह, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद.
-
केदार जाधवचं हैदराबादकडून पदार्पण
सनरायजर्स हैदराबादने मराठमोळ्या केदार जाधवला पंजाब विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने केदारचं हैदराबादकडून पदार्पण ठरलं आहे. सामन्याआधी केदारला हैदराबादची कॅप देऊन त्याचं स्वागत करण्यात आलं. केदार गेल्या मोसमापर्यंत चेन्नईकडून खेळत होता.
.@JadhavKedar is all set to make his debut in the #SRH colours ??
Follow the game here – https://t.co/PsUV2KPwvf #VIVOIPL pic.twitter.com/VxBi6fa56Y
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
-
पंजाबने टॉस जिंकला
पंजाब किंग्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Match 14. Punjab Kings win the toss and elect to bat https://t.co/pOqSTj2Kp4 #PBKSvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
-
पंजाब विरुद्ध हैदराबाद आमनेसामने
आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
It's a double-header day at the #VIVOIPL wherein @klrahul11 led #PBKS will take on @davidwarner31's #SRH.
Who's your pick for the game?#PBKSvSRH pic.twitter.com/A4l5cBL9Rt
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
Published On - Apr 21,2021 6:55 PM