स्टार खेळाडूचा ऋषभ पंतपेक्षाही भयानक अपघात; कारचा चुराडा, एअर अॅम्बुलन्सने रुग्णालयात हलवलं
30 डिसेंबर 2022 ला दिल्लीहून डेहराडूनला जात असताना भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतचा भयानक अपघात झाला होता. तसाच अपघात आता एका आणखी स्टार खेळाडूचा झाला आहे.
30 डिसेंबर 2022 ला दिल्लीहून डेहराडूनला जात असताना भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतचा भयानक अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला. या अपघातामध्ये पंतच्या गुडघ्याला जबर मार लागल्यामुळे त्याच्या गुडघ्याचं ऑपरेश करावं लागलं. या ऑपरेशननंतर तो एक वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला. पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. स्टार खेळाडूचा भयानक अपघात झाला. या अपघातात त्याच्या कारचा चुरडा झाला असून, त्याला उपचारासाठी हेलिकॉप्टरनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रिमियम लीग फुटबॉल स्टार मायकल एंटोनियोचा भयानक कार अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्याच्या कारचा चुरडा झाला आहे. या अपघातामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आहे. शनिवारी ही अपघाताची घटना घडली, या अपघातामधून मायकल एंटोनियो थोडक्यात वाचला असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर लंडनमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिपोर्टनुसार मायकलच्या कारचा अपघात हा एपिंह फॉरेस्ट परिसरात झाला. त्याची भरधाव कार एका झाडाला धडकली. त्यानंतर तो कारमध्येच अडकला. तो तब्बल एक तास त्या कारमध्येच होता. त्यानंतर एका व्यक्तीनं या अपघाताची माहिती हेल्प लाईन क्रमाकांवर कळवली.
अपघाताची माहिती मिळताच त्याला बेशुद्ध अवस्थेत कारमधून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर त्याला हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्याला अनेक ठिकाणी फॅक्चर झालं आहे. त्याची हाडे तुटली आहेत. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.मात्र आता तो पुन्हा फुटबॉल खेळणार की नाही याबाबत अद्याप तरी काहीही सांगता येणार नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.