T20 World Cup 2022 : टीम इंडियाच्या या खेळाडूचे पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंनी केले कौतुक
आशिया चषकापासून टीम इंडियाचे तीन खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
नवी दिल्ली : टीम इंडियाची (Team India) विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) कामगिरी चांगली राहिली आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या तीन मॅच झाल्या, त्यापैकी दोन मॅच टीम इंडियाने जिंकल्या आहेत. अजून टीम इंडियाच्या तीन मॅच उरल्या आहेत. टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे पाकिस्तान (pakistan) आणि नेदरलॅंडविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया विजयी झाली.
आशिया चषकापासून टीम इंडियाचे तीन खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामध्ये विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या या खेळाडूंचा समावेश आहे. सुर्यकुमार यादव सध्या अधिक चर्चेत आहे. त्याने प्रत्येक मॅचमध्ये कमी चेंडूत अधिक धावा काढल्या आहेत.
कालच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला, परंतु सुर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आफ्रिकेविरुद्ध सुर्यकुमार यादव सोडला तर एकाही फलंदाजांने चांगली खेळी केली नाही. यादवने कालच्या मॅचमध्ये 40 चेंडूत 68 धावा काढल्या.
सुर्यकुमार यादवच्या चांगल्या फलंदाजीची पाकिस्ताच्या क्रिकेटपटूंनी तारिफ केली आहे. शोएब मलिक, मिस्बाह उल हक, वसीम अकरम हे एका स्पोर्टस वाहिनीवरती बोलत असताना त्यांनी सुर्यकुमार यादवची तारिफ केली आहे.
सुर्यकुमार यादव हा गोलंदाजाच्या डोक्याप्रमाणे फलंदाजी करतो. विशेष म्हणजे मॅचची परिस्थिती समजून घेऊन ताबडतोब फलंदाजी करण्यात सुर्यकुमार यादव माहिर आहे.