शांत..संयमी..बाबर आझम जेव्हा हसन अलीवर बॅट उगारतो, Video सोशल मीडियावर व्हायरल
बाबर आझमनं शांत आणि संयमी खेळीने मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र असं असताना पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमचं वेगळंच रुप समोर आलं आहे.
मुंबई : बाबर आझम क्रिकेट जगतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आतापर्यंत त्याने आपल्या शांत आणि संयमी खेळीने मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र असं असताना पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमचं वेगळंच रुप समोर आलं आहे. पीएसएलमध्ये बाबर आझ पेशावर जाल्मीकडून खेळतो. पण चांगली कामगिरी करूनही इस्लामाबाद युनाईटेडकरून 6 विकेट्सनं पराभव सहन करावा लागला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पेशावर संघानं 8 गडी गमवून 156 धावा केल्या. हे लक्ष्य इस्लामाबाद संघाने 14.5 षटकात 4 गडी गमवून पूरण केलं. या सामन्यात बाबर आझमनं नाबाद 75 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि एक षटकार ठोकला. पेशावरचा संघ भले हा सामना पराभूत झाला पण प्रेक्षकांनी त्याच्या फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतला. इस्लामाबादचा गोलंदाज हसन अलीची मस्करी करण्यासही त्याने मागे पुढे पाहिलं नाही. हसनच्या गोलंदाजीवर एक धाव घेताना घडलेला प्रकार पाहून तुम्हालाही हसू येईल.
बाबर आझमनं खेळपट्टीवरून धावत असताना हसन अलीवर बॅट उगारली. तो बरोबर त्याच्या समोर उभा होता. त्यामुळे बाबरचा पवित्रा पाहून हसन अलीने तेथून पळ काढला. त्यानंतर दोघंही हसू लागले. या सामन्यात हसन अलीने 35 धावा देऊन 3 गडी बाद केले. या कामगिरीसाठी त्यांना सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
Some banter between Babar Azam and Hassan Ali#PZvsIUpic.twitter.com/tDsxIhcrCl
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) February 23, 2023
पेशावरकडून खेळताना बाबर आणि मोहम्मद हारिसनं चांगली खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कागमिरी करू शकला नाही. हारिसने 21 चेंडूत 40 धावा केल्या. पेशावरचे 6 फलंदाजांची 8 धावा करताना दमछाक झाली. इस्लामाबादकडून हसन अलीने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर पेशावरनं दिलेलं लक्ष्य गाठण्यासाठी इस्लामाबादकडून रहमनुल्लाह गुरवाजने 31 चेंडूत 62 धावा केल्या. तर रासी वॅनदरनं 29 चेंडूत 42 धावांची खेळी केली. तर आसिफ अलीने 13 चेंडूत 29 धावा केल्या.
पाकिस्तान सुपर लीग गुणतालिका
मुल्तान सुल्तान संघानं 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवून 8 गुणांसह आघाडीवर आहे. त्यानंतर इस्लामाबाद युनाईटेड 4 गुणांसह +0.284 सरासरीसह दुसऱ्या स्थानावर, लाहोर 4 गुण आणि -0.050 सरासरीसह तिसऱ्या स्थानी, पेशावर 4 गुण आणि -1.137 सरासरीसह चौथ्या स्थानी, कराची 2 गुण आणि +0.364 गुणांसह पाचव्या स्थानी, क्वेटा ग्लाटियर्स 2 गुण आणि -1.635 सरासरीसह सहाव्या स्थानी आहे.