वसीम अकरमला राग अनावर, सामना हरल्यानंतर केलं असं कृत्य Watch Video
पाकिस्तानात सामना हरल्यानंतर टीव्ही फोडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्यतिरिक्त मैदानात खेळाडू आणि प्रशिक्षकही नाराजी व्यक्त करतात. असंच काहीसं पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या सामन्यात वसीम अकरमनं केलं.
मुंबई : क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. अनेकदा तोंडातला घास देखील हिरावून नेला जातो. एखादा सामना जिंकता जिंकता हरतो किंवा हरणारा सामना जिंकतो. अशीच काहीसी स्थिती क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळते. पाकिस्तानात सामना हरल्यानंतर टीव्ही फोडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्यतिरिक्त मैदानात खेळाडू आणि प्रशिक्षकही नाराजी व्यक्त करतात. यापूर्वी अनेक सामन्यात आपण हे चित्र पाहिलं आहे. असंच काहीसं पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या सामन्यात वसीम अकरमनं केलं. पराभवानंतर त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही. रागाच्या भरात त्याने खुर्चीवर जोरदार लाथ मारली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वसीम अकरम कराची किंग्सचा अध्यक्ष असून पराभवामुळे निराश झाला.
कराची किंग्सला मुल्तान सुल्ताननं फक्त 3 धावांनी पराभूत केलं. मुल्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 196 धावा केल्या. मात्र कराचीचा संघ 20 षटकात फक्त 193 धावा करू शकला. शेवटच्या षटकात कराची किंग्सला 22 धावांची आवश्यकता होती. मात्र 18 धावाच करू शकला आणि जिंकणारा सामना कराचीनं गमावला. या पराभवामुळे वसीम अकरम निराश झाला आणि खुर्चीवर जोरदार लाथ मारली. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली. या कृतीमुळे क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.
Wasim Akram is VERY angry pic.twitter.com/k0jW5NQlhY
— Haroon (@hazharoon) February 22, 2023
मागच्या पीएसएलच्या मागच्या हंगामात कराची किंग्सने फक्त एक सामना जिंकला होता. या हंगामातही संघाची सुमार कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी चार सामन्यात संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. कराचीनं चार सामने गमवल्यानंतर गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. पण तळाशी आलेल्या संघांनी त्यांच्यापेक्षा कमी सामने खेळले आहेत. इस्लामाबाद युनाइटेडनं आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. तर क्वेटा ग्लॅडिएटर्सनं चार सामने खेळले आहेत.
मुल्तान सुल्तान संघाचा विजय मोहम्मद रिझवानमुळे झाला असंच म्हणावं लागेल. कारण रिझवानने पीएसएलमधलं आपलं पहिलं शतक ठोकलं. त्याने 64 चेंडूत नाबाद 110 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. तर शान मसूदने 51 धावा केल्या.कराची किंग्सकडून जेम्स विंगनं आक्रमक सुरुवात करुन दिली. त्याने 34 चेंडूत 75 धावा केल्या.