इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा (Pakistan Super League 2021) सुरु आहे. क्रिकेटच्या या छोट्या स्वरुपात मोठी फटकेबाजी, उत्तुंग चौकार आणि षटकारांची फटकेबाजी पाहायला मिळते. या स्पर्धेत आज (21 फेब्रुवारी) पेशावर झालमी विरुद्ध लाहोर कलंदर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लाहोरच्या फिरकीपटू राशिद खानने गुडघ्यावर बसत धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट (Rashid Khan Helicopter Shot) मारत आपल्या टीमला विजय मिळवून दिला आहे. राशिद खानच्या या फटक्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (psl 2021 Lahore Qalandars Rashid Khan hit Helicopter Shot against Peshawar Zalmi)
SO STYLISH by @rashidkhan_19! #MatchDikhao l #HBLPSL6 I #LQvPZ pic.twitter.com/Iq1HIxCxaN
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 21, 2021
सामन्याच्या दुसऱ्या डावातील 19 वी ओव्हर अमद बट टाकत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर राशिदने गुडघ्यावर बसून जोरदार सिक्स खेचला. यासह लाहोरने 141 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 9 चेंडू राखून पार केलं. राशिद खानने 15 चेंडूत 3 चौकार आणि 1 उत्तुंग षटकारासह ताबडतोड नाबाद 27 धावा केल्या. तर मोहम्मद हाफिजनेही सर्वाधिक नाबाद 33 रन्सची खेळी केली. तसेच पेशावरकडून वाहब रियाझ आणि साकिब महमूदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
141 धावांच्या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या लाहोरची सावध सुरुवात राहिली. फखर झमान आणि सोहेल अख्तर या जोडीने 29 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर लाहोरने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे लाहोरची 109-6 अशी बिकट स्थिती झाली. मात्र यानंतर मोहम्मद हाफिज आणि राशिद खान या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद 37 धावांची नाबाद भागीदारी केली.
Lahore Qalandars clinch away their opening game, but it was the stylish SIX in the end by @rashidkhan_19 that is still on our mind! #MatchDikhao l #HBLPSL6 I #LQvPZ pic.twitter.com/2k0xEjJ5NU
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 21, 2021
त्याआधी लाहोरने टॉस जिंकून पेशावरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पेशावरकडून रवी बोपाराने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तर शोएब मलिक आणि शेरफेन रुदरफोर्डने प्रत्येकी 26 धावांची खेळी केली. या तिकडीच्या जोरावर पेशावरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 140 धावा केल्या. लाहोरकडून शाहिन अफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर सलमान मिर्झाने 2 खेळाडूंना माघारी पाठवलं.
दरम्यान लाहोरने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकत जोरदार सुरुवात केली आहे. लाहोर पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर कराची किंग विराजमान आहे.
संबंधित बातम्या :
(psl 2021 Lahore Qalandars Rashid Khan hit Helicopter Shot against Peshawar Zalmi)