पंतप्रधान मोदींना विनंती केल्यानंतर आर. अश्विन झाला ट्रोल
नवी दिल्ली: किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळणाऱ्या खेळाडूंना IPL दरम्यान मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. त्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना अधिक मतदान व्हावे यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले […]

नवी दिल्ली: किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळणाऱ्या खेळाडूंना IPL दरम्यान मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. त्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना अधिक मतदान व्हावे यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अश्विनने ही विनंती केली आहे.
IPL दरम्यान खेळाडू सामना खेळण्यासाठी आपआपल्या मतदारसंघापासून दूर असतील आणि त्यामुळे त्यांना मतदान करणे शक्य होणार नाही. अशास्थितीत अश्विनने पंतप्रधान मोदींकडे खेळाडूंना जेथे असतील तेथून मतदान करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.
विनंतीनंतर अश्विन झाला ट्रोल
पंतप्रधान मोदी यांनी शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विन यांना मतदारांना मतदानासाठी जागरूक करण्याचे आवाहन केले होते. याला उत्तर देताना अश्विन म्हणाला, “मतदान आपल्या देशाच्या लोकशाहीचा प्रमुख भाग राहिला आहे, असे मी नेहमी मानत आलो आहे. मी देशातील सर्व मतदारांना मतदान करुन योग्य नेत्याला निवडण्याचे आवाहन करतो.” यानंतर अश्विनने दुसरे ट्विट केले. यात तो म्हणाला, ‘नरेंद्र मोदी सर, मी तुम्हाला विनंती करतो की, IPL मधील खेळाडूंना मतदानादरम्यान कोठेही असले, तरी मतदान करण्याची परवानगी द्यावी.’
अश्विनच्या दुसऱ्या ट्विटवर मात्र लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी अश्विनला ही मागणी पंतप्रधान मोदींकडे नाही, तर निवडणूक आयोगाकडे करायला सांगितली. यासह अनेक लोकांनी त्याला ‘मंकडिंग’ प्रकरणावरून ‘चीटर’देखील म्हटले. सध्या अश्विनच्या या ट्विटवर हजारो लोक प्रतिक्रिया देत आहेत.
लोकसभेची निवडणूक 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यांमध्ये होणार आहे. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत अभिनेते, क्रिकेटर, व्यापारी आणि आध्यात्मिक गुरूंना लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले होते.
संबंधित बातम्या –