T20 WC : या टीमच्या खेळाडूंना टीमसाठी खेळण्यापेक्षा पैशात अधिक रस, माजी खेळाडूचा खळबळजनक आरोप
खराब कामगिरी केल्यामुळे वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड संपूर्ण टीमची चौकशी करणार आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियात (Australia) झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) वेस्टइंडीज टीमची (west indies) कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे वेस्टइंडीज टीमला उपांत्य फेरी सुद्धा गाठता आली नाही. छोट्या टीमकडून ज्यावेळी वेस्टइंडीज टीमचा पराभव झाला, त्यावेळी क्रिकेटच्या चाहत्यांनी खेळाडूंवरती जोरदार टीका केली. विशेष म्हणजे वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड टीमच्या माजी दिग्गज खेळाडूंकडून विश्वचषक स्पर्धेसाठी खेळणाऱ्या टीमची चौकशी करणार आहे. वेस्टइंडीजच्या एका माजी खेळाडूने खळबळजनक आरोप केला आहे.
वेस्टइंडीज टीमचा माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल याने काही खेळाडूंना स्वत:च्या टीममध्ये खेळण्यापेक्षा पैशात अधिक रस असल्याचा मोठा आरोप केला आहे. कारण वेस्ट इंडिज टीमचे अनेक खेळाडू इतर देशात t20 क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. देशभरात होत असलेल्या t20 स्पर्धेत खेळण्याची खेळाडूंना अधिक उत्सुकता आहे. आम्ही देशासाठी खेळलो आहोत, त्याचा आम्हाला गर्व आहे असंही शिवनारायण चंद्रपॉल म्हणाला.
खराब कामगिरी केल्यामुळे वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड संपूर्ण टीमची चौकशी करणार आहे. त्यासाठी वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने माजी तीन खेळाडूंची समिती तयार केली आहे. त्यामुळे ब्रायन लाराचा सुद्धा समावेश आहे.