IPL Update : आयपीएलचं बिगुल वाजलं पण एक वाईट बातमी आली समोर

| Updated on: Feb 17, 2023 | 7:04 PM

आयपीएलचा 16 व्या हंगामाचं बिगुल वाजलं असून वेळापत्रक जाहीर झालं आहे. मात्र एक वाईट बातमी समोर आली आहे.

IPL Update : आयपीएलचं बिगुल वाजलं पण एक वाईट बातमी आली समोर
Follow us on

मुंबई : आयपीएलचा 16 व्या हंगामाचं बिगुल वाजलं असून वेळापत्रक जाहीर झालं आहे. क्रिकेट वर्तुळातील चाहते गेल्या काही दिवसांपासून आयपीएल कधी सुरू होते याची वाट पाहत होते. आयपीएलचा पहिला सामना 31 मार्चला होणार आहे. पहिला सामना गेल्या वर्षी ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडणार आहे. चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र एक वाईट बातमी समोर आली आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2023 फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स संघाला स्पर्धा सुरू होण्याआधी जबरदस्त धक्का बसलेला आहे. राजस्थान संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. प्रसिध सप्टेंबर 2022 मध्ये दुखापत झाली होती. तेव्हापासून प्रसिध टीम इंडियातून बाहेर आहे. या दुखापतीमुळे प्रसिधला अनेक मालिकांना मुकावं लागलं होतं. प्रसिधने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. “अनेक सामन्यांना मुकावं लागणार असल्याने मी दु:खी आहे. लवकरच परतेन”, असं कॅप्शन प्रसिधने या फोटोला दिलं आहे. प्रसिधवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

कृष्णाला विश्वचषक संघात सामील व्हायचे असेल तर त्याला लवकरात लवकर पुनरागमन करावे लागेल. मात्र, आता तो आयपीएलमधून बाहेर पडल्याने त्याच्यासाठी विश्वचषक खेळणे कठीण झाले आहे. यंदाच्या 16 व्या मोसमात एकूण 74 साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहे. या 74 सामन्यांचं आयोजन हे 12 स्टेडियममध्ये तरण्यात आलं आहे. तसेच 3 वर्षांनी पहिल्यांदा प्रत्येक टीम आपल्या होम ग्राउंडवर खेळणार आहे.

आयपीएलच्या या 16 व्या हंगामात क्रिकेट चाहत्यांना आणखी थरार पाहायला मिळणार आहे. कारण या पर्वासाठी 23 डिसेंबर 2022 ला मिनी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये प्रत्येक फ्रँचायजीने आपल्यानुसार खेळाडूंची निवड केली. त्यामुळे पुन्हा खेळाडू या संघातून त्या संघात गेले आहेत.