CWG 2022 : पंतप्रधान राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांची आज भेट घेणार, खेळाडूंनी 61 पदके जिंकली
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमधून परतलेल्या पदकविजेत्यांचीही भेट घेतली होती. यावेळी खेळाडूंनी बर्मिंगहॅमला रवाना होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला.
मुंबई : भारताने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 61 पदके जिंकली. तसेच आकडेवारी मध्ये चौथे स्थान पटकावले. वर्ल्ड चॅम्पियन आणि कॉमनवेल्थ गेम्सची सुवर्णपदक विजेती बॉक्सर निखत जरीनने (Nitika Jarin) या संदर्भात सांगितले की, मी पंतप्रधानांना (Prime Minister) भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिला तिच्या बॉक्सिंग ग्लोव्हजवर त्यांची स्वाक्षरी हवी आहे. मागच्या वेळी तिने तिच्या टी-शर्टवर पंतप्रधानांची सही घेतली होती. तसेच मागच्या वेळी मी त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. यावेळी पुन्हा मी एक नवीन सेल्फी घेणार आहे असंही तिने सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना दिलेल्या आश्वासन आज पुर्ण करतील.
PM Modi to host CWG 2022 medal winners at his official residence today
हे सुद्धा वाचाRead @ANI Story | https://t.co/48YfVcGsqH#PMModi #CommonwealthGames2022 #CommonwealthGames pic.twitter.com/xaf1YfNbGD
— ANI Digital (@ani_digital) August 13, 2022
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमधून परतलेल्या पदकविजेत्यांचीही भेट घेतली होती. यावेळी खेळाडूंनी बर्मिंगहॅमला रवाना होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेनंतर खेळाडूंना भेटण्यासाठी वेळ काढू, असे सांगितले होते. त्यामुळे ते आज सर्व खेळाडूंची भेट घेणार आहेत. तसेच त्यांना भेटून त्यांचं स्वागत देखील करणार आहेत.
पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची नावे
22 सुवर्ण पदक जिंकली
22 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टीटी पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश, नवीन, भाविना, नीतू, अमित पंघल, नीतू पंघल, अल्धौस जरीन, शरत-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, शरत.
16 रौप्य पदकं जिंकली
16 रौप्य: संकेत सरगर, बिंदिया राणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबाकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर , पुरुष हॉकी संघ.
23 कांस्य पदकं जिंकली
23 कांस्य: गुरुराजा, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, सोनलबेन, महिला हॉकी टीम, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान.